Achievements

AISSMS पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाची विजयाची हॅट्ट्रीक

एआयआयएसएस अभियांत्रिकी महाविद्यालयाची विजयाची हॅट्ट्रीक ….. सलग आठव्यांदा विजेतेपद
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अणुविद्युत आणि दूरसंचार विभागाला २०२१-२०२२ या वर्षासाठी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) स्टुडंट्स चॅप्टर हा पुरस्कार सलग आठव्यांदा मिळाला. रु. २००००/-, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असुन, ३७ व्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स (इंडिया)च्या भारतीय अभियांत्रिकी काँग्रेस मध्ये दि. १६.१२.२०२२ रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार डॉ. एच. ओ. ठाकरे ( अध्यक्ष , आयईआय) यांच्या हस्ते, एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे चे प्रा. श्री. नितीन पी. मावळे (सल्लागार, आयईआय स्टुडंट्स चॅप्टर,अणुविद्युत आणि दूरसंचार विभाग) यांनी स्वीकारला.या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातील ३०० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून अर्ज प्राप्त झाले. श्रीमंत छत्रपती श्री. मालोजीराजे (सचिव, आयएसएएसएम सोसायटी ), श्री. सुरेश शिंदे (सहसचिव, आयएसएएसएम सोसायटी), श्री. अजय पाटील (खजिनदार,आयएसएएसएम सोसायटी) आणि डॉ. डी. एस. बोरमणे ( प्राचार्य, एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय) यांनी सलग ८ वर्षांपासून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सातत्याने मिळवल्याबद्दल अणुविद्युत आणि दूरसंचार विभागाचे डॉ. एस. बी. धोंडे (विभागप्रमुख ), श्री नितीन मावळे (सल्लागार, आयईआय स्टुडंट्स चॅप्टर), सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन व कौतुक केले. या पुरस्कार सोहळ्याला संपूर्ण भारत आणि परदेशातील १००० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here