एकदा माझ्या वाचनात विकसीत आणि विकसनशील हे दोन शब्द आले. विकसित देश आणि विकसनशील देश या वरून. विचार करताना एक प्रसंग आठवला. ‘आपल्या मेंदूचा किती टक्के विकास झाला आहे रे’ असा सहजच माझ्या मित्राने मला विचारलेला प्रश्न. अशा प्रश्नांची सवय नसल्यामुळे मी एकदम बुचकळ्यात पडलो. की हा काय प्रश्न आहे? आपल्या मेंदूचा विकास! कधी मोजला कुणी किंवा कधी विचार तरी केला आहे आपण यावर. माझ्या माहितीप्रमाणे आपण आपल्या मेंदूचा वापर मेंदूच्या कपॅसिटी च्या फक्त दहा टक्के करतो. मग मला सांगा आपण आपल्या मेंदूचा विकास कसा करायचा किंवा कसा मोजायचा.
याच्यावर मला एक खूप जुना किस्सा आठवला.
मी व माझा मित्र सांगलीमध्ये आजारी नातेवाईकाला बघायला दवाखान्यात गेलो होतो. बघून झाल्यावर मी त्याला म्हणालो, की चल वेळ आहे तर ‘विंडो शॉपिंग’ आणि ‘डी मार्ट’ मध्ये असेच फिरून येऊ. तो मला म्हणाला की, तुला फिरायचे असेल आणि ‘विंडो शॉपिंग’ करायची असेल, तर मी तुला आज एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो. आम्ही दोघे तिकडे गेलो. ठिकाण बघून मी अवाक झालो. त्याने मला मराठा समाजाच्या बिल्डिंगमध्ये पुस्तकांचे प्रदर्शन लागले होते ते बघायला घेऊन आलेला. मी त्याला म्हणालो अरे इकडे काय ‘विंडो शॉपिंग’ करायची. तो मला म्हणाला की, विंडो शॉपिंग पुस्तकांची कर,! वाटले तर विकत घे. त्याने तुझ्या आजच्या दिवसाची सार्थक होईल किंवा एक व्हॅल्युएशन होईल व तुला तुझ्या मेंदूचा विकास करायला मदत होईल. त्यावर मी फिरून दोन पुस्तके विकत घेतली व ती मी घरी घेऊन आलो.
आता हा एक झाला किस्सा. मला सांगा आपण स्पर्धेच्या युगात जगतो आहोत. प्रत्येक गोष्टीत स्पर्धा आहे अशी की, शेजारी A/C घेतला म्हणून मी पण घ्यायचा. मित्रांनी कार घेतली म्हणून मी पण घ्यायची. त्याने फ्लॅट घेतला, कुणी महागडा टीव्ही घेतला, कुणी फ्रिज घेतला, कोणी काय घेतले आणि कोणी काय घेतले. प्रत्येकाने वस्तू घेतल्या म्हणून मीही त्या घेण्यासाठी प्रयत्न करायचा किंवा स्पर्धा करायची. या सगळ्या गोष्टींवर वेळ आणि पैसा खर्च करायचा. पण या स्पर्धांमधून आपल्या मेंदूचा विकास किती होतोय? याचा कधी विचार केला आहे का? किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्याची स्पर्धा किंवा मुलांच्या शाळा व ड्रेस यावर होणाऱ्या स्पर्धा, आपल्या जीवनाच्या अविभाज्य अंग बनत चालले आहेत. या स्पर्धांमुळे एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत चालला आहे. कोणाचा मुलगा कोणत्या शाळेत आहे, यावरून आपण त्या फॅमिलीचे स्टेटस ठरवत चाललो आहे. पण या प्रश्नांचा आपल्या स्वतःच्या विकासासाठी किती उपयोग होतो. याचा कधी विचार केला आहे.
माणसाने तयार केलेल्या इंजिन सुद्धा आपण 100% वापरू शकत नाही आणि ते जास्तीत जास्त वापरता यावी म्हणून आज कित्येक जण यावर रिसर्च करत आहेत. आसा रिसर्च आपण आपल्यावर कधी करतो का? आपल्या मेंदूवर कधी करतो का?
काही ठराविक देशांना विकसित देश असे म्हटले जाते. कारण ते प्रत्येक आघाडीवर विकसनशील देशांपेक्षा पुढे आहेत जसे की, टेक्नॉलॉजी, सर्विसेस, मेडिकल, फॅसिलिटीज, अशा सर्व. आपणही ही आपल्या वैयक्तिक आघाडीवर विकसित होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच शालेय जीवनात आपण अनेक स्पर्धांमधून जातो. आणि बहुतेक स्पर्धा या ज्ञांनवर्धक असतात आणि नवीन काहीतरी शिकवून जातात. तसेच आपण पण आपल्या रोजच्या जीवनात काहीतरी नवीन शिकलं पाहिजे किंवा शिकण्यासाठी धडपड केली पाहिजे. जी धडपड आपल्याला आपल्या मेंदूच्या विकासासाठी हातभार लावेल.
इतिहासाच्या पावलांवरून जाताना वर्तमानातील अनुभव पाठीशी बांधून भविष्याचा मार्ग संपन्न केला पाहिजे. आणि ती संपन्नता आपल्या वागण्यात बोलण्यात आणि जाणीवेतून प्रकट झाली पाहिजे. जीवनातील संपन्नता ही उपभोग्य वस्तू मध्ये नसून, ती ;विचारांची प्रगल्भता’ आणि ‘व्यक्तिमत्त्वाची गरुडभरारी’ यावर अवलंबून असते. हे सर्व आपण साध्य करु शकतो ते मेंदूच्या विकासामुळे. त्यामुळे मेंदूचा विकास किती महत्त्वाचा आहे आणि तो कसा करायचा हा सुद्धा एक विचारांचाच भाग आहे.
‘विकास हा विचारांचा करायचा असतो मग व्यक्तिमत्व हे आपसूकच विकसित होते’
धन्यवाद
for more such news and articles visit www.mahaedunews.com. You can send your articles to mahaedunews@gmail.com
13 Comments
सुंदर लेख
Thank You Shraddha
So Thoughtful…
Thank You KIRAN
Nice
Nice Article Pravin Ji.. Keep it up.
Sundar
Thank You Swati
Apratim article… Pravin
Nice article sir👌👌
Nice
अतिशय छान लिहले आहे, असेच लिहीत राहा
हो नक्कीच सर. थँक्यू.