Events

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे राज्यस्तरीय वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे आयोजन

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे दि. २३ २४ सप्टेंबर २०२२ या दिवशी कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  मोरोपंत, पंडिती काव्यप्रकारातील सर्वश्रेष्ठ कवी म्हणून ओळखले जातात. मोरोपंतांच्या कार्याचा गौरव व्हावा व येणाऱ्या पिढीला त्यांच्या लिखाणाची ओळख व्हावी या उद्देशाने सन १९७२७३ साली बारामती नगरपरिषदेने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या सहकार्याने मोरोपंतांच्या नावे वाद-विवाद व वक्तृत्व स्पर्धा प्रथम आयोजित केली. त्यानंतर दरवर्षी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करीत आहे. सन २०२२-२३ हे या स्पर्धेचे ४९ वे वर्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या स्पर्धेतून आजपावेतो अनेक नामवंत वाक्पटू तयार झालेले आहेत. अविनाश धर्माधिकारी, अरुण ढेरे, समीरण वाळवेकर अभिराम भडकमकर इ. हे या स्पर्धेचे माजी विजेते आहेत. ही राज्यस्तरीय स्पर्धा जिंकणे म्हणजे आपल्या वाद-विवाद व वक्तृत्व कलेला सर्वोत्कृष्ठतेचा किताब मिळणे असे आज समीकरणच झाले आहे. करोना महामारीनंतर प्रत्यक्ष सभागृहात ही स्पर्धा आयोजित करताना महाविद्यालयास विशेष आनंद होत आहे. कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन स्वतंत्र गटात ही स्पर्धा आयोजिलेली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. शशांक माने यांच्याशी ९७६३८६५५५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts
  • spc
  • spc

Comment here