Life Explained

इतिहासाची आस लावी नवनिर्माणाचा ध्यास: श्री प्रवीण पवार

सकाळी एक काल्पनिक चित्र पाहिले. हे एका मराठी चित्रकाराने स्वराज्याची राजधानी शिवरायांच्या काळात कशी दिसत असेल, याचे जिवंत चित्र काढले होते. जिवंत त्याच्यासाठी म्हटले की, चित्र इतके बोलके होते आपण जणू शिवकाळातच वावरत असल्याचा भास होत होता. काय ती भव्यता, काय तिची दिव्यता. पण आजच्या काळात या वास्तूकडे पाहिले तर जणू त्या सांगत आहेत आपल्या व्यथा. भारतात खूपशी स्ट्रक्चरल बिल्डींग आहेत जी वास्तुकलेची उत्कृष्ट असे नमुने आहेत. पण आपल्या रक्ताच्या माणसांनी आणि आपल्या राज्याने तयार केलेली, रायगडावर व राजगडावर हजारो फुटांवरची बांधकाम आपण पाहिली आहेत. आपण अगदी तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वी केले आहे. तिथे आज आपण नवीन काहीतरी निर्माण करू शकतो, ही आपल्यातली भावना पार विसरून गेलो आहे. आपली निर्माण करण्याची मानसिकता सोडून आपण आपली मानसिकता फक्त अनुकरणीय ठेवली आहे. आपण आपल्या मानसिकतेला पार लुळीपांगळी करून ठेवलं आहे. याच मातीत कधीकाळी महान पराक्रमी वीर जन्मले. यांची तुलना बाहेरील योद्ध्यांची होऊन गेली. आपल्या पूर्वजांनी आदित्य पराक्रम करून अनेक युद्ध जिंकली आहेत. आपणही त्यांचे वंशज आहोत, तेच रक्त आपल्या  शरीरात वाहत आहे. तीच आक्रमकता आणि स्वराज्य निर्माण करण्याची मानसिकता आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी. या सगळ्या गोष्टींचा आपणास विसर पडत चालला आहे. मराठी माणूस एकेकाळी निर्माता म्हणून जगात वावरत होता, तोच आता अनुकरता म्हणून गुलाम बनत चालला आहे. कारण आपण आपल्या थोरामोठ्यांनी शिकवलेली धोरण विसरत चाललो आहे. ज्याचं पुनर्जीवन करणं ही आता काळाची गरज बनली आहे.

असे का होते ह्याचा अभ्यास कधी केलाय का?

संतानी समाज प्रबोधनाचे काम केली. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केली म्हणून ते सामान्य जनतेत आपली प्रतिमा ठळक करू शकले, आणि त्यांना तो मान सन्मान प्राप्त झाला. पण त्यांच्या हयातीत त्यांनी कधीच तो स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांच्या चमत्कारांवर विश्वास न ठेवता त्यांनी केलेल्या कार्यावर आणि त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. पण आपल्याला कायम चमत्कारांच्या पाठीमागे लावून व संतानी कसे देवाचे उदात्तीकरण केले, याचे दाखले दिले गेले व खरे कार्य समाजापासून विलग होत गेले आणि आपणही कधी डोळसपणाने विचार न करता त्यावर ठाम अंधश्रद्धेने विश्वास ठेवून तसेच चालत बोलत आलो. कारण या धकाधकीच्या जीवनात आपल्याला एवढा विचार करायला वेळ नाहीये. स्वतः नवीन काहीतरी करू शकतो किंवा विचार करू शकतो ही आपली शक्ती नष्ट होत चाललेले आहे. त्यामुळे आपण कुणीतरी घातलेल्या सिस्टीम वरती विश्वास ठेवून, हीच योग्य आहे! असे समजून आजपर्यंत काम करत चाललो आहे. याचाच फायदा घेऊन बाहेर देशातील कंपन्या स्वतःच्या सिस्टीम एस्टॅब्लिश करून त्यावर त्यांचे पॅटर्न सांगत आहेत. कारण मराठी माणसाची एकंदरीत विचार करण्याची पद्धत बघितली तर आपल्याला अनुकरण करणे जास्त आवडते, निर्माण करण्यापेक्षा.!! कारण जे काही आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलं होतं, ते परकिय आक्रमणांनी नष्ट करायचं कारण हे एकमेव आहे की आपल्या मनातून निर्माण करायची शक्ती नष्ट व्हायला पाहिजे. आणि इंग्रजांनी हेच बरोबर साध्य केले बाकी समजून घेतलं तर हे समजण्यासारखे आहे.

ज्यांना आपणास संत म्हणून संबोधतो आशा लोकांनी त्यांच्या काळात लोकजागृतीचे काम केले आहे. समाजसुधारणेचा वसा घेऊन सामान्य माणसाच्या जीवनातून अंधश्रद्धा रुपी अंधकाराचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न केला आहे. पण धर्माच्या ठेकेदारांनी त्यांना देवत्व बहाल करून सामान्य माणसांना त्यांची वैचारिक शक्ती नष्ट करून चॅलेंज न करता किंवा विरोध न करता असल्या अज्ञानरूपी गोष्टी मान्य करायला शिकवले आहे. प्रसंगी साम-दाम-दंड-भेद असे सगळे अस्त्र वापरून त्यांच्या मनात भीती निर्माण केली आहे. अज्ञानातून सामान्य माणसाला भीती दाखवण्याचं काम मात्र चोखपणे पार पडत आहे आणि त्याचा गैरफायदा घेणारे घेत आहेत. अज्ञान फक्त धर्मसत्ता व राजसत्ता बळकट करण्यासाठी वापरलेले साधनच आहे. ज्याचा माणसाला सामान्य माणसाला काहीच उपयोग कधीच झाला नाही उपयोग झाला तो फक्त धर्माचा राजसत्तेचा बाजार मानणार्यांना.

त्यामुळे सामान्य मराठी माणसाने आपली वैचारिक शक्ती अशी नष्ट होऊन देऊ नये. कारण ज्यावेळी आपण आपली वैचारिक शक्ती नष्ट करतो त्यावेळी आपण कोणाच्या तरी अधिष्ठाना खाली जातो आणि आपला आपल्यावरचा आत्मविश्वास कमी होऊन आपण दुसऱ्याचा आधार शोधतो. आणि त्या आधाराला परत देव माणसाची उपमा देऊन त्याचं कर्तृत्व आणि त्याने दिलेल्या आधाराला कर्तव्य शून्य करून टाकतो.

म्हणून मला एवढेच सांगायचे आहे की अनुकरण करताना जे चांगला आहे त्यातच करावं व वाईट गोष्टींचा नायनाट करून नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी आपल्या मानसिकतेला बळ द्यावं. व आपल्या दुर्बल मानसिकतेतून एकाच सुबल मानसिकतेला जन्म द्यावा. आणि काहीतरी नवीन निर्माण करण्याच्या आपल्यामधील जिद्दीने व चिकाटीने लुळ्या पांगळ्या झालेल्या मानसिकतेला नष्ट करून सदृढ नवनिर्माण तेची वसा घेतलेली पिढी निर्माण करावी.

धन्यवाद

visit www.mahaedunews.com

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comments (4)

  1. Nice sir

  2. Suvarna Gavankar

    Nice article

Comment here