Achievements

डॉ. श्याम साळुंखे यांचा शोधनिबंध जगातील सर्वोच्च मानल्या जाणार्‍या ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्रकाशित

shyam salukhe

जळगाव जिल्ह्याच्या शेंदूर्णी या गावातील अप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि वाणिज्य विभागप्रमुख डॉ. श्याम जीवन साळुंखे यांचा रोकड विरहित व्यवहार आणि डिजिटल पेमेंट सिस्टिम वर आधारित “ए स्टडी ऑफ इम्प्लिमेनटेशन अँड इंप्याक्ट ऑफ डिजिटल पेमेंट सिस्टिम ऑन रूरल एकोंनोमी: अॅन ओवार्व्हिव” हा शोधनिबंध जगातील सर्वोच्च मानल्या जाणार्‍या आणि सर्वात जुन्या अशा इंग्लंड येथील ऑक्सफोर्ड विद्यापीठ लंडन च्या सेंट हिल्डा कॉलेज, ऑक्सफोर्ड, लंडन येथे लंडन इंस्टीट्यूट ऑफ स्किल डेवलपमेंट, लंडन यू. के. यांच्या वतीने नोव्हेंबर, 2019 मध्ये संपन्न झालेल्या “अप्लाइड रिसर्च इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन बिझिनेस अँड अॅडमिनिसट्रेशन” (ARICBA,2019) या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या विशेष अंकात प्रकाशित करण्यात आला आहे.

डॉ. श्याम साळुंखे यांनी या परिषदेत व्हर्चूअल सादरीकरणाच्या माध्यमातून आपला  सहभाग नोंदविला, त्यांनी आपल्या शोधनिबंधात देशातील रोकड विरहित अर्थव्यवस्था आणि रोकडविरहित समाज निर्माण करण्याच्या दृस्टिकोणातून  रोकडविरहित व्यवहार आणि डिजिटल पेमेंट सिस्टिमचे भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील अमलबजावणी, परिणाम, समस्या, उपाययोजना आणि संधी याचा उहापोह केलेला आहे.

डॉ. साळुंखे यांचा शोधनिबंध इंग्लंड येथील आणि ऑक्सफोर्ड सारख्या जगातील अग्रस्थानी असलेल्या, सर्वोत्तम आणि सर्वात जुन्या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी स्वीकारणे आणि ब्रिटिश लायब्ररी इंग्लंड च्या सहकार्याने विशेष अंकात प्रकाशित करणे यासह जगातील सर्वोत्तम अशा बोडलीयन लायब्ररी, युंनिव्हार्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड, द लायब्ररी ऑफ केंब्रिज युंनिव्हार्सिटी, नॅशनल लायब्ररी ऑफ वेल्स, द ब्रिटिश लायब्ररी, नॅशनल लायब्ररी ऑफ स्कॉटलंड आणि ट्रिनिटी कॉलेज ऑफ डब्लीन या संस्थांच्या ग्रंथालयात संदर्भासाठी उपलब्ध असणे हे अतिमहत्वाचे आणि सन्मानाचे मानले जात आहे. म्हणून डॉ. साळुंखे यांच्या ह्या आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑफ सोसायटीचे चेअरमन मा. दादासाहेब संजयजी गरुड, सचिव मा. काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव भाऊसाहेब दीपकजी गरुड, जेष्ठ संचालक मा. दादासाहेब यू. यू. पाटील व संस्थेचे सर्व संचालक मंडळ. पदाधिकारी, मा. प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कौतुक करीत आहेत.

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts
  • Artificial Intelligence
  • nabard
  • shreya pant

Comment here