Career NewsSchool

बारावीनंतरच्या विज्ञान वाटा: डॉ.सागर काळाने

दहावी-बारावीचा निकाल लागला की अनेक विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेच काहूर माजायला सुरुवात होते. प्रत्येकाच्या करिअरमध्ये दहावी-बारावी या वर्षांना एक वेगळं महत्त्व दिले जाते. त्यात जर कोणी सायन्सला असेल तर तो नक्की डॉक्टर होणार की इंजिनियर? असाच थेट प्रश्न अनेक जण विचारत असतात. पण डॉक्टर व इंजिनीअरिंगच्या पलीकडे देखील बारावी सायन्स नंतर करिअर संधी आहेत, हे आपली मंडळी विसरूनच जातात. त्यामुळेच, बारावीनंतर पुढे सायन्समध्ये असणार्‍या ‘विज्ञान वाटा’ याविषयी लिहायचं मी ठरवलं. मी स्वतः गणितामध्ये IISER Mohali येथून Ph.D पूर्ण केलेली आहे व IIT Madras मधून M.Sc. केलेली आहे.
मी स.प.महाविद्यालयामध्ये B.Sc करण्यासाठी प्रवेश घेतला, तेव्हा आमच्या सोबत बरेच विद्यार्थी हे इंजीनियरींग किंवा मेडिकलला प्रवेश न मिळाल्यामुळे B.Sc. करायला आले होते. जेव्हा मी आयआयटी मध्ये गेलो, तेव्हा इतर राज्यांतील मुलांमध्ये असणारा सायन्सचा दृष्टीकोण हा मला जरासा निराळा वाटला. माझ्या सोबत आयआयटी मध्ये असे अनेक मित्र होते ज्यांच्या कॉलेजमध्ये B.Sc. ला प्रवेश घेण्यासाठीचे ‘कट ऑफ’ हे ९० टक्क्यांहून अधिक होते. आपल्या राज्यात हुशार मुलांपैकी खूप कमी मुलं बारावीनंतर सायन्स मध्ये करियर करू इच्छितात. गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकारने सायन्ससाठी अनेक मोठ्या संस्था उभारलेल्या आहेत. त्यामध्ये IISER’S, NISER’S या संस्थांचा देखील समावेश होतो.
मला माहित असलेल्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट संस्थांची यादी खालील प्रमाणे आहे, ज्यामध्ये तुम्ही बारावीनंतर सायन्ससाठी प्रवेश घेऊ शकता.
1. Indian Institute of Technology (IIT).
2. Indian Institute of Science (IISc), Bangalore.
3. Indian Statistical Institute (ISI).
4. Indian Institute of Science Education and Research (IISER).
5. Chennai Mathematical Institute (CMI).
6. National Institute of Science Education and Research (NISER), Bhubaneswar.
वरती दिलेल्या यादीमध्ये IIT, IISER आणि ISI च्या वेगवेगळ्या शाखा आपल्या देशामध्ये आहेत.
या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी वेगवेगळ्या पात्रता परीक्षा घेतल्या जातात व संपूर्ण देशभरातून विद्यार्थी या परीक्षांना बसतात. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘सुपर थर्टी’ हा सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला आयआयटीच्या परीक्षेसाठी असणारी स्पर्धा लक्षात येईल. परीक्षेची काठिण्यपातळी लक्षात घेता रेग्युलर पुस्तकांव्यतिरिक्त उच्च दर्जाचे रेफरन्स मटेरियल या परीक्षेच्या तयारीसाठी वापरणं खूप गरजेचं आहे. कन्सेप्टचा सखोल अभ्यास व वेळेचे नियोजन हे या परीक्षांसाठी अनिवार्य आहे. तसेच जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि विश्लेषण करून जर तुम्ही या परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली तर निश्चितच तुम्हाला या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी  मदत होऊ शकते.
वरील संस्था प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट फेलोशिप देखील देतात. तसेच घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या संस्था फी भरण्यासाठी आर्थिक मदत देखील करतात. त्याचबरोबर, जर तुम्ही वरील संस्थांमध्ये बारावी नंतर प्रवेश घेण्यास अपयशी ठरला तरीदेखील तुम्हाला पुढे पदव्युत्तर किंवा पीएचडी च्या शिक्षणासाठी या संस्थांमध्ये प्रवेश मिळविता येऊ शकतो. त्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया आहे.
वरती नमूद केलेल्या संस्थांव्यतिरिक्त आपल्या देशात काही जागतिक नामांकन मिळालेल्या रिसर्च इन्स्टिट्यूटस देखील आहेत, ज्यामध्ये तुम्ही पदव्युत्तर शिक्षण किंवा संशोधनासाठी प्रवेश घेऊ शकता. या संस्थांमध्ये प्रामुख्याने खालील संस्थांचा उल्लेख मला करावासा वाटतो.
1. TATA Institute of Fundamental Research (TIFR).
2. Harish Chandra Research Institute (HRI), Allahabad.
3. The National Centre for Biological Sciences (NCBS), Bangalore.
4. The Institute of Mathematical Sciences (IMSC), Chennai.
5. International Center for Theoretical Sciences (ICTS), Bangalore.
6. CSIR-National Chemical Laboratory (NCL), Pune.
या संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या नोकऱ्या व परदेशात शिकण्यासाठी संधी देखील मिळू शकते. या संस्थांविषयी आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही  संस्थेच्या संकेत स्थळावर जाऊन अपेक्षित माहिती मिळवू शकता.
विज्ञान शिक्षणामुळे व्यक्ती, समाज तसेच देशाचा विकास होण्यास मदत होते. आज संपूर्ण जग कोरोना या महामारीशी झुंजत असताना आपल्याला निश्चितच विज्ञानाचे महत्व व त्याची गरज जाणवली असेल. त्यामुळे  आपण विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा व विज्ञानामध्ये असणाऱ्या संधींचा फायदा घ्यायला हवा, असं मला वाटते.
डॉ.सागर काळाने

The author is Post doctoral Fellow in Mathematics at IISER Pune.

for more such career related news visit www.mahaedunews.com

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comments (2)

  1. Superb , it’s eye opener for everyone that other than Engineering and Doctor there are various different ways of life .

  2. Very good information for the students and students who want to diversify there carrier angel

Comment here