motivational

उषःकाल होता होता…सुरेश भटांची नवचैतन्य निर्माण करणारी कविता

suresh bhatt

उषःकाल होता होता …
काळरात्र झाली…
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली….
हे गीत प्रसिद्ध गझलकार सुरेश भट लेखणीतून अवतरले . स्वातंत्र्यपूर्व काळातील आपल्या देशाचे चित्र कवी सुरेश भट यांनी या गीतातून मांडले आहे .
सत्ता आणि सत्तेची लालसा या भोवती फिरणारे राजकारण, त्यासाठी टाकले जाणारे डाव-प्रतिडाव, राजकारणातील सत्तांची बेरीज वजाबाकी यांचे समीकरण ,जनतेचा विश्वासघात करणारे तथाकथित लोकप्रतिनिधी हे चित्र 1969 साली प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक श्री जब्बार पटेल यांचे दिग्दर्शन असलेल्या “सिंहासन” या सिनेमातून मांडले आहे.
प्रसिद्ध पत्रकार अरुण साधू यांच्या या कादंबरीवर बेतलेलाहा सिनेमा आहे राज्याचं राजकारण बदलत जात असलं तरी सत्तांतराचा खेळ कायम राहतो, सत्तेच्या सारीपाटात पात्र ही बदलत जातात पण सत्तेची लालसा आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण मात्र कायम राहते.
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात आपल्या कृषिप्रधान देशात शेतकरी कामगार वर्ग आणि शोषित वर्ग हा कायम अन्याय आणि अत्याचार यांनी पिचलेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले; परंतु जगाचा पोशिंदा असणाऱ्या भुमिपुत्रा ला काय मिळाले ?
याचे आजही उत्तर आपल्याकडे नाही भूमिपुत्रांची ही अवस्था पाहून कवीमनाला फार दुःख होते. त्यांचा विचार कवीला अस्वस्थ करतो.
कविवर्य सुरेश भटांची ही सुप्रसिद्ध गझल पुन्हा पुन्हा ऐकताना ती जणू भूमिपुत्रांना आपल्या आयुष्याच्या मशाली लावण्यासाठी आवाहन करत आहे असे वाटते.
“अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी…”
“असा कसा जो तो येथे होतसे खरेदी…”
“अपार दुःखाचीही चालली दलाली…”
“उषःकाल होता होता काळरात्र झाली…”
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…
स्वातंत्र्योत्तर काळात सामान्य माणसाची अवस्था अतिशय भयावह आणि बिकट होती…. आहे …
सामान्य माणसांच्या इच्छा-आकांक्षा यांना काहीच मोल नव्हते कारण सत्तेच्या राजकारणात अनेकांनी आपल्या तिजोऱ्या भरून घेतल्या.
सामान्य माणूस मात्र सत्ताधीशांच्या हातातील बाहुले बनून राहिले, कार्यकर्त्यांना वाटेल तसे वापरून घेणे आणि काम झाले की त्यांना टाकून देणे.त्यांच्या जीवावर उठणे हा सत्तेचा माज सामान्य माणसाला देशोधडीला लागतो. त्यामुळे सामान्य माणसांनी चार किरणांची ही आस का धरावी का असाच प्रश्न पडतो . आणि सरते शेवटी त्यांना काहीच मिळत नाही.
सूर्य हा संपूर्ण विश्‍वाला प्रकाशमान करतो . मनात आशेची पालवी निर्माण करतो. पण हा सूर्य जेव्हा अंधाराच्या खाली वाहतो अंधाराला सामील होतो तेव्हा सामान्य माणसांनी कुणाकडे पाहायचे. सत्ताधीशांच्या हातात सत्तेच्या चाव्या असतात त्यामुळे समाजात विकास करण्याचे मार्गही त्यांच्याकडेच कुलूप बंद असतात.समाजाच्या विकासासाठी काहीच न करता हे सत्ताधीश जेव्हा स्वतःच्या तिजोऱ्या भरतात; तेव्हा मात्र सामान्य माणसांनी पुन्हा आपल्या आयुष्याच्या मशाली पेटवाव्यात असे कवी आवाहन करतात.
तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती …
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती …
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेत ही ना वाली …
