Expert Advice

कार्यकक्षेच्या पलीकडे शिक्षक विद्यार्थ्यांचे अनोखे नाते – एक अनुभव: प्राचार्य सतिश केरकळ

शिक्षक आणि विध्यार्ती यांच्यात वेगळं नातं असत. एका शिक्षकाला  इमोशन्स आणि शिस्त ह्या दोन्हीचा समन्वय साधावा लागतो. हि बाब जितकी सोपी वाटते तेवढी नसते. दोन्हींचा समतोल साधत असताना बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. विध्यार्ती ह्या वयात बऱ्याच वेळा गोंधळलेल्या परिस्थितीत असतो. त्यांना समजून घेणे आणि त्याच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर त्यांना समजेल अश्या सोप्या पद्धतीने त्यांना सांगणं हे एक challenge  असत. अश्याच एक वेगळ्या परिस्थितीतून मला एकदा जावं लागलं आणि हा तो मी माझ्या आयुश्यातला एक सुंदर अनुभव समजतो.  ती घटना घडल्या नंतर मात्र मला शिक्षकाच्या जबाबदारीची जाणीव जास्त होऊ लागली.

मी तेंव्हा शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर येथे कार्यरत होतो. हिवाळी परीक्षा २०११ चा तो प्रसंग मला अजूनही लक्षात आहे. सकाळी ९३०-१२३० या कालावधीत प्रथम वर्ष डिप्लोमा चा पेपर सुरु झाला होता, मी प्राचार्य तथा  मुख्य प्रभारी अधिकारी या नात्याने सर्व परीक्षा खोल्या मध्ये एक राऊंड घेऊन कंट्रोल केबिन मध्ये कामाचा आढावा घेत बसलो होतो. सगळी कडे परीक्षेचे वातावरण, आणि सर्वाच्या हालचाली तुन ते जाणवत हि होत. कुणी लास्ट revision  करतय तर कुणी शेवटचा प्रश्न विचारतय तर कुणी शांतपणे देवाचं नाव घेत फिरक्या घालतय तर कुणी मित्रांच्या घोळकयात कोणते प्रश्न येतील ह्याची चर्चा करतय.

हे सर्व चालू असताना साधारणतः १००० वाजले असतील तेंव्हा कंट्रोल कॅबीन शेजारील वर्ग क्रमांक ४ मधील एक विद्यार्थी वर्गातून घाईने बाहेर जाताना दिसला. माझे लक्ष घड्याळाकडे गेले असता असे लक्षात आले की नुकताच अर्धा तास पूर्ण झालेला असून, हा विद्यार्थी हॉल मधून का बाहेर पडला असावा? परीक्षा तर चालू झाली होती आणि लगेच घाईने इतक्या लवकर कुणी हॉल मधून बाहेर पडत नाही. मला शंका तर आलीच होती पण कोणत्या कारणाने तो बाहेर पडला ह्याची मला चौकशी करायची होती.

तेवढ्यात माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले की ” धिंदळे पकड पकड ” प्रत्यक्षात तो विद्यार्थी खाली कोसळत होता. आमचा शिपाई धिंदळे त्याला पकडे पर्यंत तो विद्यार्थी खाली कोसळला होता. चेहऱ्यावरती प्रचंड ताण आणि कपाळावर्ती आट्या पाडून तो खाली बसला होता. मला पाहिल्या पाहिल्या तो जरा जास्त घाबरला आणि मान खाली घालून मोठ्या धापा घेऊ लागला. मला काय घडल असाव ह्याची उत्सुकता लागली होती, आजारी तर नाही ना, मनातल्या मनात ऍम्ब्युलन्स बोलवावी लागेल कि काय ह्याची धास्ती लागली. त्यामुळे मी घाईने त्याच्या कडे निघालो.

मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला व्हरांड्यात ठेवलेल्या बेंचवर बसवले, पाणी प्यायला दिले आणि विचारपूस केली कि काय प्रॉब्लेम आहे, त्याने माझ्या कडे पहिल आणि एकदम शांत झाला. त्याच्या देह बोली वरून माझ्या लक्षात आले होते कि तो माझ्याशी काहीही बोलणार नाही (खरे कारण असे होते कि त्या वेळेस माझा अत्यन्त कडक शिस्तप्रिय असा दरारा होता त्या मुले सर्व विद्यार्थी मला खूप घाबरत होते, म्हणून हा विद्यार्थी मला काहीही सांगू शकणार नाही हि बाब माझ्या लक्षात आली होती ).

त्याच क्षणी मला समोर प्रथम वर्षाला शिकवणारे प्रा सुरनर हे दिसले त्यांना मी हाक मारली आणि सदर विदयार्थी अडचणीत आहे त्याला काय होतेय ते पहा असे सूचित केले. त्या विद्यार्थाला आम्ही दोघांनी मिळून शांत केलं, त्याची समजूत काढण्याचा  प्रयत्न केला, पाणी दिल, चहा आणि नशत्या ची सोय सुद्धा केली. थोडी चौकशी केल्या नंतर लक्ष्यात आलं कि सदर विद्यार्थी मुलांच्या हॉस्टेल मध्ये राहतो आणि अभ्यासात सुद्धा हुशार आहे. पण काही दिवसं पासून तो आजारी आहे आणि त्यामूळे त्याचा अभ्यास झाला नाही. शारीरिक आणि मानसिक तर तो खूप खचलेला होताच पण अभ्यास झाला नसल्या मुळे तो अत्यंत टेन्शन मध्ये दिसत होता.

पेपर नाही देण्याचं त्यांनी ठरवलं होत, त्याला खात्री होती कि तो पेपरला बसला कि नक्की नापास होणार. गोंधळलेल्या त्याच्या मनाची स्तिथी मला लक्षात आली होती.  अभ्यास झाला नसल्या मुळे त्याला परीक्षेचा तिरस्कार वाटत होता. कोणत्या हि प्रकारचा आत्मविश्वास त्याच्या मध्ये शिल्लक न्हवता. त्याला समजवून सांगून त्याला लगेच समजेल अशी त्याची परिस्थिती न्हवती. मि त्याला समजवणयाचा फ़ार प्रयत्न केला पण तो काहीही ऐकत न्हवता.

त्या नंतर मी परत त्या विद्यार्थ्याकडे गेलो त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला कि तुझा स्टडी झाली नसली तरी ३ तास वर्गात बस जेवढे येत तेवढे लिहीतरी. त्यावेळी मला पहिल्यांदा जाणीव झाली कि धृढ निश्चय केलेल्या विद्यार्थाला  समजवून सांगणं किती अवघड असत. कसल्याही परिस्थितीत मला त्याला समजावून सांगायचंच होत. मला खात्री होती कि तो परीक्षेच्या हॉल मध्ये पेपर द्यायला बसला कि त्या भीतीतून तो बाहेर पडेल. अश्या वेळी नेमकं कोणत्या प्रकारचं मोटिवेशन काम करत, काय केल्यास त्याची मनःस्थिती पूर्व पदावर येईल ह्याचा विचार मला करावा लागला. भीती ह्याची जास्त होती कि काही बोल्ल्यास त्याची स्तिथी अजून बिघडायला नको. थोडा वेळ माझ्या डोळ्यानं समोर अंधकार सा आला, अश्या परीस्थित काय करावे हे सुचेनासे झाले, आपण कितीतरी प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडतो पण कधी एवढी मोठी अडचण झाली नाही. कारण हा  निर्णय विध्यार्थ्याच्या आयुष्याशी निगडित होता.

