Student Views

श्री.संग्राम गायकवाड यांची एक अवस्मरणिय मुलाखत: मयूर नरुटे

“मुलाखत हि केवळ प्रश्न विचारणे आणि उत्तर मिळवणे याबाबत नसते तर मुलाखतकाराच्या आयुष्याचा त्याच्या जीवनातील प्रवासाचा सर्वांगाने अभ्यासण्याबाबत असते.”

आम्ही घेतलेल्या श्री.संग्राम गायकवाड सरांच्या मुलाखतीतून सुद्धा याचप्रकारे त्यांचे बालपण, महाविद्यालयीन जीवन तसेच प्रशासकीय सेवेत आलेले अनुभव,त्यांच्या कामाचे स्वरूप, प्रशासकीय सेवेबाबत त्यांची विविधांगांनी केलेला विचार यांचा आढावा घेण्याची संधी मिळाली.

गायकवाड सरांचे मूळ गाव सोलापूर मधील कोंडी ही आहे. वडील श्री.रावसाहेब गायकवाड हे सरकारी नोकरदार होते. वडिलांची नोकरी फिरतीची असल्याकारणाने संग्राम सरांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर व त्यानंतर चे शिक्षण हे सोलापूर मध्ये झाले. सरांच्या आई यांनी कोकणामध्ये नर्सिंग चे काम केले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा दलात हि कार्यरत होत्या.१२ वी नंतर वर्ध्याच्या सेवाग्राम वैद्यकीय विद्यालयात मध्ये प्रवेशासाठी असलेल्या परीक्षेसाठी जीवशास्त्र,भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसोबतच गांधीजी असा चौथा विषय होता. त्यामुळे एका वर्षाच्या तयारीच्या काळात गांधीजींबाबत अनेक पुस्तकांचे वाचन झाले.गांधीजींबद्दलच्या वाचनाचा संग्राम सरांच्या व्यक्तिमत्वावर ठसा उमटवला. याबद्दल सांगताना ते त्यांचा एका अनुभवाचा दाखला देतात. गांधीजींनी सांगीतलेल्या एकादशव्रता मधील निग्रह या तत्वानुसार आपल्याला प्रिय गोष्टींची आसक्ती त्यागावी असे सांगितले आहे. त्यानुसार सरांनी लोणचे खाणे बंद केले होते असे त्यांनी सांगितले. गांधीजींचे सत्य हे तत्व त्यांचा आयुष्यात अतिशय उपयुक्त आणि महत्वाचे ठरले असे ते सांगतात. GOD IS TRUTH याउलट TRUTH IS GOD यावर विश्वास वाटतो. हेच तत्व सरांना आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना सामोरे जाताना निर्भीडपणा देते. याचप्रमाणे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात अपरिग्रह आणि अहिंसा हि गांधीजींची तत्वे तितकीच महत्वाची आणि अत्यावश्यक ठरतात.

डिप्लोमा मध्ये महाराष्ट्रात प्रथम आल्यानंतर पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याठिकाणी अभ्याक्रमासोबतच विविध सामाजिक छळावळींमध्ये सहभाग घेतला. महाविद्यालयातील समविचारी मित्रांसोबत गेट परीक्षा किंवा कंपन्यांमध्ये निवड प्रक्रिया यासारखा प्रचलित मार्ग न चोखाळता एक वर्ष समाजासाठी देऊन त्याचा विकासासाठी काम करण्याचे ठरवले. त्यावेळी पाणलोट क्षेत्र विकासामध्ये काम करणाऱ्या अशासकीय संस्थेमध्ये काम केले. त्या क्षेत्रात काम करताना सामाजिक कार्य अधिक व्यापक प्रमाणात करायचे असल्यास प्रशासकीय सेवा हे माध्यम जास्त परिणामकारक ठरेल असे सरांना जाणवले.

मुंबईमधील SIAC मध्ये प्रवेश घेतल्यानंतर अनुभवी आणि अभ्यासक व्यक्तींशी संपर्क आला. मराठी साहित्य आणि समाजशास्त्र हे आवडीचे विषय परीक्षेसाठी निवडले. विजया राज्याध्यक्ष व रमेश तेंडुलकर यांच्यासारख्या तज्ञांसोबत शिकण्याचा आनंद मिळला.

प्रशासकीय सेवेची तयारी करणाऱ्या युवकांना अत्यंत आवश्यक आणि महत्वाचा संदेश सर देतात. युवकांनी आयुष्यात भविष्यातील वाटचालीचा तसेच उपजीविकेच्या साधनांचा व्यापक विचार करण्याची गरज सर व्यक्त करतात . त्याचप्रमाणे स्वपरिक्षण करून विवेकबुद्धीने विचार करूनच वाटचालीचा मार्ग निवडण्याचा सल्ला देतात. प्रशासकीय सेवा हे इतर अनेक करियर च्या पर्यायांपैकी एक आहे आणि त्याकडे त्याच दृष्टीने पहिले पाहिजे असे ते सुचवतात.

प्रशासकीय सेवेबाबत बोलताना त्याचे वर्णन एका विशिष्ट चाकोरीमध्ये राहून काम करणारी यंत्रणा असे करतात. त्यामुळे स्वतःचा स्वभाव, उद्दीष्ठे व तत्वे यांचा विचार करूनच तो मार्ग निवडावा असे मत मांडतात. त्याचप्रमाणे सेवेबाबतीत सकारात्मक तसेच नकारात्मक अशा दोन्ही बाजूंचा विचार करणे गरजेचे ठरते असे ते आंगतात.

