Achievements

गरुड महाविद्यालयाची गरुड भरारी

खांदेशातील रयत शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेली व स्वातंत्र्य इतिहासातून अस्तीत्वात आलेली धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑफ सोसायटी लि. शेंदूर्णी ने शेंदूर्णी आणि शेंदूर्णी पंचक्रोशीतील गरीब, कष्टकरी, मजूर, अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील, वाड्या, वस्त्या, तांडे आणि लहान सहान खेड्यातील तसेच स्वकमाईच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या तरुण विद्यार्थ्यांकरिता चालविलेले अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हे अख्ख्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या परीक्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक विशिष्ट ओळख या महाविद्यालयाने निर्माण केलेली दिसून येते.

नुकत्याच केंद्रीय पातळीवर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतीय तरुणांमध्ये निर्माण होणार्‍या बेरोजगारीचे प्रमाणाचा विचार करता तरुणांमध्ये असलेल्या कौशल्याचा अभाव, विविध कला-गुणांचा अभाव, इ. चा विचार करता बदलणार्‍या काळानुसार ग्रामीण तरूणांमध्ये विविध कलागुण, कौशल्य रुजविण्याच्या दृष्टीकोणातून विद्यापीठ परीक्षेत्रामध्ये महाविद्यालय अग्रेसर आहे नव्हे प्रथम आणि एकमेव आहे आणि अतिशोयुक्ती नाही तर सत्यता आहे.

कारण, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या परीक्षेत्रातील कधीकाळी दुर्लक्षित असलेले हे महाविद्यालय आज विद्यापीठाच्या माध्यमातून गौरविण्यात आलेले उत्कृष्ट महाविद्यालय यासह विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ पातळीवर राबविले गेलेल्या शैक्षणिक आणि गुणवत्ता अंकेक्षणात महाविद्यालय अ दर्जा प्राप्त करून गुणवत्ता यादीत प्रथम दहा महाविद्यालयात येण्याचा मान, याबरोबरच उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना एककचा पुरस्कार मिळालेले महाविद्यालय आहे, तसेच महाराष्ट्र राज्यात महामाहीम राज्यपाल यांच्या कार्यालयामार्फत आयोजित केल्या जाणार्‍या आविष्कार स्पर्धेत शैक्षणिक वर्षं २००८ पासून महाविद्यालीन शिक्षक तसेच  विद्यार्थ्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे व देशपातळीवर असोसिएशन ऑफ इंडियन युंनिवेर्सिटीज च्यावतीने आयोजित अन्वेषण २०१९ मध्ये वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु. मनीषा सुनील चौधरी हिस विद्यापीठाच्या आणि आविष्कार स्पर्धेच्या इतिहासात प्रथमत: प्रथम परितोषिक मिळविण्याचा मान प्राप्त झालेला आहे, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी दुर्गेश महाजन याने आंध्र प्रदेशातील कुरनूल येथील तर किरण मराठे याने आसाम येथील गुवाहाटी येथे आयोजित झालेल्या खेलो इंडिया खेलो या राष्ट्रीय भरोत्तोलक स्पर्धेत सुवर्ण पदक यासह तंबाखूमुक्ति करिता सुवर्ण आणि रौप्य पदक प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे

थोडक्यात ग्रामीण भगत ग्रामीण, वस्ती, तंडयावरील विद्यार्थ्यांकरीता कार्यरत असलेल्या अप्पासाहेब र. भा. गरुड महाविद्यालयाची गरुड भरारी धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑफ सोसायटीचे चेअरमन मा. दादासाहेब संजयजी गरुड, सचिव मा. काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव भाऊसाहेब दीपकजी गरुड, जेष्ठ संचालक मा. दादासाहेब यू. यू. पाटील व संस्थेचे सर्व संचालक मंडळ. पदाधिकारी, मा. प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आजमितीस महाविद्यालची स्वतंत्र इमारत, प्रशासकीय विभाग, मध्यवर्ती ग्रंथालय, वाचनकक्ष, सेमिनार हॉल, कॉन्फ्रेंस हॉल, अतिथि गृह, भव्य असे इनडोअर आणि आऊटडोअर स्टेडीयम, महिला वसतिगृह, इ. विद्यार्थी हिताच्या दृष्टीकोणातून महाविद्यालयाला संस्था आणि विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहाय्यातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील यांचा उत्कृष्ट प्रशासनाचा भाग म्हणून महाविद्यालायीन कामकाजाचे विकेंद्रीकरण करून प्रा. एन. एस. सावळे (कला), डॉ. संजय वामनराव भोळे (विज्ञान), डॉ. श्याम जीवन साळुंखे (वाणिज्य) आणि प्रा. आर. जी. पाटील (कनिष्ठ विभाग) यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती करून प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Dr. Shyam Salunkhe (Vice-Principal)

Dr. V.R. Patil (Principal)

Publish your achievements at www.mahaedunews.com

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts
  • Artificial Intelligence
  • nabard
  • shreya pant

Comment here