पण मी ठरवलं होत कि त्याला कसल्या हि परिस्थितीत परीक्षा द्यायला लावायची. मी सुरनर सरांना बाजूला घेऊन सांगितलं कि त्याला माझी धाक दाखवून परीक्षेला बसवा. नाही तरी माझी कडक प्राचार्य म्हणून ख्याती होतीच. त्याचा फायदा कदाचित होऊ शकतो. पण हे काम मी करणार नाही सर तुम्हाला हे करावं लागेल. कोणत्याही प्रकारे अति रागवणे झाले नाही पाहिजे पण एक आदरयुक्त भीती मात्र निर्माण झाली पाहिजे. कोणताही दुसरा पर्याया त्याला सुचला नाही पाहिजे, आणि परीक्षेला बसल्या शिवाय गत्यंतर नसल्याची जाणीव झाली पाहिजे. आणि सुरनर सरानी सदर विद्यार्थ्याला ठासून सांगितले कि प्राचार्य तुला बाहेर जाण्याची परवानगी देणार नाहीत. तुझ्या कडे कोणता हि दुसरा पर्याय नाही त्यामुळे तू पेपर द्यायला हॉल मध्ये जा. शेवटी तयार झाला हेच आमचे मोठे यश आम्हाला मानावे लागले. त्यानंतर सदरं विद्यार्थी साधारणतः १ तास वर्गात  अक्षरशः झोपला  आणि मग थोडा फ्रेश होऊन पेपर सोडवू लागला.

४५ दिवसानंतर MSBTE चा  निकाल जाहीर झाला आणि एक विद्यार्थी सुरनर सरांसोबत माझ्या केबिन मध्ये आला (सदरं घटना मी विसरलो होतो). काही हॉस्टेल प्रॉब्लेम आहे की काय असे मी विचारलं. सदरं विद्यार्थी प्रथम पाया पडला आणि पेढे देत बोलला सर मी सर्व विषयात पास झालो. Physics च्या पेपरच्या दिवशी सुरनर सर आणि तुम्ही जर मला प्रोत्साहन हिम्मत आणि वडीलकीच्या नात्याने Counselling केले नसते तर माझा पेपर नक्कीच राहिला असता पण तुम्ही दोघांनी मला योग्य वेळी माझे counselling  केले आणि त्यावेळी मला हिम्मत मिळाली. Thanks Sir. त्या विध्यार्थिचा आत्मविश्वास पाहून मनाला आम्हाला समाधान वाटलं. छोटे छोटे निर्णय किती महत्वपूर्ण असू शकतात आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा ठसा उमठू शकतो ह्याची जाणीव मात्र आम्हाला झाली.

त्या दिवशी आम्हाला कळाल कि शिक्षक हा वर्गापुरता मर्यादीत नसून त्याची खरी कार्यकक्षा वर्गच्या बाहेरही असते.

The author is Head of the Department, Civil since 26 years and officiating Principal for more than 15 years

for more such articles visit www.mahaedunews.com. you can also share your experience by sending articles to mahaedunews@gmail.com

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comments (112)

 1. प्रा. डॉ. सुहास नित्सुरे

  छान लिहिलंयस आणि अनुभवही वेगळाच आहे. माझ्या महाविद्यालयातील अनुभवावरून सांगतो: शिक्षकाला विद्यार्थी-विद्यार्थिनींशी मित्र/मैत्रीण,गुरु, भाऊ, वडील अशा अनेक नात्यांचं योग्य मिश्रण करुन वागावं लागतं.

 2. Worth reading

 3. Proud of you sir. Great work by you and Surnar sir. Motivation from you is always inspiring us. Great person like you contributing in progress of Maharashtra Technical Education.

 4. आदरणीय सर ,असे किती तरी अनुभव असतील कि ,तुमच्या कधी कडक शिस्तीने किँवा पाठीवरून हात फिरवून नाठाळ विद्यार्थी सुद्धा यशस्वी होऊन चांगल्या पदावर नोकरी करत असतील .वरील तर एकच उदाहरणं आहे सर .

 5. Shridhan Panchal

  GPR ला असताना असाच दरारा होता आपला.पण जस कॉलेज झाल त्यानंतर आपल्याशी संवाद झाला.तेव्हा मी माझ्या सोबत्याशी बोलत आहे की काय असच वाटत हल्ली.तुमच्याशी वैयक्तिक विषयावर आजवर बोल्लो,सल्ले घेतले.
  सर तुम्ही ग्रेट आहात.आपला हा लेख तर त्याच प्रेमापोटी शिस्तीचा दाखला देतोय.

 6. Rajanish Shrikant Pise

  खूपच छान अनुभव. मनाला भिडणारी साधीसुधी, सोपी सरळ भाषा.

 7. सर, तुम्ही एक प्रगल्भ शिक्षक आणि अनुभवी प्राचार्य म्हणून ख्यातनाम आहात. तुम्ही विद्यार्थीच नव्हे तर नवीन शिक्षकांच्या पिढीचेही मार्गदर्शक आहात. आपण या निमित्याने कथन केलेला अनुभव नवीन पिढीला नक्कीच उपयोगी पडेल.

 8. Nice management is for healthy for human being.
  really Sir.

 9. Shivaji Sakhalkar

  Sir,
  Motivational for all teachers.
  👍👍🙏🙏💐💐

 10. Great example of situational management by the Leader….

 11. Dr Dinesh Gupta

  Kerkal sir asech aahe. Very good by heart and a great human being. Very few people like him you shall come across. People like him make this world livable.

 12. अनुभव, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

 13. Dr Dinesh Gupta

  One of the very rare species teacher. Hard to find.

 14. Dear Sir
  You are a great teacher. The technical education has benefited from your work in teaching , learning and administration.

  Please continue to guide to make India a great country again!

  Sagar Paseband

 15. Mahendra Ingale

  It’s very touching!
  Prof. Satish Kerakar is a marvelous teacher; more than that he is a good human being.
  He has always inspired not only students but also the teachers in the technical education department.
  He is connected to more than 10,000 persons through social media, puts motivational clips, shares experiencs, remembers birthdays, sends birthday wishes and makes their days memorable.
  I wish him all the best to continue this noble work!
  Dr. Mahendra Ingale
  Principal (officiating)
  Government Polytechnic, Jalgaon

 16. Sanjaykumar s jain(Bujurge)

  R/Sir.
  Great work sir.
  We are proud of you
  Really we have experienced your excellent teaching..GPND batch 1989.
  .your are Dronachrya ..
  Salute to your work integrity..
  Thanks.
  Sanjay jain(Bujurge)

  • Thanks Dear Sanjay for expressing yourself on this platform, it’s the imbibed feelings for years you have stored in your heart, which got a platform to express. God Bless

 17. Very well written sir…

 18. Very well written sir, as a student can identify with our teachers contribution in our lives, in all these minor situations.

