News

आगळावेगळा शिक्षक दिन

afghan

भारतातील इंग्रजी भाषेच्या प्राध्यापकंच्या संघटनेच्या (एलटाय) पुणे येथील शाखेने शिक्षकदिन अगदी आदर्श पद्धतीने साजरा केला. पुण्यात शिक्षण घेत असलेल्या अफगाण विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांची आपुलकीने विचारपूस केली, त्यांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांना धीर दिला.

अफगाणिस्तान आणि भारत या दोन देशांचे प्राचीन काळापासून अत्यंत जिव्हाळ्याचे असे सांस्कृतिक व व्यापारिक संबंध आहेत. अफगाणिस्तानात सध्या जी हृदयद्रावक परिस्थिती निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर “एलटाय” या शैक्षणिक संघटनेने उचललेल्र्या ह्या छोट्याशा पाऊलाचं महत्व तसं खूप मोठं आहे.

भारत सरकार एका वेगळ्या पातळीवर आणि वेगवेगळ्या मार्गांनी रचनात्मक पावलं ऊचलंत असतांना विविध व्यक्ती आणि संघटना आपापल्या पद्धतीने आणि कुवतीनुसार या दोन देशातील जिव्हाळा, आपुलकी, सामंजस्य वृद्धिंगत करत आहेत. ही अत्यंत महत्वाची बाब आहे.

“एलटाय” या संघटनेच्या पुणे शाखेचे पदाधिकारी प्राध्यापक झेड एन पाटील, प्राध्यापक अतुल पाटील, प्राध्यापक राहुल काळे, प्राध्यापक स्वप्नील शिरसाठ, प्राध्यापक सचिन गाडेकर व प्राध्यापक किरण पाटील यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. वली रहमान रहमानी, अब्दुल मोईज सवारी, रूस्तम मलिक, इशाक घयूर आणि बैद गुल बाहिर ह्यांनी अफगाण विद्यार्थी संघटनेचं प्रतिनिधित्व केलं.

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts
  • subhash chandra bose
  • IIT hyderabad

Comment here