Life Explained

“माझा हॉस्पिटल ते शाळा प्रवास”: सौ.सुषमा बोरावके

माझे शालेय शिक्षण ई.१ ली ते १० वी, लक्ष्मणराव आपटे प्रशाला, डेक्कन, पुणे येथे झाले. पुढील शिक्षण मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर, पुणे येथून पूर्ण केले. वडीलांना कामात जबाबदारी खुप असत. परिस्थिति तशी बेताचीच होती. आम्ही तिन्ही भावण्डान्नी या परिस्थितिची जाणीव ठेवून चांगले शिक्षण घेतले. मॉडर्न मधे २००० साली शिकत असताना मला “उत्कृष्ट विद्यार्थी” हे बक्षीस मिळाले. मला शालेय शिक्षणा बरोबरच सहशालेय कार्यक्रमांचीही आवड़ होती. पुरुषोत्तम व सरस्वती करंडक अशा बऱ्याचशा नाट्यस्पर्धा केल्या. २००० साली महाराष्ट्राची लोकधारा हे नृत्य देखील केले. सलग ०५ वर्षे एन. एस. एस. कैम्पमधे सहभाग घेतला.

लग्नाच्या आधीचे आयुष्य हे जिद्दीने गेले. जीवनात खुप काही करावेसे वाटत होते. सर्व क्षेत्रांत ऊंच भरारी घ्यावी असे वाटे. आई वडिलांनी माझे सर्व हट्ट पुरविले. शिक्षण,नृत्य,नाटक या मधे सहभाग घ्यावा, नोकरी करावी यासाठी स्वातंत्र्य दिले.

या सर्व बाबी मला लग्नानंतरही चालू राहन्यासाठी मी पुण्यातील मुलाशी लग्न करण्याचा हट्ट धरला. आई बाबांनी तोहि पण पूर्ण केला. लग्नानंतर मी बी.कॉम पूर्ण केले व शिक्षिकेची एक वर्ष नोकरिही केली. २००३ साली मला, महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या, साने गुरुजी रुग्णालय, हड़पसर येथे क्लर्क ची नोकरी लागली.

थोर समाजसेवक, डॉ. दादा गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली मी नोकरी करू लागले. एथूनच माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटनी मिळाली.आयुष्यात प्रत्येक लहान सहन गोष्टीचा विचार कसा करावा हे मी दादानकडून शीकले. नोकरी करत मी जिद्दीने बी.कॉम, जी.डी.सी.ए, एम.बी.ए.पूर्ण केले. घरच्यांची साथ यासाठी मला खुप लाभली.

नोकरी करत संसार, शिक्षण,आणि माझे सर्व छंद मी जोपासले. लग्नानंतरही नृत्याची आवड़, मी जोपासू शकले. सासरच्या लोकांनीही यासाठी खुप प्रोत्साहन दिले. २०१६ व २०१७ साली ऑल इंडिया डांस कॉम्पिटिशन मधे गोवा व राजस्थान येथे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला. नृत्या बरोबर मॉडलिंग कड़ेही मी आकर्षित झाले. विविध स्पर्धामधे भाग घेवून, नेत्रदीपक यश पदरात पाडले.

सन २०१८ साली याच संस्थेच्या डॉ. दादा गुजर इंग्रजी माध्यमात एडमिन पदावर नोकरी मिळाली. जीवनात परत एक संधि मिळाली नवीन काहीतरी शीकण्याची. हॉस्पिटल ते शाळा हा प्रवास सुरूवातीस जड़ गेला. सर्वच गोष्टी नवीन होत्या. मनात विचारांचे काहूर जमले होते. नवीन काम कसे असेल, काय शिकावे लागेल, मुख्याध्यापक, शिक्षक याचे मनावर खूप दड़पन आले होते. विदया विनये शोभते, या उक्तिप्रमाणे मी ठरविले की आपल्याला इथल्या कामाच्या पद्धति नम्रतेने

शीकल्या पाहिजेत.

या सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्याध्यापक यांना भेटल्यावर सूटली. खुप काही आत्मसात करावे लागेल हे मला समजले. ऑफिस मधील कामे कशाप्रकारे करावीत, रिकॉर्ड कसे ठेवावे, ऑनलाइन कामे सर्वच नवीन होते. माझी काम करण्याची तयारी व जिद्द पाहुन मला मुख्याध्यापक यांनी खुप शिकविले व सहकार्य केले. त्यांच्या स्वभावातील विविध पैलूंमुळे मी खुप कमी वेळात खूप काही शीकले. शाळा सीबीएसई, होण्या करिता, जी कामे करावी लागतात ती मला स्वतंत्रपणे आता करता येवू लागली. मागे वळून हॉस्पिटल ते शाळा, हा प्रवास आठवला तर मला अभिमान वाटतो की, आपन जीवनात काहीतरी ध्येय ठरवीले पाहिजे व ते साकार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

निशंक होई रे मना निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे  समर्थगामी अशक्य हि  शक्य  करतील स्वामी “

।। श्री स्वामी समर्थ ।।

मला लेखन करता यावे, लेखिका व्हावे व या क्षेत्रालही गवसनी घालावी, हा संकल्प, स्वामी समर्थान्च्या आशीर्वादाने, आज माझ्या वाढदीवशी करते व हे लेखन पुष्प त्यांच्या चरणी अर्पित करते.

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here