 19. अतिशय स्तुत्य प्रयत्न! नियमित प्रशिक्षणाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना भावनिक प्रोत्साहन देण्याची व त्यांच्यातील विश्वास जागवण्याची गरज या उदाहरणाने अधोरेखित केली आहे. या निमित्ताने शिक्षकांच्या कार्यकक्षेची व्याप्ती केवढी मोठी असू शकते त्याची प्रचिती आली. सर, आपले कार्य व अनुभव अलौकिक आहेच, पण आपल्यातील सह्रदय माणसाचेही दर्शन या प्रसंगाने घडवले. मनस्वी शुभेच्छा!

  • Aniruddha Wagire

   आदरणीय केरकळ सर, अतिशय सुंदर लेख आहे. नेहमीच आपण आपल्या अनुभवातून माझ्यासारख्या तरुण अधिव्याख्यातास मार्गदर्शन करीत आला आहात. त्या बद्दल आपले मनापासून आभार. ह्या लेखामधून ही आपण शिक्षकाला चांगल्या कामासाठी कार्यकक्षेची मर्यादा नसतात हेच सांगितले. सर आपल्या प्रेरणे व प्रोत्साहन मुळे अनेक शिक्षक व तरुण मंडळी उत्साहित होतील. अनेक अनेक धन्यवाद सर.

  • Thanks Dear Girish for expressing yourself on this platform, it’s the imbibed feelings for years you have stored in your heart, which got a platform to express. God Bless

 20. Nilambari Devarkar

  Sir you are the inspiration source for not only students but also staff. I am fortune one who cross the path too. The way you tell people, inspired them, boost the confidence of students, faculties too. खुप सुंदर .so many things we are learning from you. Ani nakkich students la nehmi motivate kelech pahije that’s our prime role. Motivation is the key of success must say.
  Thank you for sharing this incidence.
  Waiting for much more experiences in your experience pipeline.. You can say greedy for that. 😇.as we are eagerly waiting for that when you share another incidence. Thank you sir.

  • Thanks again Dear Madam for your lovely feelings, It just needs inner urge to excell in whatever the path you have chosen, Teaching is One of the Noble profession where you are at liberty to develop you and people around you, maybe students, colleagues, supporting staff, stakeholders at large, with Passion, Grab every possible opportunity with both hands and then Sky is the LIMIT

  • Sanjay P. Dikshit

   This is only one incidence you mentioned about inspiration and motivation to student.
   You are the leader in mentoring,guidance and councelling to students as well as faculty.l observe this no. Of times during your stay as HOD Civil at GP Dhule.

 21. LOKESH UTTARWAR

  Satish very well written. Proud of you

 22. 👏👏
  Really Sir,
  Some things seems small but it change students life very impactfully.

 23. Vishwajeet Thakur

  Respected Sir,
  You are effective, effective & effective
  You never left any scope for side effects
  And it definately make major & drastical changes in almost any type of students

  We are the witness,
  We are the beneficiaries,
  We will follow you forever
  Due to your valuable guidance we successfully completed our assignments and journey is still going on.
  Feeling very lucky we were your student

  Great salute to you sir

  G P Dhule 2002 Civil Batch

 24. शिक्षक म्हणजे शिस्तप्रिय क्षमाशील व कर्तव्यदक्ष हे तिन्ही गुण आपल्या मध्ये असल्याने त्या पदाला साजेशे काम सर आपल्याकडून नेहमीच पहायला मिळाले. सर्वगुणसंपन्न असा आपला प्रशासकीय पदाचा अनुभव आम्हास नेहमीच प्रेरित करेल.

 25. Ninad Sonawane

  Very insightful sir

 26. Nandkishor Andhale

  आदरणीय केरकळ सर, खूपच छान वर्णन केले आहे प्रसंगच. ऑगस्ट 2011 ला आमच अ‍ॅडमिशन झाल आणि नंतर तुमची बदली झाल्याने साधारणपणे एक वर्षच तुमच मार्गदर्शन लाभले पण तेवढ्याच कालावधीत लागलेल्या कडक शिस्तीने जीवनात खूपच बदल झाला. असच मार्गदर्शन करत रहा.

 27. One needs timely advice and guidance… Sir, the mentoring example you have put thought is really required in society…. plZ pen down many experiences you have … it really helps n motivates 👍

  • Welcome Dear Ajinkyan, Thanks again for your lovely feelings

   • As l have written earlier, Sir again salutes to your performance of duties par excellence.

   • सर खूप छान पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांच्या गोंधळलेल्या मनावर हळुवार फुंकर घालून त्याला सावरले.. खुपच छान..

 28. Dr Mohankumar Hampali

  👌🏼👏🏼👍nice experience share ..Straight from the heart to others.

 29. सर तुमच्या सारखे सकारात्मक दृष्टीकोन ठेवणारे व्यक्ती गुरू म्हणून मिळाले की विद्यार्थ्याचेच नाही तर तुमच्या बरोबर काम करत असलेल्यानं ही त्याचा किती फायदा होते हे मी जवळून अनुभवले आहे. Hats off to you sir.🙏🏻🙏🏻🙏🏻

 30. आदरणीय सर,
  सद्य स्थितीत सर्व शिक्षकांसाठी मार्गदर्शक लेख 👍👍

 31. सुरेंद्र सैंदाणसिंग

  सुंदर लिहिले आहेस. खरय विद्यार्थ्यांना मानसिक अस्वस्थ असतांना योग्य मार्गदर्शन व धिर देण्याची गरज असते.

 32. Shrikant Phule

  Great work.Very rarely found these days.

 33. Mohan W Shirbhate

  सरजी 🙏🙏🙂🙂
  Situation handled 👌👌 nicely
  To you…. your presence of mind, maturity……… मान गये सर
  👍👍🙏🙏🙂🙂💐💐💐💐💐

 34. Mandar Rajurkar

  I personally have experienced Kerkal sir’s motivativating and helpful nature. He is always ready to help the needy. Also have heard his exam stress/time management, career guidance lectures on radio and other channels. Wonderful and ground to earth motivator !!

 35. Pankaj Salunke

  Satish Kerkal is one of the most honored professors by the students. He with his unique teaching capabilities and strong connection with students win hearts of all students.

 36. आदरणीय सर आपण GPA मध्ये असतांना आपली प्रेरणा व प्रोत्साहन या मुळे विद्यार्थीच काय आम्ही सर्व कर्मचारी व अधिकारी देखील अतिशय उत्साहाने कामे करीत आहोत.