स्वभावपिंड सर्जनशील असल्याकारणाने सेवेत असणाऱ्या विविध बंधनांमुळे ताण येतो. तो ताण दूर करण्यासाठी IRS या उपजीविकेच्या साधनाव्यतिरिक्त साहित्य वाचन तसेच सामाजिक कार्य अशा अनेक क्षेत्रांतून ऊर्जा मिळते आणि काम करण्याचा उत्साह येतो.

सेवेत रुजू होण्याआधी समाजासाठी काही तरी करणे, समाजात बदल घडवणे अशी उद्दीष्ठे होती. स्वभावपिंड स्वातंत्रप्रिय आणि सर्जनशील असल्याकारणाने प्रत्यक्ष काम सुरू केल्या नंतर तीव्र भ्रमनिरास झाला असे ते सांगतात.

भारतामध्ये शिक्षक,साहित्यिक आणि संशोधक यांना युरोपीय देशांमध्ये मिळणाऱ्या सन्मानापेक्षा तुलनेने कमी आहे हे खेदकारक आहे.

पार्श्वभूमी हि साहित्य, समाजशास्त्र अशा प्रकारच्या क्षेत्रांची असल्याने Income Tax Department मध्ये काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. प्राप्तिकर नियम, अर्थशास्त्र, वेगवेगेळे उद्योगधंदे, करप्रणाली असे अनेक पैलू शिकण्याची गरज होती. हे निवडप्रक्रिनंतरच्या प्रशिक्षणात शिकवले जाते परंतु प्रत्यक्ष सेवेतील कामात आलेल्या अनुभवातून खरे शिक्षण मिळाले. त्यानंतर २०१५ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून MBA Finance केला. यामागे प्रशासकीय सेवेत काम करताना त्यासाठी होणाऱ्या फायद्यासोबतच त्यांची साहित्य वाचनातील आवड जोपासणे व सामाजिक क्षेत्रातील काम करन्यासाठी विशेष वेळ देणे हा सुद्धा उद्देश्य होता.

सरकारी नोकदारांनी सरकारच्या धोरणांविरोधात टीकात्मक वक्तव्य करू नयेत असा असतो, परंतु हा नियम त्यांना जाचक वाटतो. परंतु त्यांच्या मते साहित्य त्यांना या बाबतीत मोकळीक देते. त्याद्वारे आपण व्यक्त होऊ शकतो असे त्यांना वाटते. त्यांनी लिहलेल्या “आटपाट गावच्या गोष्टी” या कादंबरीतून ते व्यक्त होणे त्यांना शक्य झाले. सर प्रशासकीय सेवेतील बादलांबद्दल अतिशय परखड मत व्यक्त करतात. प्रशासकीय सेवेचे सरंजामशाही चे स्वरूप बदलणे गरजेचे आहे आणि हि बाब ते बदलू इच्चीतात. त्याचप्रमाणे नियंमाना धरून काम करणे जिकरीचे असल्यासाचे ते सांगतात. या गोष्टी बदलल्यास सेवेत पारदर्शकता वाढेल आणि त्यामुळे नागरिकांना त्याचा चांगल्या प्रकारे लाभ मिळेल.

राजकारणातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल बोलताना ते नेत्यासोबतच नागरिकांच्या सुद्धा जाबाबदारीबद्दल भाष्य करतात.एखादा पुढारी वाईट काम करून चुकीच्या मार्गाने निवडून येत असेल तर त्याला निवडून देणारे लोक सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत असे ते सांगतात.लोक जर चुकीच्या मुद्द्यांवरून भडकत असतील आणि मूळ महत्वाच्या मुद्द्यापासून विचलित होत असतील तर समाजाचे सक्षमीकरण गरजेचे आहे. संविधानाची आधुनिक तत्वे आणि मूल्ये कळणारा आणि तो मानणारा समाज घडविणे महत्वाचे आहे. यामध्ये नेत्यांची जबाबदारी तुलनेने जास्त आहे असे म्हणतात.

सरतेशेवटी ते आजच्या तरुण पिढीला मोबाइल च्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल सांगतात. जीवनात प्रत्येक गोष्टीची खोल वर जाऊन विचार करण्याचा मनोवस्थेची गरज असते परंतु मोबाइलच्या अति वापरामुळे त्यात अडथळा निर्माण होतो. तसेच संयमी राहून आव्हानांना सामोरे जाण्याचा सल्ला देतात.

या मुलाखातीमध्ये गायकवाड सरांच्या प्रवासातील अनेक पैलू कळवुन मिळाले. त्याचप्रमाणे प्रशासकीय सेवेतील अनेक बाबी जाणून घेणे शक्य झाले. सरांचे मराठी साहित्याबद्दल चे प्रेम आणि सामाजिक बांधिलकी समजली. महात्मा गांधींजींबद्दलच्या वाचनाने त्यांची शिकावण कशा प्रकारे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक म्हणून महत्वाची ठरते.

मयूर नरुटे हा एस .वाय. बी.एस.सी चा विध्यार्ती आहे.

Publish your articles on www.mahaedunews.com

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts
  • Indian History
  • Pride Internship
  • spc
  • Valentina Tereshkova

Comment here