Expert Advice

“स्वप्नपुर्ती-डॉ.पेट” एक यशोगाथा: डॉ. बाबासाहेब कल्हापुरे

आई–वडील दोन्हीही शिक्षक त्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण  होते. दरवेळेस पहिल्या क्रमांकाने पास होणाऱ्या मला दहावीत ८१.१ टक्के गुण मिळाले. त्यावेळेस आई–वडिलांची ईच्छा होती की, मुलाने माणसांचे डॉक्टर व्हावे. परंतु  बारावीत कमी मार्क  मिळाल्याने घरच्यांना पहिला धक्का मिळाला. की पोराच आता काही खरां नाही.!

परंतु सुदैवाने नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे प्रवेश मिळाला. गेवराई (ता.नेवासा जि.अहमदनगर) सारखे खेडेगाव ते नागपूर असा प्रवास सुरु झाला. प्रथम वर्षी रॅगिंगचे  धडे गिरवता-गिरवता अभ्यासाचे पण धडे गिरवणे सुरु केले. बी.व्ही.एससी.ए.एच. आणि नांतर एम.व्ही.एससी. पर्यंतचा  प्रवास पूर्ण केला. माझी इच्छा होती कि, राज्यासेवेच्या परीक्षा देऊन  प्रशासकीय अधिकारी व्हावे. परंतु आई-वडिलांनी दिलेली वर्षभराची मुदत संपत आली होती. त्यामुळे नोकरी करून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.

मित्राच्या मदतीने जीवदया, पुणे संस्थेत पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून रात्रपाळीची ड्युटी चालू केली. आणि दहा दिवसातच नोकरीचे दहा वाजले. दुसरा जॉब १५ दिवसांनी ऍनिमल फार्म  वाडेबोलाई, पुणे येथे सुरु केला. रुटीन चालू झाले परंतु  प्रशासकीय सेवेच्या अभ्यासाठी वेळ मिळत नव्हता. शेवटी निर्णय घेतला स्वत:चे पाळीव कुत्रा, मांजराचे क्लिनिक चालू करायचे. आई-वडिलांना दुसरा धक्का दिला कारण कुत्रा- मांजराचे पण दवाखाना असतो याविषयी त्यांना काहीच माहीती नव्हती.

शेवटी आई-वडिलांना तयार करून नोव्होंबर २००५ ला विमाननगरला स्वत:चे “पेट फ्रेंड क्लिनिक” चालू केले. दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी दवाखाना. माझा पगार ६०००/-रुपये आणि क्लिनिक चे भाडे ५५००/-रुपये. अशीही तारेवरची कसरत करत-करत व्यवसायाचा सुवर्णमध्य साधत पुढे वाटचाल चालू केली. इच्छा बळकट होती की या क्षेत्रातच मोठे काम करायचे, स्वत:चे माणसासारखे मोठे हॉस्पिटल चालू करायचे, मग कितीही कष्ट करावे लागले तरी चालेले.

पुढील जिवनाची वाटचाल करण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी पशुवैद्यकीय क्षेत्रातील बायको हवी होती आणि हा ही हट्टहास आई-वडिलांनी पूर्ण केला.

असेच मजल दर मजल करत २०११ ला वाडेबोलाई वाघोली येथे अर्धा एकर जागा घेतली व तिथे सर्व सोयीयुक्त “पेट रिसोर्ट” चालू केले पण माणसासारखे माझ्या प्राणी मित्रांसाठी सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल चे स्वप्न झोपू देत नव्हते. २०१६ मध्ये धानोरी येथे जागा घेतली आणि स्वप्नपूर्तीकडे वाटचाल चालू केली. मनात प्लॅन तयार होते, आकार देत गेलो आणि अर्धागिनीच्या साथीने ७ एप्रिल २०१९ रोजी सुसज्ज “डॉ.पेट” पार्किंग सह तीन मजली हॉस्पिटल चालू केले. यामध्ये एक्स-रे, सोनोग्राफी, ऑपरेशन थेटर, पेट ग्रुमीग(Grooming), पेट शॉपी, इन पेशंट, अश्या विविध सोयी- सुविधा उपलब्ध आहेत. तसेच सोबत चार तज्ञ डॉक्टर ची टीम आहे.

अजून पाच वर्षात पुण्यात ३ नवीन सुसज्ज दवाखाने सुरु करण्याचे प्लॅन डोक्यात रेंगाळत आहे. माझ्या क्षेत्राकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलायचा आहे आणि आपले क्षेत्र एका वेगळ्या उांचीवर घेऊन जायचे आहे. माझ्या अनुभवातून मी एकच शिकलो कष्ट करण्याची तयारी कल्पकता आणि चांगल्या हुशार आणि विश्वासू माणसांची टीम घेऊन तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगल्या प्रकारे काम (प्रगती) करू शकता. आणि शेवट मी हेच म्हणेन “अपना टाइम जरूर आयेगा” !

Dr. Babsaheb Kalhapure

 

for more such motivational news visit www.mahaedunews.com. send your articles at mahaedunews@gmail.com

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here