 37. Dr. V. H. Mankar

  What an example of leadership who believes in leading from front. Your are true inspiration not only to the various batches of students but to teachers like us. We know it for sure that whatever you do you live by an example. Your posts always creates a positive vibe. Unfortunately I could not work with you but certainly you have occupied a space in our heart. Great going sir. Awaiting to listen many more things from you.

 38. 👌👌👍🏼शिक्षक म्हणजे शिस्तप्रिय क्षमाशील व कर्तव्यदक्ष हे तिन्ही गुण आपल्या मध्ये असल्याने त्या पदाला साजेशे काम सर आपल्याकडून नेहमीच पहायला मिळाले .सर्वगुणसंपन्न असा आपला प्रशासकीय पदाचा अनुभव आम्हास नेहमीच प्रेरित करेल . आपल्‍या प्राचार्य पदाच्या कालावधीमध्ये अधिकारी / कर्मचारी नाराज झाला असे कधीही पाहण्यात आले नाही तुमच्या कामाची अफाट इच्छाशक्ती आम्हास प्रेरणा वाटते.

 39. डॉ. अविनाश होसमनी

  फारच छान सर. खरं तर शिकवण्या पलिकडे जाऊन आपण जी मदत विद्यार्थ्यांना करतो तीच त्यांच्या जास्त लक्षात राहते. तुम्ही चांगले प्रशासक आहातच पण त्यापेक्षा चांगले शिक्षक आहात, मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे.

 40. शिक्षकाने दिलेला धीर,कौतुकाने पाठीवर मारलेली थाप जसे त्या विध्यार्थ्याला प्रोत्साहित करते तसेच अगदी करड्या नजरेने व खणखणीत आवाजात केलेला हितोपदेश पण त्याला योग्य मार्गावर आणून त्याच्यामध्ये दडलेली प्रतिभा बाहेर आणू शकतो व त्या विद्यार्थ्यांसाठी कलाटणी देणारा क्षण होऊ शकतो हेच ह्या घटनेने दाखवले…माझ्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर मध्ये काम करताना तुमच्या शिस्तप्रिय स्वभावाची जशी प्रचिती आली तशीच तुमची विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी सुरू असलेली निरंतर तगमग पण मी व इतरांनी पाहिली व अनुभवली आहे…. विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या बद्दल भीतीयुक्त आदरापेक्षा आदरयुक्त भीती जास्त असायची..विद्यार्थ्यांना शिस्तीची जाणीव करून देऊन व प्रसंगी कठोर वागूनही त्यांच्या मनात आपल्याविषयी आदरयुक्त प्रेम निर्माण केले जाऊ शकते हेच तुमचा हा अनुभव सांगतो..नकळत भूतकाळात घेऊन गेलात तुम्ही.धन्यवाद सर😊

 41. माननीय सर,
  लेख वाचला , अप्रतिम
  आपणासारखी व्यक्ती मला शासकीय तंत्रनिकेतन अवसरी येथे प्राचार्य म्हणून लाभली हे मी माझे भाग्य समजतो.
  आपल्या नेतृत्वा खाली काम करताना आपल्या कामाचा उत्साह व विस्तृत कक्षा मला नेहमीच जाणवली.कोणत्याही अडीअडचणीच्या प्रसंगी आपण आपल्या अनुभवाची शिदोरी नेहमीच आमच्या साठी रीती केलीत.आज मितीस मी मुंबईत आहे परंतु पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाखाली काम करायला नक्कीच आवडेल.
  परमेश्वर आपणांस उदंड व निरोगी आयुष्य बहाल करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

 42. Chandramohan Hangekar

  केरकळ सर, आपण मला माझ्या कॉलेजमधल्या विद्यार्थी दशेतील आठवण करून दिलीत.
  माझ्याही बाबतीमध्ये असाच प्रसंग घडला होता. योगायोगाने मलासुद्धा असेच चांगले प्रोफेसर मिळाले होते. त्यामुळे माझेही वर्ष वाचले. त्या प्राध्यापकांना मी कधीच विसरू शकत नाही.

  तुम्ही जे लिहिले आहे ते खूप महत्त्वाचे आणि भावनाप्रधान आहे. आजकालच्या विद्यार्थ्यांना हे समजले तर फारच चांगले होईल.

 43. Great sir. You are awesome. Keep up the great work.

 44. Shruti Prabhakar Jadhav

  शिक्षक आणि विद्यार्थी यांमध्ये नातं कस जपलं पाहिजे, याचे मार्गदर्शन तुम्ही अगदी साध्या सरळ आणि स्वअनुभवातुन केले आहे. खरतर आजच्या तनावग्रस्त युगात अशा मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. याची अंमलबजावणी जर प्रत्येक शिक्षकाने केली तर नक्कीच विद्यार्थ्यांचा मानसिक तणाव कमी होऊन उज्वल भविष्याकडे त्यांची वाटचाल सुरु होईल. आणि पदोपदी तुम्ही हे मार्गदर्शन करतही असतात. अशी दोन व्याख्याने मी तुमची ऐकली आहेत. ती दोन्हीही अतिशय उत्तम होती. असेच वारंवार तुमचे मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावे हिच इच्छा..

 45. Great reading Sir. Congrats & thanks for sharing a wonderful article. Nicely composed. Regards,

 46. महेश सुदाम देवरे

  “केळकर सर”….शा.तंत्र.धुळे….सन २००४-५ ची घटना…वर्गात १२ वी नंतर कोण डिप्लोमा करतोय का? आणि किती गुण होते १२ वी ला ? मी १२ वीत नापास झालो म्हनुन डिप्लोमाला प्रवेश घेतलाय सर…….यानंतर सर तुम्ही माझा ब्रेनवॅाश करून आत्मविश्वास वाढवला (कदाचित तुम्हाला आठवतही नसेल)…..मी अभ्यास सुरू केला…..शेवटच्या वर्षात सुदैवाने काॅलेजात प्रथम आलो……..मग बी.ई…….मग गेट परीक्षा…..मग एम.ई.स्ट्रक्चर……मग एम.पी.एस.सी………आज मागे वळून बघतांना तुम्ही माझ्या वाढवलेल्या आत्मविश्वासाचे या प्रवासात महत्वाचे योगदान आहे सर…..अजुनही खुप टप्पे गाठायचे आहेत सर…….. Thank You 🙏

 47. Manthan Mohite

  such a great learning from your experience,
  Sir you are always my motivation from college and the way which u give suggestions that really helps us in our daily and corporate life.
  (GPA student Auto dept)😊

 48. Dear sir,
  What should i write @ u. Since the time we haven’t physically meet, u know me and u have been tracking me for my well-being. I sincerely appreciate that and thank u from bottom of my heart.

  U have unique ability to score goal in any situation. I have been hearing ur success stories from one and all, which tells me that, u were not only strict and disciplined but a kind, matured and responsible soul. Many of ur students must be thanking u for making them what they are today.

