भिती: – प्रत्येकच प्राणिमात्रांमधे अनेक प्रकारचे भाव भावना असतात. मनुष्यही यास अपवाद नाही. प्राणी आणि मनुष्य यांच्यात फरक इतकाच की याभावना व्यक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या. मराठी साहित्याच जे *वीर शृंगार करूण रौद्र अद्भूत हास्य शांत आदी* जे नऊ रस आहेत त्यापैकी *भयानक* या स्थायीभावातून निर्माण झालेला…भय किँवा भीती हासुद्धा एक भाव प्रत्येक च प्राणिमात्रांच्या ठिकाणी असतो. अर्थातच आपल्यापेक्षा एखाद्या मोठ्या बलवान प्राण्याची आपल्याला भीती वाटते. आणि आपले त्यापासून रक्षण होण्यासाठी प्रत्येकच प्राणिमात्राची धडपड सुरू असते.स्वतःचे आणि आपल्या पिढीचे अस्तित्व टिकवण्याची अविरत धडपड चालूच असते. भीती ही आपल्याही ठिकाणी वास करणारी एक अभिजात भावना आहे. पण कालांतराने या भावनेचे दुर्गुणात रूपांतर होते. याला कारण *आत्मविश्वाचा अभाव* क्षमता असूनदेखील एखाद्या कार्यात सहभागी झालो आणि चुकलो किँवा यशस्वी झालो नाहीत तर लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल या *दडपणापोटी* हाती घेतलेल्या कार्यात आपण भीतीपोटी आपले १००% प्रयत्न करीत नाही , मागे हटतो आणि संभाव्य *लोकापवादास* *लोकनिंदे* स घाबरून भीती वाटून ते कार्य अर्धवटच सोडतो. हे कदापि योग्य नाही *डर के आगे जीत है* हे सूत्र गाठीशी धरून बिनधास्त न डगमगता *कार्यरूपी सागरात* स्वतःस झोकून द्यावे. हात पाय मारावेत. त्यामुळे एक म्हणजे आपण बुडणार नाही आणि दुसरी गोष्ट जरूर त्यातून शिकूच.
दडपण:- ही भीतीचीच दुसरी बाजू आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधीतरी भीतीने दडपण येते किंवा दडपणानेही भीती निर्माण होते…त्यामुळे या दोन्ही नकारात्मक भावना आपल्यामनात उद्भवतात ते केवळ *आत्मविश्वासाच्या* अभावाने…*आत्मविश्वासाने* कार्य केले तर मग ते कोणतेही असो आपण यशस्वी होतोच….आणि समजा अपयश आलेच तरी घाबरून जाऊ नये…पदरी काहीच पडले नाही असे समजू नये. दुसऱ्या वेळेस अधिक आत्मविश्वासपूर्वक काम केले असता आधीचा अनुभव कामी येतो…आणि उणिवा दूर होऊन यश मिळते.
*न्यूनगंड* ही या दोन्ही भावनांतून निर्माण झालेली मनाची एक *केविलवाणी वृत्ती आहे. गंड म्हणजे वृत्ती ज्याला english मधे complex असे म्हणतात. *न्यून म्हणते कमतरता* आपल्यामधे काहीतरी कमतरता आहे अशी भावना सातत्याने मनात निर्माण झाल्यामुळे आपल्यात *न्यूनगंडाची* प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे सतत स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी लेखू नये. पालकांनी आणि समाजानेही आपल्या पाल्याची इतरांशी तुलना करू नये. कारण प्रत्येकजणच स्वतःचे वेगळेपण घेऊन या दुनियेत आलेला असतो. हाताचे प्रत्येक बोट सारखे असते का? एकाच आईचे दोन लेकरंसुद्धा भिन्न नसतात का ? म्हणूनच *प्रत्येकाला स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणाऱ्याचा अवसर* आपण दिला पाहिजे. तरच न्यूनगंडाची भावना मनात घर करणार नाही…
*त्याच्या पंखांनी त्याला उडू देवूयात…* *त्याच्या मनात गरूडझेपेचे स्वप्न पेरूयात…*
याउलट मी कोणीतरी वेगळाच …मलाच सगळं येतं…असा *अहंगंड* ही *निरोगी व्यक्तिमत्त्वाच्या* ठिकाणी अडसर ठरतो. *बहुविध बुद्धिमत्तेच्या* या नवीन आधुनिक युगात प्रत्येकाच्या आकाक्षांना, स्वप्नांना, भावनांना, कौशल्यांना एक नवा असा आयाम मिळावा, एक स्वच्छ आणि *स्वतंत्रपणे* *स्वछंदपणे* भरारी घेण्यास असे अमर्याद *आकाश* मिळावे …हीच *सदिच्छा व प्रार्थना
*सौ.माधवी कुलकर्णी* *फोन* – *७७२००७८१२८* *शिक्षिका* *लक्ष्मणराव आपटे प्रशाला* *पुणे*
for more such news visit www.mahaedunews.com, share your articles at mahaedunews@gmail.com
1 Comment
खूपच छान आणि सोप्या भाषेत लिखाण केले आहे . आणखीन असेच लिहीत राहा शुभेच्छा