आकाशात तळपणारा  माध्यान्हीचा  सूर्य  म्हणजे *”युवा पिढी’*… अमर्याद  ऊर्जेचा स्रोत, प्रचंड कार्यक्षमता आणि ध्येय  गाठण्याची  अविरत  धडपड…

आजची युवापिढी नक्कीच  सुशिक्षित आहेत आणि सुज्ञ पण..

आपली एनर्जी कोठे आणि कशी  chanalize करायची ह्याची  proper जाणीव असणारी शिवाय त्याप्रमाणे एक structure करुन धाव घेणारी…

Friends,

तुमच्या विचारांची दिशा आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून तुमच्या बुद्धीचा खरंच *हेवा* वाटतो. तुम्ही सगळ्या बाबतीत खूप *स्मार्ट* आहात. विशेषतः प्रॅक्टिकल आहात. योग्य  वेळी योग्य ठिकाणी व्यक्त  होण्याची कला तुम्हाला चांगलीच अवगत आहे आणि त्यामुळेच तुम्ही सतत *cheerful* असता. घेतलेले *निर्णय* भले चुकीचे का असेना पण निर्णय  घेता (decision making). मी  त्यावेळी असं करायला हवं होत  किंवा असं नाही झालं, ही  *पश्चातापाची* भावना नसते. आपण आपल्या जागी  *unique* आहात ह्याची जाण  असणाऱ्या दोस्तांनो  *सलाम*

खूपच कौतुकास्पद आहात आपण……

फ्रेंड्स……..थांबा… थोडे… थांबा!

ह्या  यशामागे धावताना व  उत्तुंगतेचे शिखर सर करताना कळत नकळत तुम्ही स्वतःकडे *(आरोग्य)* दुर्लक्ष करता. काही  ठिकाणी (खूपच health conscious किंवा फक्त  workoholic) तर ह्याचा सुवर्ण  मध्य गाठता.

दिवसभरातील कामाचे schedule करताना त्यात proper जेवणाची वेळ पण  adjust करु  या असे स्वतःलाच सुचविता.

दररोज नियमित ताजे अन्न खाल्ले   तर  99% आजार आपल्या जवळ सुध्दा येत नाहीत. सोबत  व्यायाम पण हवाच बरं का !

ह्या धावपळीच्या युगात वाढणारे  प्रदूषण पाहिले तर, शरीराला  रोज यंत्राप्रमाणे servicing ची  गरज आहे.

*यंत्र* overload झाले की *hang* होते. आपणपण *living instrument*  आहोत.

त्यासाठी सकाळी उठल्यावर  आपण पटकन मोबाईल check  करतो आणि लगेच *charging* ला लावतो तोच  फंडा आपण स्वतः साठी वापरायचा न चुकता….आज  उठायला उशीर झाला म्हणून *राहू  दे*….एका  दिवसाने  असा काय फरक पडणार आहे… *No..No..No* … असाच एक एक दिवस नकळत वाढत जात असतो.

आपण व्यायाम *केलाच* पाहिजे. योगा,  जिम, पोहणे,  धावणे, एरोबिक, ई.  स्वरूप  काहीही असो, पण नियमित *घाम* येईपर्यंत आपल्या शारीरिक शक्ती प्रमाणे अर्धशक्ती व्यायाम करावा.

ह्याचे अनेक *फायदे* आहेत  व *तोटा* शून्य…

आता *Diet* काय, किती आणि  कसं घ्यायचं ह्यासाठी panic न होता आपल्या शरीराला लहान पणापासून ज्या आहाराची सवय  आहे तो घ्यायला हरकत नाही (no fast food….never)

नाहीतर *cosultant* कडे  जायचे व त्यांचा Diet Chart follow करायचा … हे फक्त  नव्याचे नऊ दिवस नको.

आणि हो एक गोष्ट सतत  कानावर येते… आजची पोरं सतत व्यसनाधीन होऊन मोबाईल  वर असताt. No problem! कारण मोबाईल काळाची गरज आहे. खूप उपयुक्त आणि प्रभावी  माध्यम आहे. तरीपण दिवसातील किमान *2 तास* आपण   without मोबाईल राहू या असे *संकल्पच* करू या.

आणि मग अश्या वेळेचा सदुपयोग *वाचन* किंवा  इतर  *छंद* जोपासून घालवूया.

2 तास  without  मोबाईल  राहिलो तर काहीही बिघडत नाही. आपले मानसिक आरोग्य नक्कीच चांगले राहील.

अजून एक मुद्दा…आजकाल  कोणीही थोडे मनाविरुद्ध वागले की आपण डिस्टर्ब होतो, stress   निर्माण होतो. जगात आपले कोणी नाही किंवा आपल्या जगण्याला काहीच अर्थ नाही असे वाटून चुकीचे वाट धरतो  त्याचे रूपांतर कधी कधी *व्यसनात* होते हे पण समजत नाही.

*Friends*….

आपल्यावर जीवापाड

प्रेम करणारे आपले *आईवडील*  आहेत सोबत ह्याची जाणीव असू द्या.

…कधी तरी असं जाणवते की यार ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सोबतच का?

मीच का?

तर प्लीज आपले issues मोकळेपणाने आपल्या जवळच्या  व्यक्ती सोबत share करा.

Check करा,  उत्तर लगेच  मिळेल.

…पण संवाद करा.

आणि आपल्या सारखे समदुःखी खूप आहेत अशी जाणीव झाली की आपला त्रास कमी होतो.

पण *सुसंवाद* आवश्यक आहे. आपल्या पालकांसोबत बोला.

….आणि शिवाय प्रेम आपल्यावर   नाही का? …

आधी स्वतःवर मनापासून नितांत  प्रेम करा. स्वतःचा आदर करा.

चला तर स्वतः वर प्रेम करु  या…… !

डॉ विदया नाईक

for more such news kindly logon to www.mahaedunews.com

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts