motivational

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पंढरपूर ची राज्यात उत्तम कामगिरी

sainik school

मागील वर्षी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून रेकॉर्ड ब्रेक 20 विद्यार्थ्यांची निवड सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत झाली होती, या वर्षी त्याही पेक्षा खूप जास्त रिझल्ट लागला आहे.

या वर्षी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या 4 विद्यार्थिनी राज्यात आपापल्या कॅटेगरी मध्ये प्रथम आल्या आहेत.
मुळात सैनिक स्कूल ने मुलांना 90 जागा दिल्यात व मुलींना फक्त 10. यातील 3 जागा दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या राज्यातील मुलींसाठी राखीव म्हणजे जर मुलीला प्रवेश मिळवायचा झाला तर तिला आपल्या कॅटेगरी मध्ये पहिली आली तर प्रवेश मिळणार असेच समजायचे.

या खडतर आव्हानाला सामोरे जात  मुलींनी दैदिप्यमान यश संपादन केले.

कु. पियुशा जितेंद्र चव्हाण हिने 246 मार्क्स मिळवत मुलींमध्ये राज्यात सातारा सैनिक स्कूल ला पाहिले येण्याचा मान मिळवला, यासाठी क्लास बरोबर तिच्या आईवडिलांचा Dr. चव्हाण सर व Dr चव्हाण मॅडम यांचा पण खूप मोठा वाटा आहे.

कु. सिद्धी रोहन रावखंडे हिने 214 मार्क्स मिळवत SC कॅटेगरी मधून सातारा सैनिक स्कूल ला राज्यात पाहिले येण्याचा मान मिळवला, यासाठी क्लास बरोबर तिच्या आईवडिलांचा Dr.रावखंडे सर व Dr. रावखंडे मॅडम यांचा पण खूप मोठा वाटा आहे.

कु. अंशिका शामराव ननावरे हिने 202 मार्क्स मिळवत डिफेन्स कॅटेगरी मुली मध्ये सातारा सैनिक स्कूल ला राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला. यात क्लास बरोबर तिचे आई वडील यांचा खूप मोठा वाटा आहे.
विशेष बाब म्हणजे हा पराक्रम तिने 4 थी मध्ये असताना केला आहे, 5 वी व 6 वी मधील मुलींना मागे सरत ती पहिली आली.

कु. अक्षरा बालाजी पुदलवाड हिने 173 मार्क्स मिळवत ST कॅटेगरी मध्ये चंद्रपूर सैनिक स्कूल ला राज्यात मुलींमध्ये पहिली येण्याचा मान मिळवला आहे
यात क्लास बरोबर तिचे आई वडील मा. नायब तहसीलदार पंढरपूर पुदलवाड साहेब यांचा मोठा वाटा आहे.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन.

आय कॅन ट्रेनिंग इंस्टिट्युट पंढरपुर

संस्थापक- श्री. विवेक भोसले (12 वर्षांचा प्रदीर्घ शिक्षणसेवेचा अनुभव, विविध कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजक)

सैनिक शाळा, राष्ट्रीय मिलिटरी शाळा, नवोदय शाळा यांच्या प्रवेश परिक्षेच्या तयारीच्या क्षेत्रात उत्कृष्टता व गौरवपुर्ण निकाल तयार करण्याच्या उद्देशाने ‘आय कॅन ट्रेनिंग इंस्टिट्युटची स्थापना सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षात केली गेली. आय.सी.टी.आय ची स्थापना करण्यामागील उद्दिष्ट म्हणजे संरक्षण सेवांमध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पाहणारी आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यास इच्छुक असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यश मिळवून देणे हा आहे.

या संस्थेमध्ये सर्व स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेतली जाते. त्यामध्ये खालीलप्रमाणे,
1. ऑल इंडिया सैनिक स्कुल प्रवेश परिक्षा (AISSEE)
2. राष्ट्रीय मिलिटरी स्कुल(AISSEE)
3. जवाहर नवोदय प्रवेश परिक्षा(JNV)
4. शिष्यवृत्ती परिक्षा
5. सर्विस प्रिपेरेटरी इंस्टिट्युट, औरंगाबाद (SPI AURANGABAD)
वरील स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेणारी ही पंढरपुरमधील एकमेव संस्था आहे. पंढरपुर आणि पंढरपुर शेजारील मोडनींब, करकंब, टाकळी, वाखरी, शेळवे, मंगळवेढा, तिसंगी, सांगोला, बार्शी, गोपाळपुर, मोहोळ, अकलूज, माळशिरस, इ. ठिकाणाहून मुले या संस्थेत येतात. तसेच, नवी मुंबई, पुणे, सोलापुर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, इ. शहरांमधून ही मुले येतात.

आय.सी.टी.आय या संस्थेच्या प्रवासामध्ये यशाचा आलेख हा नेहमी चढत्या क्रमानेच वरती जाताना दिसावा या पार्श्वभुमीवरती, संस्थेच्या अथक परिश्रमातून या वर्षी महाराष्ट्र राज्यात अद्वितीय निकाल देण्यासाठी आय.सी.टी.आय समर्थ ठरली.
कोरोना काळामध्ये देखील मेहनतीच्या जोरावर आम्ही घवघवीत यश संपादन केले.
त्यामध्ये या संस्थेच्या चार मुली महाराष्ट्र राज्यात प्रत्येक कॅटेगरीत प्रथम आल्या. तसेच, एकुण 35 विद्यार्थ्यांची सैनिक स्कुल सातारा व चंद्रपुर या ठिकाणी निवड झाली.

मुळात सैनिक स्कुलने मुलांना 90 जागा व मुलींना 10 जागा दिल्या आहेत. त्या 10 जागांमध्ये 3 जागा या दुसऱ्या राज्यांमधून येणाऱ्या मुलींसाठी राखीव आहेत. म्हणजे जर मुलीला प्रवेश मिळवायचा असेल, तर तिला तिच्या कॅटेगरीत पहिली आली तरच प्रवेश मिळणार असेच समजायचे. या खडतर आव्हानांना सामोरे जात आमच्या मुलींनी देदिप्यमान यश संपादन केले.
ही संस्था आपली वाटचाल अपार कर्तृत्वाच्या जोरावर आपले नाव नेहमीच देदिप्यमान करुन शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा उमटवेल.

संपर्क:-9156911391/7020285137

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts
  • Valentina Tereshkova
  • medhavi
  • pradeep jadhav
  • ambejogai

Comment here