Skill Development

वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही.. : श्री नितीन गायकवाड

लहानपणापासूनच अक्षरांचे वेड.

कधी शुद्धलेखनातून तर कधी ब्रश आणि रंगांची किमया करून अक्षरांशी खेळत बसायचो. चौथी ईयत्तेत शाळेत जाण्यासाठी १३ किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा, जाताना बसमधे  खिडकीतून नजरेसमोर फक्त दुकानांच्या पाट्या पळत राहायच्या..त्यात अक्षरांचे विविध प्रकार एका साचेबद्ध स्वरूपात मनात बसले.. एक पाटी गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी.. आणि मग शेवटचा थांबा येईपर्यत तेच.

मनात घट्ट रोवून बसल्या पाट्या..!

पण माहीत नव्हतं की याच माझ्या आयुष्याचा भाग बनतील..

चित्रकलेची आवड असल्यामुळे Elementary आणि Intermediate सराव परीक्षा देत आणि दैनंदिन आयुष्यात कामातून कला जिवंत ठेवत बालपण कधी संपले कळलेच नाही..

आठवी पासून कलानगरी कोल्हापुरात शिकण्याची संधी मिळाली वसतिगृहातील गमती जमती अनुभवल्या. दहावी नंतर अभियांत्रिकीचा १ वर्षांचाच प्रवास झाला.. मन कलेत रमले होते.. शेवटी  अभियांत्रिकीची अन् कोल्हापूरची सांगता घेऊन पुण्यात आलो.. आणि कलेने, नावाने प्रसिद्ध असणाऱ्या अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेतला..आणि परत चालू झाला तोच बस ने प्रवास.. पुन्हा अक्षरांची मनावर घोडदौड..

५ वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने कलेचे पैलू पाडले गेले..

जी डी आर्ट्स कमर्शियल हा डिप्लोमा पूर्ण झाला. त्यातही टायपोग्राफी (नवनवीन अक्षरांच्या ओळखी) हाच विषय विशेष  होता..  महाविद्यालयात फुलपाखरा सारखं बागडण्याचं ही भाग्य मिळालं..

अजुन खुप शिकण्याची इच्छा होती पण घर ही लवकर सावरायचं होत आणि परिस्थितीला आवरायचं होत…

आणि त्याच काळात परत एकदा अक्षरांच्या दुनियेत आलो..

पुण्यातल्या एका नामवंत कंपनीत नोकरीस लागलो, जिथं अक्षर जन्म घ्यायची..

आता खरा प्रवास सुरु झाला, शिकायला मिळू लागलं कामाची पद्धत जवळून बघायला मिळू लागली. आमचे सर, गुरुवर्य विक्रम गांजवे यांसारखे प्रभावशाली व्यक्तिमत्व माझ्यासाठी त्या वेळेस आणि आत्ता सुध्दा सर्वात मोठा ऊर्जेचा स्रोत आहेत. सतत कार्यशील.. कायम शांत, ध्येयवेडे, चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता..यातच सगळं काही शिकल्यासारख वाटायचं.

सरांच्या दिनचर्येत मी स्वतःला पाहू लागलो.. पैसे कमावण्यापेक्षा तेथील ज्ञान कमावणे श्रेष्ठ वाटू लागलं..

आणि हळूहळू स्वतःचा व्यवसाय करण्याचं स्वप्न  डोळ्यासमोर दिसू लागलं.. नोकरीस पूर्ण विराम दिला. आणि सुरुवातीला २०१० मध्ये घरातूनच एका चाकण च्या छोट्या एजन्सी च काम घेतलं, काम पहिलच असल्यामुळे अत्यंत बारकाईनं करण्याचं ठरवलं आणि अतिशय सफाईदारपणे काम झालं सुध्दा.. आत्मविश्वास वाढला.. आता एक फर्म करायची ठरवलं एक नाव देऊन व्यवसाय सुरू करण्याची योजना सुरू झाली..