  Its a small incidence u narrated here but u r an ocean of knowledge and experience and u never hesitated even a bit to share that. Anyone who has been groomed under your wings has to be ur replica.

  I wish u good health and plethora of happiness. Stay blessed and may sorrows never cross ur path.

  Warmest Regards
  Bhaskar Bade

 49. Er. Kishor Bhise

  प्रिय मित्र सतीश , लहानपणापासूनचा प्रामाणिकपणा, तडफदार आणि उत्तम व्यक्तिमत्व ह्या जोरावर सगळी उंच शिखर पादाक्रांत केलेली आहेत. समोरच्या विध्यार्थ्यांना कसे हाताळायची कसब अपणाशिवाय कोणाकडे असेल आयुष्य भर विधर्थ्यांना चांगल्या मार्गाने जाण्याची शिकवनाच सगळ्या मुलांचे कल्याण करत आहे, चांगल्या कार्याबद्दल अभिनंदन

 50. Kashiram jadhav

  👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐

 51. Vivekanand Kulkarni

  This experience to u sir,is like “”Learning By Doing And Seeing is Believing.””

 52. सर मी 2010 ला नुकतंच प्रवेश घेतलेला…
  कॉलेजला नविन होतो…पार्किंग मध्ये बसलेलो…आणि अचानक मुलाची धावपळ सुरु झाली….केरकळ सर आलेत म्हणत सर्व १५ सेकंद मध्ये जिकडंतिकडं…मला तेव्हा खूप भिती वाटायची तुमची…पण स्नेहसंमेलनमध्ये तुमचा एन्जॉय आणि गाणे ऐकून भिती कमी झाली…तुम्ही नारळासारखे आहात…बाहेरून कडक दिसत असला तरी आतून मऊ….

 53. kerkel sir
  Narration of your one of the experiences towards dedication about students is really inspiring to all. Few teachers are there who could iunderstand the students. You are one of them. Our small act without any expectation always be a role model for others.
  I must appreciate your this act and salute you as you are one of the worriers who ever fought for the betterment of the students. Keep itup!

 54. Girish Jadhavrao

  Firstly Thanks to u & Surnar sir for handling situation positively & awesomely…

  This incident also calls for “Result of effective Communication” in my view. Which is ur key skill in human handling.

  Also it shows ur आत्मीयता about ur profession. (I wrote that word particularly in Maratahi because that word pressure shows more in Marathi). My boss always say that u should hv this in you then whichever field u r working.

  Hats off sir…

  Keep on sharing such positive & motivating incident… Which increases our knowledge too…

 55. I am proud of you sir.
  And Really appreciate your efforts towards growth of whole institution n such a experience share by u is one of them

  Regards
  B M Deore

 56. Great one sir 🙏🏻👌🏻, We have learned soo many things from you through many of such incidents. 👍🏻

 57. महेश सुदाम देवरे

  Your comment is awaiting moderation.
  महेश सुदाम देवरे April 26, 2020 at 8:54 am
  “केळकर सर”….शा.तंत्र.धुळे….सन २००४-५ ची घटना…वर्गात १२ वी नंतर कोण डिप्लोमा करतोय का? आणि किती गुण होते १२ वी ला ? मी १२ वीत नापास झालो म्हनुन डिप्लोमाला प्रवेश घेतलाय सर…….यानंतर सर तुम्ही माझा ब्रेनवॅाश करून आत्मविश्वास वाढवला (कदाचित तुम्हाला आठवतही नसेल)…..मी अभ्यास सुरू केला…..शेवटच्या वर्षात सुदैवाने काॅलेजात प्रथम आलो……..मग बी.ई…….मग गेट परीक्षा…..मग एम.ई.स्ट्रक्चर……मग एम.पी.एस.सी………आज मागे वळून बघतांना तुम्ही माझ्या वाढवलेल्या आत्मविश्वासाचे या प्रवासात महत्वाचे योगदान आहे सर…..अजुनही खुप टप्पे गाठायचे आहेत सर…….. Thank You 🙏

 58. Sanjay Prabhakar Dikshit

  This is only one incident out of many you mentioned about inspiration and motivation to student given by you .
  .you are the leader in mentoring,guidance and councelling to students as well as faculty.I observe theseno. Of times during your stay as HOD Civil at G.P.Dhule.

 59. Res.Kerkal Sir
  Nicely written experience.What stands out from your writing is your positive attitude and motivational skills.
  You not only teach soft skills to students but you yourself practice them in professional field.
  Teaching position is a position of trust.Parents entrust teacher to mould and take care of young minds.Your action is best example of educating and inspiring students to come out from stressful and depressing situations.
  Best Wishes.
  RR SARAF

 60. आदरणीय,
  मा. केरकळ सर ,खरोखर एक सुंदर व्यक्तिमत्व, तुम्ही सर्वानी सरांबद्दल चा अनुभव खूप चंगल्याप्रकारे सांगितला तसाच अनुभव सरांबद्दल चा मला सुद्धा आला आहे .खर तर अशा व्यक्तींचा आपल्या आयुष्यात थोडं का होईना पण सहवास