गीताच्या यापुढील ओळी कवींनी अतिशय उपरोधिकपणे लिहिले आहेत. सत्तेतून मिळवलेल्या पैसा मानमरातब प्रसिद्धी या सगळ्यांच्या जोरावर सत्ताधीश श्रीमंत होतात स्वर्ग त्यांना दोन बोटे उरतो. पण सामान्य माणूस मात्र गरिबीत खितपत पडतो.संसारासाठी लागणारे सामान जुळवण्यातच त्याची आख्खे उमेदीचे आयुष्य खर्ची पडते. त्यांचा शेवट याच दारिद्र्याने पिचलेल्या स्थितीत होतो.
“स्मशान” हे दुःखाचे प्रतीक. कवींनी सामान्य माणसाच्या जीवनाची तुलना हे जणू प्रेत ही ना वाली नाही अशा स्मशाना शी केली आहे. म्हणूनच आता आपल्या आयुष्याच्या मशाली पेटवून बंड करून उठा असे आवाहन करतात.
उभा देश झाला आता एक बंदिशाला…
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला…
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली...
याही कडव्यात कवींनी जगाला बंदिशाळा असे म्हंटले आहे जिथे सर्वसामान्य लोक बंदीवान आहेत. विकासाच्या किल्ल्या मात्र सत्ताधीशांचा हातात आहेत. ज्या नितीमूल्य आणि तत्त्वांच्या जोरावर आपण स्वातंत्र्य मिळवले त्या सर्वच नीति- मूल्यांना तिलांजली मिळताना पाहिली की मन पेटून उठते आणि मग आपल्या समाजात आईच्या दुधाचे सुद्धा पावित्र्य राखले जात नाही; तिचा पान्हासुद्धा दुधाने जळतो असे कवी अतिव खेदाने म्हणतात.
दिखाऊपणाच्या या समाजात पाप भाग्यशाली झाले आहे आणि पुण्य मात्र दुर्दैवी झाले आहे. खर्‍याची दुनिया नाही असे आपण म्हणतो.
असत्य , अनाचार, अन्याय, दुराचार करताना माणूस तिळमात्रही घाबरत नाही. सत्तेच्या जोरावर हवे ते प्राप्त करून घेण्याचे सामर्थ्य आता सत्ताधीशांकडे आहे .म्हणूनच कवी आयुष्याच्या मशाली पेटवण्यास सांगताहेत, बंड करुन उठावयास सांगत आहेत.
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे …
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे…
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली …
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…
या कडव्यात कवीने भूमिपुत्रांना श्रमिकांना आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा चा इतिहास पुन्हा आठवण्यास सांगत आहेत.
इतिहासाची पाने पुन्हा चाळल्यास आपल्याला असेच दिसेल की कशा प्रकारे अन्याय अत्याचारापासून व गुलामगिरीतून सामान्य लोकांनी स्वतःची मुक्तता केली. इतिहासाच्या पानातून पुन्हा हीच स्फूर्ती घ्यावी असे कवी आवाहन करतात.
अशाप्रकारे कवी सुरेश भट यांनी सामान्य माणसांना भूमिपुत्रांना श्रमिकांना आणि ज्यांच्या ज्यांच्या वर अन्याय झालेला आहे त्यांना स्वतःच्या हक्कासाठी, लढण्यासाठी उभे राहण्यासाठी बंड करण्यासाठी आवाहन केले आहे. त्यांच्या मनात एक नवचैतन्य निर्माण केले आहे.
धन्यवाद
सौ माधवी कुलकर्णी
लक्ष्मणराव आपटे प्रशाला पुणे
फोन नंबर ७७२००७८१२८

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comments (1)

  1. Satish Brahmane

    लेख अप्रतिम आहे …चार्वाक आणि बुद्धाच्या काळापासून समाजातील विषमतेच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले ..आदरणीय सुरेश भटांनी ही त्याचीच कास धरली हे त्यांच्या विविध अश्या गजलेतून पाहायला मिळते… मानवी मूल्य अबाधित रहावी यासाठी खरोखरच वरील शब्द विचार करण्यास भाग पडतात… आपण आपल्या छानश्या लिखाणातून पुन्हा याच मुल्यांची उजळणी करण्याची संधीच दिली आहे. त्याबद्दल आपले खरोखर कौतुक आणि आभार ..👍👌💐

Comment here