Date: 18 December 2021
Time: 7: 00 PM
Language of Conversation: Marathi
Join the conversation: https://youtu.be/GZLW2ljgz7E
Live streaming on mahaedunews Youtube Page (Subscribe)
Organiser: www.mahaedunews.com
Interviewer: Dr. Shivaji Bhosale, Associate Professor, S P College, Pune
श्री. राजू नंदकर……
श्री. राजू नंदकर हे मागील तेरा वर्षांपासून महाराष्ट्र शासनात विविध पदांवर काम करत आहेत. सर्वप्रथम त्यांनी एक वर्ष
त्यांनी कृषी विभागात कृषी सहायक म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र नासिक येथे चार वर्ष उप व्यवस्थापक म्हणून काम करत असताना जवळपास १०० कोटी कर्ज वाटप करून द्राक्ष बागायतदार यांचे जीवनमानात ठोस असे बदल घडवून आणले. गडचिरोली येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून कामकाज केले. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक विषयक नुषंगिक कामे केली. २०१० मध्ये प्रशिक्षणार्थी तहसिलदार धारूर(बीड) म्हणून कामकाजात म.ग्रा. रो . ह .यो. बाबत मजुरांना मुदतीत काम उपलब्ध करून दिले. सन २०१० मध्ये प्रशिक्षणार्थी उप विभागीय अधिकारी महसूल परभणी येथे भीषण पाणी टंचाई च्या अनुषंगाने कामकाज केले . उपजिल्हाधिकारी भू संपादन जालना येथे काम करत असताना दोन वर्षात ३२५ भू संपादन निवडे विषयक कामकाज करून भूधारकांना जमीन मोबदला वाटप केला. उपविभागीय अधिकारी परतूर या पदावर काम करत असताना सन २०१२ व २०१३ च्या भीषण अशा दुष्काळात १०० चारा चावण्या व ५०० पाणी टँकर बाबत उत्कृष्ट असे नियोजन केले होते. तसेच जालना जिल्ह्यात NRLMP, DBT, NSAP, e –DISTRICT PROJECT या प्रकल्पावर नोडल अधिकारी म्हणून कामकाज केले. उपविभागीय अधिकारी कन्नड या पदावर काम करत असताना शेतकरी आत्महत्या होवू नयेत म्हणून शेतकरी आत्महत्या कारण शोधन व उपयोजन समिती तयार केली, शेतकरी आत्मविश्वास हेल्पलाइन सुरू केली, शेतकरी प्रबोधन नाटिका भेगाळलेली भुई तयार केली व गाव दत्तक योजना सुरू केली होती. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कन्नड येथे स्पर्धा परीक्षा केंद्र चालवले.मराठवाड्यातील संपूर्ण गाव मोजणीचा पथदर्शी प्रकल्प मौजे मालपुर येथे राबवला.तालुका क्रीडा संकुल कन्नड याचा विकास करून मराठवाड्यात तालुका क्रीडा संकुल विकासात एक आदर्श निर्माण केला. कन्नड तालुक्यात त्यांनी एकल महिला सर्वेक्षण करून त्यांना शासनाचे लाभ देण्याचा प्रयत्न केला . वन हक्क अधिनियम २००६ नुसार त्यांनी १५२ लाभार्थी यांना जमीन वाटप केली . कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेत त्यांनी ३७ अनुसूचीत जातीच्या भूमिहीन लाभार्थी यांना जमीन वाटप केली. त्यांनी १५२ पोलिस पाटील व ३७ कोतवाल यांची भरती प्रक्रिया अठेचाळीस तासात पूर्ण करून अंतिम निकाल जाहीर केला . खुलताबाद, वेरूळ, मैसमाळ , घृष्णेश्वर देवस्थान येथील पर्यटन आराखडे तयार करून त्यास शासनाची मान्यता मिळवली . मोजे आडगाव पिशोर व मोजे वेरूळ येथे संसद आदर्शग्राम योजना राबवणे कामी समन्वयक म्हणून कामकाज केले. ई फेरफार प्रकल्प राबवण्यात त्यांनी मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळवला. जलयुक्त शिवार योजना राबवण्यात त्यांनी मराठवाड्यात दूसरा क्रमांक मिळवला. जिल्हा पुरवठा अधिकारी जालना या पदावर काम करत असताना त्यांनी पॉस मशीन द्वारे बायोमेट्रिक पडताळणी द्वारे धान्य वाटप कार्यक्रमात राज्यात पथदर्शी म्हणून प्रकल्प राबवला व पहिले सहा महीने पॉस मशीन ने धान्य वाटपात प्रथम क्रमांक मिळवला. वर्षभरात त्यांनी किमान १.५० लाख क्विंटल धान्याची बचत करून झालेली बचत वर्ग करणे साठी शिधापत्रिका नसलेले गरीब व दुर्बल कुटुंबे शोधून त्यांचे समावेशन अन्न सुरक्षा योजनेखाली केले. जिल्ह्यात एक लाख पात्र कुटुंबांना उज्वला गॅस योजनेची ऑफर लेटर देवून जवळपास ७५००० कुटुंबांना उज्वला गॅस जोडणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन व अमलबजावणी केली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी जालना या पदावर असताना त्यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९बाबत समन्वयन केले तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी हिंगोली या पदावर असताना त्यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ बाबत समन्वयन केले. मागील एक वर्षांपासून ते उपजिल्हाधिकारी मुंबई या पदावर काम करत आहेत. त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण कृषि महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी एमबीए व एमए(ग्रामविकास) पूर्ण केले आहे. त्यांची ‘महाराजस्व अभियान’ व ‘चारा छावणी’ व ‘बळीराजा तुझ्यासाठी’ आणि पुरवठा विभाग एक दृष्टिक्षेप ही पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. ते यशदा अतिथी व्याख्याता म्हणून प्रशिक्षण देतात. नवाकाळ , महाराष्ट्र टाइम्स इत्यादि वृतपत्रात त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. ते सुप्रशासन, तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि व्यवस्थापन कौशल्ये यावर लिखाण करतात