  लाभलं हे च माझ्यासाठी खूप काही आहे. माझे वडील शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथे कार्यरत होते त्यामुळे माझा
  लहान पानापासून या संस्थेचा एक jivvalycha संबंद आहे .सर 2014 ला G.P.Ratnagiri चे प्राचार्य होते .तेव्हा मी काँट्रॅक बेस वर security guard म्हणून कार्यरत होतो. एकदा सर ओल्ड बिल्डिंग मधून न्यू बिल्डिंग आले तेंव्हा मी त्यांचा समोर हात खिशात घालून उभा होतो सर खूप शिस्तप्रिय होते त्याना ते नाही आवडलं मला थोडा दम भरून सुनावलं .मला तेंव्हा माझी चूक समजली.नंतर नेहमीच सरांबरोबर माझा खूप परिचय झाला. नंतर मला समजलं की सर शिस्तीच्या बाबतीत खूप स्ट्रीट आहेत पण तेवढेच खूप प्रेमळ आहेत. योग योगाने माझं भाग्य सुद्धा समजू शकतो मी. की सरानी आणि साळुंखे सरानी माझ्यकडे नेहमी जेवणाचा डबा नेहमी मिळेल का अशी विचारणा केली पैसे काय असतील ते देऊ आम्ही. अस सांगितलं पण सरानी आपल्या कडे मेस लावली हेच माझ्यासाठी खूप काही होत.सरांचं जेवण सुद्धा शिस्तीप्रमाणेच लिमिटेड होत. एक आठवडा झाला की सर स्वतःहून पैसे देयचे .हे त्यांचं रुटिंग चालू असायचं काही मुलं लेक्चर चालू असताना खूप स्पीड ने बाईक घेऊन हॉर्न वाजवत संपूर्ण परिसर डिस्टर्ब करायचेत मग अशा मुलांना सर उठाबशा कडाईला लवायचेत मग खूप समजून सांगायचे.सरानी शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी ला खूप चांगली शिस्त लावली आणि खूप प्रेम ही दिल. खूप सुंदर दिवस चाले होते.पण एक दिवस माझ्या आयुष्यात कधी होणार नव्हतं ते झालं .माझी मिसेस ला रायगड जिल्हापरिषद, ला नोकरी लागली आणि मला आपलं G.P.Ratnagiri khup वर्षांनी सोडावं लागणार होतं.मी सर्व जाण्याची तयारी सुद्धा केली पण घरसामान नेण्यासाठी गाडी भाडं खूप लागणार होतं आम्हाला पगार तेवा खूपच कमी होता मी सरांना लास्ट चा डबा दिला सरांना माहीत नव्हतं की मेस आजपासून बंद होणार . मी सरांना मिसेस नोकरीला रायगड ला लागली आहे अस सांगितलं सरानी खूप मनपूर्वक अभिनंदन केले .मी धन्यवाद केले आणि मग सरांना खूप घाबरत सांगितलं की सर उद्यपसून डब्बा नाही भेटणार मी सुद्धा नोकरी सोडून जात आहे .
  .तेंव्हा सरानी तिकडे जाऊन तू कास काय करणार वगरे विचापुस केली.आणि मेस चे सर्व पैसे देऊन म्हणाले प्रवासासाठी पैसे वगैर लागणार आहेत का मी तेव्हा नाही म्हणालो पण दुसऱ्या दिवशी गाडी भाड्यासाठी पैसे जमत नव्हते तेंव्हा मात्र सरांकडे पैसे मागण्याशिवाय काहीच पर्याय मला दिसत नव्हता .मी सरांकडे माझा प्रोब्लेम सांगितलं सरानी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चालत जाऊन एटीएम मधून पैसे आणून मल दिले.म्हणाले अजून लागणार आहेत का .मी खाली मान घालून मान हलवत नको म्हणलो. सरांना मी म्हटले की सर मी तिकडे गेलो की देईन परत . सर म्हणाले तुम्ही आदी दोघे पण नोकरीत वेल सेटल करा.मग द्या पैसे.मी जड अंतकरणाने सरांचा निरोप घेऊन रायगड ला आलो.पण सरांना विसरणं खूप अशक्य होतं.मी व्हाट्सअप्प वर कधी ना कधी बोलत असे . सिरांचाच आशीर्वाद आणि ईतर खूप जणांच्या आशीर्वादाने,देवाच्या कृपेने माझ्य आयुष्यात परत प्रकाश आला मला G.P.Ratnagiri येथे कायमस्वरूपी नोकरी लागली आणि मी 2019 ला जॉईन झालो तेव्हा मी सरांबद्दल खूप सगळीकडे चोकशी केली पण सरांची बदली झाली अस मला समजलं. मी खूप दुःखी झालो होतो मी सरांना फोन केला त्यांचा आवाज ऐकून मला खूप खूप भरून आलं सरांना मला नोकरी लागल्याचं सांगितलं .खूप आनंद झाला . सरांची मी विचापुस केली पण माझ्या पायाखालची जमीनच सरकली ,सरांना pyra लेसिस अटॅक येऊन गेला .तरीही सर नेहमी सारख खूप सुंदर बोलत होते.पण तरीही खूप खूप हर्ट झालो .सर आमचं आयुष्य पण तुम्हाला लाभुदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना..

 61. Great Sir ji .
  You have always helped students.
  Your guidance is always helpful to all the students in their studies and all walks of life 🙏

 62. You have always performed your duties par excellence and sincerely.
  Other than routine duties you have always gone beyond limits to help your students.
  Your love and timely intervention has even saved lives of many depressed students who were almost going to commit suicide.
  This is a greatest award l suppose.
  Wish you all the best in your continuous noble job.
  Wish to see you with the President’s medal one day

 63. Nice sir

 64. Gahininath Kale

  साहेब ,
  आपण आदर्श शिक्षक व आनुभवी प्राचार्य म्हणून ख्यातनाम आहात. तुम्ही विद्यार्थीच नव्हे तर नवीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शक व आधार आहात. आपण कलेले कथन हे नवीन पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल

 65. Res.Kerkal Sir
  Nicely written experience.
  What stands out from your writing is your positive attitude and motivational skills.
  It shows that you are not only delivering lectures on soft skills but practising in professional field.
  Teaching profession is position of trust.Parents entrust teacher to mould and take care of young minds.
  This was best example of educating and inspiring students from stressful and depressing situations.
  Best wishes and Thanks.
  R R SARAF.

 66. खूपच छान अनुभव. This is best sign of best teacher

  Reply

 67. Feedback from my COEP Senior on my Whatsapp Messenger

  तुम्ही त्या विद्यार्थ्यांला भेटले नसते तर आणखी एक xxxxx XXXX Nirman झाला असता. मलाही पहिल्या वर्षी तुमच्या सारखे कुणी समजावून सांगितले असते तर आयुष्यात वेगळे घडले असते. असो कालाय तस्मै नम:
  🙏

  • Dr. R. M. Aghav

   Great sir. It is the inspiration for all the teachers. We are not only teacher’s but we are also parents of such students.

 68. Dilip Vasantrao Mali

  वाह सर…मनापासून शुभेच्छा तुमच्या कार्याला.🙏…we really fell proud of you dear.👍🏻

 69. Vaishali Munde

  Great work Respected Kerkal Sir !!!

 70. Nice article Sir. Heart touching.

 71. दत्तात्रय गर्गे

  सुरेख – प्रेरक लेख!!! आपल्या शिक्षकीय अनुभवांचे एक सुंदर दैनंदिन सदर होऊ शकते. 👍💐💐💐

 72. Most Honorable and Respected Kelkar Sir You are great…all Gpp Nagar team is great…wonderful post

 73. Most Honorable and Respected kelkar Sir You are simply great person ,whole GPA teacher and admin team is great.

 74. राजेश वालझाडे, नाशिक

  आदरणीय सर,
  नमस्कार,
  आपणासोबत GP A’Nagar येथिल दिवस नेहमीच आठवत असतात. भिंगार येथून नगरला येथे कॉलेज शिफ्ट केल्यानंतर अनंत अडचणी वर मात करीत कॉलेज नावारुपाला आणले. आपली शिस्त व मनातील हळवेपणा नेहमीच भावून जातो.
  अभिनंदन सर व सस्नेह हार्दीक शुभेच्छा

  • Thanks again Dear Sir…..

