Career News

अक्षरांची अनोखी दुनिया – एक व्यावसायिक संधी : श्री. सुमित काटकर

नमस्कार,

(कॅलिग्राफीच्या दुनियेत)

मी सुमित रमेश काटकर मूळचा चिंचवड, पुणे मधील रहिवासी. शालेय जीवना पासून मला  कलेची आवड असल्या मुळे मी शिक्षण अप्लाइड आर्टस् मध्ये करिअर करायचे ठरवले. अशातच पुण्या मधील नामवंत अभिनव कला (महाराष्ट्र गव्हर्नमेंट) महाविद्यालयात माझे पुढील शिक्षण कमरसियल आर्ट ( अप्लाइड आर्ट ) मध्ये करण्याची संधी मला भेटली. कॉलेज मध्ये मी advertising विषय निवढला, कारण त्या मध्ये भरपूर संधी असल्यामुळे मी त्या क्षेत्रा मध्ये काम करायचे ठरवले.

१ वर्ष नोकरी करून मी आपले स्वतःचे काहीतरी असले पाहिजे या हेतूने मी व्यवसाय करायचे ठरवले. व Third Concept Design या  Ad-agency ची स्थापना केली. सुरवातीला भरपूर अडचणींना सामोरे जावे लागले, एक एक क्लायंट मिळवण्या साठी प्रचंड धडपड करत असे. प्रगती करता करता चुका पण भरपूर होत होत्या, पण म्हणतात ना, जो चुकतो तोच टिकतो. आज १० वर्षे झाली मी हा व्यवसाय करतोय. त्यामध्ये अनेक creative कामे करायला मिळत आहेत. अजून खुप  मोठा पल्ला गाठायचा आहे, आणि स्वामी कृपेने तो नक्की गाठणार यात काही शंकाच नाही.

कॅलिग्राफी म्हणजे मराठीत सुलेखन कला. खरेतर, सुंदर अक्षरांची ही एक कला. मात्र, सुलेखन हे एक माणसाचे सामान्य हस्ताक्षर असे नसून एका विशिष्ट हेतूने प्रेरित केलेले सौंदर्यपूर्ण हस्ताक्षर आहे. अश्याच दृष्टिकोनातून त्याकडे पाहावे लागेल. वाचनीयता हा अक्षरसौदर्याचा प्राथमिक घटक आहे. या दृष्टीने अक्षरांच्या उंची लांबी रुंदी प्रमाणे ही लेखणीच्या टोकाच्या जाडीच्या पट्टीत मांडलेली दिसून येतात. कॅलिग्राफी हा मूळ ग्रीक भाषेतून आलेला आहे. सुलेखनाचे प्रमुख आणि मूळ उद्दिष्ट नेत्रसूखदता हे होय. अक्षरे डोळ्यांना सुंदर दिसली पाहिजेत हे मूळ कारण, सुलेखन हे प्राचीन काळापासून ग्रंथ, हस्तलिखिते यांच्या सजावटी साठी वापरले जाऊ लागायचे. तसेच पुढील काळात इमारती अन्य कलाकृती यांच्या सजावटीमध्येही वापरले जाऊ लागले. सुलेखनकारानी प्राचीन काळापासून ते आजतागायत वेगवेगळ्या प्रकारची माध्यम, साधने वापरात आणली गेली उदा. पप्पायरस, भर्जपत्रे, ताडपत्रे, मृदू चर्मपत्रे, कापड, फलक, कागद इ. माध्यमे लेखनासाठी वापरली गेली. निरनिराळ्या प्रकारच्या लेखण्या, पक्ष्यांच्या पिसाच्या लेखण्या, बोरू, कुंचले, टाक, आणि  आता डिजिटल कॅलिग्राफी नवीन माध्यम. कॅलिग्राफी चा व्यावसायिक उपयोग म्हणजे, चित्रपटांची नावं, फोण्टस तयार करणे, पैंटिंग, नेम प्लेट्स, जाहिरातीं साठी, अनेक ठिकाणी वापर होतो.

त्याच बरोबर मी एक सुलेखनकार (कॅलिग्राफी) आहे. या कलेचा उपयोग मी जाहिरातीं मध्ये करत आहे. गेल्या १० वर्षा पासून मी वेगवेळे फॉन्ट्स तयार करत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी गेली अनेक वर्षे कॅलिग्राफी च्या कार्यशाळा घेत आहे. तसेच माझे कॅलिग्राफी पैंटिंग चे एक्सिबिशन येत्या पुढील काळात होईलच. आज अनेक सेलिब्रिटी लोकांसाठी मी कामं करत आहे. Corporate प्रोजेक्ट, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट, निम शासकीय कामे अनेक राजकीय पक्ष्यांची कामे, तसेच सेट डिझायनींग, इव्हेंट डिझायनिंग, अश्या इतर अनेककांची कामे माझ्या Ad-agency मार्फत होतात. नामवंत आर्किटेककडून माझ्या कामाची पोच पावती मिळत आहे. भारतातच न्हवे तर भारता बाहेरही मला माझी कला आजमावण्याची संधी मिळत आहे.

कॅलिग्राफी च्या माध्यमातून अनेक स्टेज शो करतो त्यामुळे अनेक लोकांपर्यंत पोचण्याची संधी मिळत आहे. अनेक वृत्त पत्रांमध्ये कार्याची दाखल घेतली जात आहे. मनी वसे स्वप्नी दिसे असं म्हणतात पण मनी आणि स्वप्नी जे दिसत ते सत्यात उतरवण्याची कला माझ्यात आहे. लोकांकडून मिळालेली दाद आणि सकारात्मक प्रशुवसा मिळवत मी आज कित्येक वर्षे काम करत आहे. वरील कार्य आवर्जून उत्तम प्रकारे कसे करता येईल याचा मी नेहमी प्रयत्न करेन. एक कलाकार म्हणून मी देवाचे आणि समाजाचे काही देणे लागतो हा उद्देश बाळगून लोकांसाठी जास्तीत जास्त काम करता येईल ह्याची मी अशा बाळगतो.

क्षेत्र कोणतेही असो यश मिळवणे आपल्या हातात आहे. त्यामुळे कॅलिग्राफी ही एक नवीन युवा पिढी साठी चालून आलेली अनोखी व्यावसायिक संधी आहे.

धन्यवाद !

 

सुमित रमेश काटकर           3rd Concept Deisgner

For more such career related articles visit www.mahaedunews.com

 

 

 

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comments (1)

  1. Very nice story
    Jo chhukto toch tiketo👌👌👍

Comment here