Live Streams

“सुभाषचंद्र बोस: आय.सी.एस्. पदवीचा त्याग करणारा देशभक्त ” || वक्ता डॉ. सोपान शेंडे || 23-1-22 || 7:00 PM

subhash chandra bose

“सुभाषचंद्र बोस: आय.सी.एस्. पदवीचा त्याग करणारा देशभक्त “

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओरिसा येथील एका संपन्न बंगाली कुटुंबात झाला. बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटकचे लोकप्रिय वकील होते. प्रभावती आणि जानकीनाथ बोस यांना एकूण 14 मुले होती. सुभाषचंद्र हे त्यांचे नववे अपत्य आणि पाचवे पुत्र होते. त्यांच्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्राची सर्वाधिक ओढ होती. आज आपण या लेखात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मराठीत घेणार आहोत.

मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले, जे शहीद झाले, हुतात्मा झाले, जे हसतमुखाने फासावर गेले, त्यांचे कायम स्मरण होत राहते. देशवासीयांच्या मनात त्यांच्याविषयी असणारी भक्तीची भावना आणि आदरयुक्त कृतज्ञता हीच त्यांची स्मृती असते, तेच त्यांचे कायम स्मारक असते. भारतमातेच्या अशाच एका महान पुत्राचे, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महानायकाचे असेच चिरकालीन स्मारक प्रत्येक भारतवासीयाच्या मनात उभे करण्याचा हा एक प्रयत्न आहे. ते महानायक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस!

आय.सी.एस्. पदवीचा त्यांना त्याग का करावा लागला आणि त्या काळातील परिस्थिती चा आढावा, डॉ. सोपान शेंडे, इतिहासाचे प्रयोगशील प्राध्यापक, माजी विभाग प्रमुख, स प महाविद्यालय , पुणे हे येत्या २३ तारखेला आपल्या lव्याख्यानातून mahaedunews ह्या youtube चॅनल वरती Live करणार आहेत.

Date: 23 January 2022

Time: 7:00 PM

Link for Joining: https://youtu.be/bZKk-SXkO0A

Live streaming on mahaedunews Youtube Page (Subscribe)

Organizer: www.mahaedunews.com

Language: Marathi

 

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडून भिंत
अन् आईला कळवा आमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी मुले तुझी ही या अंधारात
बद्ध करांनी शेवटचा तुजं करीत प्रणिपात
तुझ्या मुलां हे होते वेड, वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here