   For your information I am sharing one feedback received on my whatsapp post by student from GP Ahmednagar

   Great sir
   Khar sangyache tar amcha batch weles mala tumhi kadhich khup street watla nahit ulat nemhi tumhche motivation & students la samjun ghyachi wruti hoti .
   Aaj tumchamule tya Student cha confidence wadhla.
   Mala ajunhi athwate sir, Som subject madhe mala 91 marks padle hote tumhi maze khup kotuk kele.
   Baluja sir khup kadak hote, maza full hat bhajala hota pen tyancha bhiti mule me tya awaste pen college la yayche

   • Feedback on Facebook wall on the above article by Vasudha Ashwathpur Madam, Ex Principal GP Ahmednagar

    Mast zala ahe lekh, ha event tumhi swatahaach mala ekada nagarla join zalyawar sangitala hota, pan lekh chaan lihila aslyane sarv prasang, to student, surnaar sir, dhindale , tumhi tyachyashi bolat ahat ase sarv dolyasamor chitra ale, keep writing and motivating sir, akshay tritiyechya apalya sarvana shubhechcha. Stay safe, take care.

 75. Respected Sir, there are sooo many things to learn from you. Thank you sir. I am really great ful that I had got chance to work with such a down to earth person. Kindly post few more of your experiences, soo that it may help us young people a lot in their professional as well as personal life.

 76. Respected sir,
  Actually I was to be first to comment on this heart touching incidence of yours not only as an ideal teacher but great personality who always care for others in all aspects.We have been experiencing your love care towards students and all those whoever comes in contact with you.It gives immense pleasure to see you imparting your best for betterment of teaching profession and society as well.Salute to your great work for promoting the educational system.
  Regards.

 77. Respected Sir, there are sooo many things to learn from you. Thank you sir. I am really great ful that I had got chance to work with such a down to earth person. Kindly post few more of your experiences, soo that it may help us young people a lot in their professional as well as personal life. Thank you again sir, for all the positivity, support.

 78. Prashant Tambe

  शालेय जीवनातून महाविद्यालयिन शिक्षण प्रवास सुरु करताना आपल्या सारखे शिस्तप्रिय Management गुरु आम्हास लाभले हेच आमचे भाग्य मानतो…. लेख वाचुन काही क्षण पुन्हा एकदा GPAN प्रथम वर्षात असल्याचा अनुभव येऊन गेला… अप्रतिम सर…

 79. Sagar arun kause , GP Nagar

  आदरणीय, केरकळ सर माझ्या शैक्षणिक जीवनातील मी बघितलेले अत्यंत शिस्तप्रिय प्राचार्य, काॅलेज मध्ये सरांचा प्रचंड दरारा होता त्यामुळे काॅलेज मध्ये खुप शिस्तीच वातावरण होत… वर्गात, लॅबमध्ये कितीही गोंधळ चालु असेल तरीही सरांचा फक्त आवाज जरी आला तरी प्रचंड शांतता पसरायचीया गोष्टीमुळेच सरांच्या विषयी आम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये आदरयुक्त भिती वाटत असेया भिती मुळेच सरांपासुन जास्तीत जास्त लांब राहण्याचा मी प्रयत्न करत असे त्यामुळे सरांशी बोलण्याचा कधीसरांशी कधी संबंध आला नाहीपरंतु काॅलेज संपल्यानंतर  मागच्या वर्षी. अडचणीमुळे काॅलेज सोडण्याच्या विचारात असलेल्याएका गरीब विद्यार्थ्यांविषयी सरांशी बोललो.सरांनीआपुलकीने सर्व जाणुन घेतले. सरांशी बोलल्यानंतर सरांविषयी माझ्या मनात असणारी भिती पुर्णपणे निघुन गेली . सरांनी त्या विद्यार्थ्यांविषयी माहीती घेतली व मला सांगितले की आपण त्याला सर्व प्रकारची मदत करु तु फक्त त्याला काॅलेज साोडु देऊ नकोस . आज सरांमुळेच तो विद्यार्थी व त्यासारखेच कित्येक विद्यार्थी व्यवस्थित शिक्षण  शिक्षण घेत आहे. धन्यवाद सर. आपल्या कार्याला सलाम🙏🏻🙏🏻🙏🏻

 80. Sagar kause. ..GP Nagar

  आदरणीय, केरकळ सर
  माझ्या शैक्षणिक जीवनातील मी बघितलेले अत्यंत शिस्तप्रिय प्राचार्य, काॅलेज मध्ये सरांचा प्रचंड दरारा होता त्यामुळे काॅलेज मध्ये खुप शिस्तीच वातावरण होत… वर्गात, लॅबमध्ये कितीही गोंधळ चालु असेल तरीही सरांचा फक्त आवाज जरी आला तरी प्रचंड शांतता पसरायचीया गोष्टीमुळेच सरांच्या विषयी आम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये आदरयुक्त भिती वाटत असेया भिती मुळेच सरांपासुन जास्तीत जास्त लांब राहण्याचा मी प्रयत्न करत असे त्यामुळे सरांशी बोलण्याचा कधीसरांशी कधी संबंध आला नाहीपरंतु काॅलेज संपल्यानंतर  मागच्या वर्षी. अडचणीमुळे काॅलेज सोडण्याच्या विचारात असलेल्याएका गरीब विद्यार्थ्यांविषयी सरांशी बोललो.सरांनीआपुलकीने सर्व जाणुन घेतले. सरांशी बोलल्यानंतर सरांविषयी माझ्या मनात असणारी भिती पुर्णपणे निघुन गेली . सरांनी त्या विद्यार्थ्यांविषयी माहीती घेतली व मला सांगितले की आपण त्याला सर्व प्रकारची मदत करु तु फक्त त्याला काॅलेज साोडु देऊ नकोस . आज सरांमुळेच तो विद्यार्थी व त्यासारखेच कित्येक विद्यार्थी व्यवस्थित शिक्षण  शिक्षण घेत आहे. धन्यवाद सर. आपल्या कार्याला सलाम🙏🏻🙏🏻🙏🏻

 81. Sagar arun kause , GP Nagar

  आदरणीय, केरकळ सर माझ्या शैक्षणिक जीवनातील मी बघितलेले अत्यंत शिस्तप्रिय प्राचार्य, काॅलेज मध्ये सरांचा प्रचंड दरारा होता त्यामुळे काॅलेज मध्ये खुप शिस्तीच वातावरण होत… वर्गात, लॅबमध्ये कितीही गोंधळ चालु असेल तरीही सरांचा फक्त आवाज जरी आला तरी प्रचंड शांतता पसरायचीया गोष्टीमुळेच सरांच्या विषयी आम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये आदरयुक्त भिती वाटत असेया भिती मुळेच सरांपासुन जास्तीत जास्त लांब राहण्याचा मी प्रयत्न करत असे त्यामुळे सरांशी बोलण्याचा कधीसरांशी कधी संबंध आला नाहीपरंतु काॅलेज संपल्यानंतर  मागच्या वर्षी. अडचणीमुळे काॅलेज सोडण्याच्या विचारात असलेल्याएका गरीब विद्यार्थ्यांविषयी सरांशी बोललो.सरांनीआपुलकीने सर्व जाणुन घेतले. सरांशी बोलल्यानंतर सरांविषयी माझ्या मनात असणारी भिती पुर्णपणे निघुन गेली . सरांनी त्या विद्यार्थ्यांविषयी माहीती घेतली व मला सांगितले की आपण त्याला सर्व प्रकारची मदत करु तु फक्त त्याला काॅलेज साोडु देऊ नकोस . आज सरांमुळेच तो विद्यार्थी व त्यासारखेच कित्येक विद्यार्थी व्यवस्थित शिक्षण  शिक्षण घेत आहे. धन्यवाद सर. आपल्या कार्याला सलाम🙏🏻🙏🏻🙏🏻

 82. Dear Sir,
  This is quality of great teacher. He will never forget you in his life.
  Many a times good teacher like you makes an impact in students life. They change overall perspective.
  Sir, we are proud of you.

