“स्वतःला ओळखून स्वतःला,
स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके
काय हवे आहे .हे शोधणे म्हणजेच
यशाचा जवळ जाणे होय “
तसेच माझ्यामध्ये कोणते गुण लपलेले आहे हे शोधून मी इथपर्यंत पोहोचले. नमस्कार मी मनीषा सुनील चौधरी ,अ.र.भा.गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव. अशा छोट्याशा गावांमध्ये राहते. माझे वडील शेती करतात. मला माझ्या गावाचं नाव सांगावसं वाटतंय कारण मी एका छोट्याशा गावातून असे संशोधन केले की, ते आता पर्यंत जगामध्ये कोणीही केलेले नाही. जेव्हा अविष्कार स्पर्धा आली आणि या स्पर्धेमध्ये नाविन्य प्रकारचे शोध लावावे लागतात.मला असं वाटलं की आपण महिलांसाठी काहीतरी करायला हवं आणि तेव्हा महिलांवर होणारे अत्याचार ,त्यांच्यावर होणारे बलात्कार अशा बातम्या खूप मोठ्या प्रमाणात मी पेपर मध्ये वाचले आणि तेव्हा असं वाटलं की दैनंदिन जीवनामध्ये जे वस्तू आपण वापरतो त्या वस्तू मधेच असे काही सेफ्टी गॅजेट टाकले तर ते स्वतःचं संरक्षण स्वतः त्या द्वारे करू शकतात. (उदा. चिली स्प्रे करंट बटन कट्टर जीपीएस सिस्टिम अशा अनेक प्रकार नाईन इन वन बॉटल मी तयार केली आहे) आणि म्हणूनच त्यानंतर मी आणि डॉ . योगिता चौधरी मॅडम यांनी मला मदत करून बॉटल बनवली, कारण महिलांना स्वरक्षण करता यावं यासाठी मी एक सेफ्टी बॉटल बनवलेली आहे. जेणेकरून महिला स्वतःचे संरक्षण स्वतः करू शकतात. आणि म्हणूनच मी अविष्कार स्पर्धेत भाग घेतला. अविष्कार 2019 मध्ये मला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यामध्ये सोशल सायन्स मधून पहिला क्रमांक मिळाला आणि राज्यस्तरीय गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे माझी निवड झाली. आणि त्या विद्यापीठातही मी पहिला क्रमांक मिळवला आणि तिथे पूर्ण राज्यात सोशल सायन्स या विभागातून आम्ही विभागीय बक्षीस मिळवले. मी इथेच न थांबता मला विद्यापीठातर्फे अंवेशन या स्पर्धेत मला पाठवल गेल पॅसिफिक विद्यापीठ ,उदयपुर येथे सहा राज्य च्या संघ होता आणि तिथे सुद्धा मी पूर्ण सहा राज्यांमधून पहिलं बक्षीस मिळवल आणि तिथे माझा राष्ट्रीय स्तरावर निवड झाली राष्ट्रीय स्पर्धा 12 मार्च ,2019. ला गणपत विद्यापीठ, म्हैसाना, गुजरात मध्ये होती. आणि आणि इकडे तर माझे आई-वडील खूप खुश होते त्यांचा आनंद गगनात मावेना आणि त्यांना अजून आनंदात बघण्यासाठी मी नंतर खूप कष्ट घेतले आणि पूर्ण भारतातून पहिला क्रमांक मिळवला……
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये 2006 पासून चालत येणारे अविष्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक हा ग्रामीण भागातील मुलीने मिळवला आणि हे सर्व मी एकटीने नाही केलं तर यामध्ये माझ्या सर्व महाविद्यालयाचे शिक्षकांनी मला खूप मदत केली. माझे मार्गदर्शक योगिता चौधरी मॅडम आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वासुदेव पाटील सर यांनी मला खूप मदत केली. जर योगिता मॅडम आणि मला घडलं असतं तर आतापर्यंत मी माझ्या मधील गुण ओळखले नसते . आणि बाकी सर्व शिक्षकांनी खूप मदत केली डॉ.श्याम साळुंखे सर यांनी मला खूप मदत केली. या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्व मी ऋणात राहू इच्छिते. काही लोक म्हणतात की ग्रामीण भागात काही होत नाही आणि तेथील महाविद्यालय पण जास्त पुढे जाऊ शकत नाही. पण मला असं सांगावसं वाटतंय की आमच्या महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षक प्रत्येक कर्मचारी हे खूप चांगलं पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवत असतात. जेव्हा मी भारतातून प्रथम आली तेव्हा आमच्या महाविद्यालयात चेअरमन मा. संजय दादाजी गरुड यांनी माझी पूर्ण गावात मिरवणूक काढली आणि स्वतः मिरवणुकीमध्ये ढोल सुद्धा वाजवले आतापर्यंत मी दादांना इतकं खुश कधीच बघितलं नव्हतं त्यांनाआपल्या महाविद्यालयातून विद्यार्थी पूर्ण भारतात पहिला क्रमांक काढण्याचा त्यांना खूप अभिमान वाटत होता. आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो की आम्ही अशा महाविद्यालयात शिकतो आणि माझ्या विद्यालयाने माझ्या संशोधनाचे पेटंट सुद्धा करून दिले आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे…..
आणि म्हणून मला असं सांगावसं वाटतं की, आपण कुठेही असो शहरात किंवा ग्रामीण भागात…. आपल्या मध्ये जे गुण असतात त्याला ओळखण्याचा प्रयत्न करा आणि ते प्रत्यक्षात आणण्याचाही प्रयत्न करा आणि आपल्या सभोवताली काय करत आहे, समाजामध्ये काय चालत आहे किंवा आपल्या आजूबाजूला काय होत आहे याचा विचार करून आपण नवीन संशोधन करायला पाहिजे.
“ प्रयत्न सुरू केले की, यशाचा वाटा आपोआप गवसतात”
By Manisha Choudhary (T.Y. BCom)
Publish your achievements at www.mahaedunews.com
👍👍👍good
Nice… 👍👍
Excellent work dear