घरची परिस्थिती बेताची होती, या क्षेत्रातील संबंधित कोणीच मार्गदर्शक नव्हतं.. जमवाजमव करून एक दुकान भाडे तत्वावर घेतलं, काही जुनं फर्निचर गोळा करून कार्यालय आणि काम करण्यास जागा तयार झाली..

काम सुरू झालं..दिवस जात होते..  यश हळूहळू मिळत होतं.. थोडा डिजिटल जाहिरातींचा आधार घेतला. जाहिरात क्षेत्रातील व्यक्तींचा सहवास मिळवला, मित्रांचे सहकार्य मिळू लागले.. दिवस पलटायला सुरुवात झाली.. हळूहळू व्यवसाय बाळंस धरू लागल.

ज्या गोष्टी मिळाव्यात वाटत होत त्या पायाशी खेळू लागल्या.. सर्व सुख मिळालं. समाधानाच, स्वाभिमानाच आयुष्य जगण्याला बळ आलं.

अक्षरांच्या दुनियेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काही मशिनरी घेतल्या, त्यात अक्षरे आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे आकार  जन्म घेऊ लागले.. व्यवसाय वाढवला, संपर्क वाढला, लोकांना कलेची जादू कळायला लागली.. प्रत्येक काम एखाद्या प्रतिकृती प्रमाने करायचा ध्यास काम करवून घेऊ लागला..

सर्वांचे आशीर्वाद, बापदादाची पुण्याई कामी आली किंवा आणि काही…

पण प्रामाणिकपणे आणि मनापासून कोणतीही गोष्ट केली की ती सफल होतेच हे बाळकडू मिळाले होते. जसे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं संघर्ष करणं जितकं कठीण असत तितकच तुमचं यश ही शानदार असत.

आज एवढ्या वर्षांनी थांबायला वेळ मिळाला, मागे वळून बघितलं आणि मनात ४ शब्द लिहिण्याचा मोह आवरला नाही.

धडपड, जिद्द आणि न थांबता केलेलं कोणतेही काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही हे पुरत समजलं.. एखाद्या कामाचे वेड लागल्याशिवाय ते पूर्ण होत नाही.. जसं डुंबल्याशिवाय पोहायला येत नाही आणि सर्वात महत्त्वाचं .. मनात जाऊन धडकलेलं वाक्य..

  वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही..

कोणत्याही परिस्थितीत ठामपणे उभे राहण्याची तयारी ठेवण्याची कला शिकवणारे आपले आदरणीय टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा, बी व्ही जी इंडिया चे हणमंतराव गायकवाड, रीलायन्स ग्रुप चे धीरूभाई अंबानी

या आपल्या मातीतल्या, भारतीय श्रेष्ठ व्यावसायिकांकडून आपल्यासारख्या नवीन व्यावसायिकांना शिकण्यासारखं अगणित आहे ते उगाच नाही.. सद्यस्थितीतील संकट असो वा कुठलीही आपत्ती असो, धैर्यानं सामोरं जाणं हे आपल्या रक्तातच आहे हे विसरून चालणार नाही..

म्हणून नोकरी करून फक्त गरजा पूर्ण होतात, स्वप्न पूर्ण करायची असेल तर व्यवसाय च करावा लागतो  हे मनामध्ये ठासून भरवा माझ्या मराठी मित्रांनो..

Shri. Nitin Gaikwad

The author runs his own business Nirankar Signs

For more such news visit www.mahaedunews.com

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comments (5)

 1. Zakaaaaas, article depicts the life story, flow of words is so suttle that it creats a lively picture in front of your eyes as if you are experiencing the Same, Have a Bright future ahead and expect more of such sharing

 2. नितिन गायकवाड

  Very thankful to you

 3. Can I get u r phone nos.
  Mine 9049533308

 4. Onkar Manoj Kamegaonkar

  Sir,
  Ved laaglya shivay Itihaas ghadat nahi,
  He vaakya nakki kontya pustakatl?
  Kinva kunach he sangu shakal..

  Don aathavdya purvi he vaakya aikl. Manaat ghar karun rahilay..
  Pan kahi sandarbh milat nai.

Comment here