 83. Sagar kause.. GP Nagar

  आदरणीय, केरकळ सर
  माझ्या शैक्षणिक जीवनातील मी बघितलेले अत्यंत शिस्तप्रिय प्राचार्य, काॅलेज मध्ये सरांचा प्रचंड दरारा होता त्यामुळे काॅलेज मध्ये खुप शिस्तीच वातावरण होत… वर्गात, लॅबमध्ये कितीही गोंधळ चालु असेल तरीही सरांचा फक्त आवाज जरी आला तरी प्रचंड शांतता पसरायचीया गोष्टीमुळेच सरांच्या विषयी आम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये आदरयुक्त भिती वाटत असेया भिती मुळेच सरांपासुन जास्तीत जास्त लांब राहण्याचा मी प्रयत्न करत असे त्यामुळे सरांशी बोलण्याचा कधीसरांशी कधी संबंध आला नाहीपरंतु काॅलेज संपल्यानंतर  मागच्या वर्षी. अडचणीमुळे काॅलेज सोडण्याच्या विचारात असलेल्याएका गरीब विद्यार्थ्यांविषयी सरांशी बोललो.सरांनीआपुलकीने सर्व जाणुन घेतले. सरांशी बोलल्यानंतर सरांविषयी माझ्या मनात असणारी भिती पुर्णपणे निघुन गेली . सरांनी त्या विद्यार्थ्यांविषयी माहीती घेतली व मला सांगितले की आपण त्याला सर्व प्रकारची मदत करु तु फक्त त्याला काॅलेज साोडु देऊ नकोस . आज सरांमुळेच तो विद्यार्थी व त्यासारखेच कित्येक विद्यार्थी व्यवस्थित शिक्षण  शिक्षण घेत आहे. धन्यवाद सर. आपल्या कार्याला सलाम🙏🏻🙏🏻🙏🏻

 84. Great article by Kerkal Sir.

  शिक्षक कभी साधारण नहीं होता. प्रलय और निर्माण उसकी गोद में पलते है ।
  Best wishes for your future endeavours.

 85. सर,आपण कायमच सर्वांसाठी आदरणीय राहिलेले आहात.आपणा बरोबर ज्या ज्या वेळेस संपर्क झाला त्यावेळेस त्या त्या वेळेस आपल्या बुद्धिमत्तेची झलक आम्हाला पहावयास मिळाली आहे.शिक्षक -विद्यार्थी नातं हे खरंतर एका कुटुंबातील सदस्यांबरोबर नातं असतं तसंच असतं असं मला वाटतं.आपण एक शिक्षक आहात आणि शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी काय करायला पाहिजे याची जाणीव वरील बाबी वरून दिसून येते.आपले विद्यार्थ्यां संबंधित चे नाते असे प्रसंग व्यवस्थित पद्धतीने हाताळल्यास आणखी दृढ होत जाते व असे प्रसंग विद्यार्थ्यांच्या मनावर कायम कोरले जाऊन शिक्षका बद्दलचा अभिमान त्यांच्या कायम स्मरणात राहतो.आपण दाखवलेली समयसूचकता खरोखरच अवर्णनीय आहे. आपल्या कार्याला सलाम!!धन्यवाद!!

 86. Jaywant Jagtap

  Sir, your instanous decision making “seems to be very simly”. As you made use your image totally opposite to situation, favourable for situation and that to instantaneously…🙏🙏🙏
  As teacher (specifically Diploma) it is very difficult to work. Students are in teenage phase.
  Many a time how we need to behave with them becomes difficult. So we need to change behaviour as per situation (instantaneously).
  Always we need to be different roles such as: good actor, motivator, parent, friend…
  “…and no formula can be applied… “.

  To conclude I can say teacher has to be all rounder & if teacher is Director or Principal or Administrators then it’s too difficult…

 87. Jeevan Wankhade

  Sir,
  It was worth reading your experience and this will definitely lead as an extraordinary example for faculties like me.hope to read your next article soon.

 88. Very nice sir.. Best motivation

 89. Hanmant Tatale

  Dear Sir,

  Excellent article. Sir it’s your Honest and at par work being in this teaching profession. I got the opportunity to live with you and learn many more good things for this I thank God.

 90. Kerkal Sir,one of the most honored professor by the students and teachers.Sir has strong connection with students and wins hearts of all students.Always motivates staff and students.Thanks for being a part of GPA..

 91. Samadhan bhosale

  Dear sir.
  2011 साली मि GPAN last year ला होतो MECH DEPT .
  तेव्हा आम्ही सर्व batch मधील असेच बोल होतोत शेवटचे sem होते .
  आपण college सोडून जाणार आहोत आपल्या कडे काहीच आठवण नाही atlest एखादी certificate , tropy काही तरी पाहिजे. बाकीचे कलागुण कमी होते पन माझी कुस्ती खेळात आवड होती . त्यामुळे मि कुस्ती मध्ये भाग घेतला तेव्हा मला sport teacher मह्ननु surnar सर होते . तेव्हा suranr सर सोबत खुप चांगली ओळ्ख झाली .
  मि तालुका स्तरावर प्रथम आलो होतो
  जिल्हा स्तरावर द्वितीय
  अन राज्य स्तरीय स्पर्धा GP kolhapur ला द्वितीय आलो होतो .
  आणि annual gathering मध्ये Certificate & tropy मिळवलीच.
  i would like to specially mention mr. Deshpande sir bcoz he was also one of the best .

 92. One more feedback on the above article by a Retired Professor Prof Vasantrao Mali from Dayanand College Solapur

  Just I read the article .like it.A teacher is a person who is quite different than the other persons.He is the person who performs the role of guide friend and philosopher especially for the students.The students looked upon him as a teacher who is to explain the ideas and meaning of the concepts. But a teacher is actually more than that .Here you played all the three roles together. A strict teacher so that the student could not say any thing,secondly you tried to understand his problem as a friend and thirdly convinced him to stay in the class which would be beneficial for him for ever in future this is a role of philosopher.The conclusion is that the sympathy in you played a role light in his life. I must tell you on this occasion that very few teachers are born teachers who are interested in for whom they are appointed. Done a good job,like it.

Comment here