ऑगस्ट २०००
“अप अप देवेंद्र, हिट हार्ड देवेंद्र, अप अप हंटर, हिट हार्ड हंटर”….”
एनडीए मधील मेन बॉक्सिंग रिंगमधे कानठळया
बसवणारी चिअरिंग चालू होती. प्रसंगच तसा होता. एनडीएमधे एकूण १५ स्क्वॉड्रन; प्रत्येक स्क्वॉड्रनमधे जवळपास 120 कॅडेट्स. ६ महिन्यांच एक सेमिस्टर, अर्थात् टर्म; दर टर्ममधे सर्व स्क्वॉड्रन्स अनेक स्पर्धांमधे आपापलं वर्चस्व स्थापन करुन टर्मअखेरीचं प्रतिष्ठेचं बॅनर जिंकण्याचा प्रयत्न करतात. स्पर्धात्मक वैर टोक गाठतं. त्यातल्यात्यात बॉक्सिंग म्हणजे अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा; ‘Separating men from boys’ वाली. यात गोल्डमेडल म्हणजे पूर्ण टर्म NDA सेलीब्रिटी!
अशी ही बॉक्सिंग कॉम्पिटिशन चालू होती, आणि मी ‘हंटर’ स्क्वाड्रनच्या टीमकडून मागच्या तीन बाउट्स जिंकून फायनलमधे खेळत होतो. माझ्याच स्क्वाड्रनचा व सातारा सैनिक स्कूलमधील वर्गमित्र सुमित कारंडे थोडया वेळाआधीच प्रतिस्पर्ध्याला फोडून गोल्ड मेडल जिंकून मला चीअर-अप करायला आला होता. हंटर सोबत इतर दोन-तीन स्क्वाड्रन्स ट्रॉफीचे प्रबळ दावेदार होते व सुम्या जिंकल्यानं माझ्या बाउटला कमालीचं महत्व प्राप्त झालं होतं; जिंकलो तर ट्रॉफी स्क्वाड्रनच्या नावावर, हारलो तर बोंबला. फायनल असल्याने स्टेडियममधे खचाखच गर्दी. चोहो बाजूंनी जवळपास दीड हजार कॅडेट्स, शंभर एक अधिकारी, कमांडंट इत्यादी असल्याने एक वेगळेच दडपण होते . ती गर्दी, टेंशन, आकाशभेदी चिअरिंगमधे मी अलगद क्षणभरासाठी काही वर्ष कधी मागे फ़्लॅशबॅकमधे निघनू गेलो समज़लेच नाही.
ऑगस्ट ९२.
जेमतेम दहा-साडेदहा वर्षांचा असेन मी. सैनिक स्कूल सातारा मधे ऍडमिशन होऊन नुकतेच १-२ महिने झाले होते. घरच्या आठवणिंनी सतत रडणारया माझ्यासारख्या रडकुंड्यांच्या मनोरंजनासाठी होस्टेलच्या मॅट्रन मॅडमनी एके दिवशी एक छोटीशी बॉक्सिंग बाउट ठेवली. उंची व वजन सर्वांत कमी असल्याने एका बाजुने मला इवलासा बॉक्सिंग किट घालून उभे केले, तर दिसायला अगदी गोंडस अशा गोर्यापान रितेश लड्डाला दुसर्या बाजूला. मॅडमच्या मते त्या वेळेस आम्ही दोघे बॅच ची सर्वात cute मुले. ही गोष्ट वेगळी कि रित्या सध्या एक डॅशिंग आर्मी ऑफिसर असून निधड़या छातिने बॉर्डरवर लढतो, व मीही हवाईदलात देशसेवा क़रतो.
मित्रांनी टाळया वाजवून व चिअरिंग करून जणू असे काही स्फुरण आणले कि मी गंमतजंमत विसरून धड़ाधड़ हाणामारी सुरु केली. गावाकड़च्या भांडण मारामार्यांचा पूर्ण अनुभव पणाला लावला गेल्याने माझ्याकड़ून चुकून भोळयाभाबड़या रित्याचे नाक फुटले. बाउट तीथेच थांबवली गेली आणि रित्यावर MI Room मधे प्रथमोपचार केले गेले. सायंकाळी हाऊसमास्टर सरांनी घड़लेला सर्व प्रकार जाणून घेतला, आणि काही कळायच्या आत माझं नाव सरळ शिवाजी हाऊसच्या बॉक्सिंग टीम मधे आलं! दिवस रात्र प्रॅक्टीस, पळने, व्यायामाने माझे हाल चालू झाले. मला तर बॉक्सिंग बद्दल जास्त ज्ञान नव्हते म्हणा; सिनियर म्हणायचे सुरु कर, आणि मी डाव्या हाताने चेहरा झाकून उजव्या हाताने समोर जो कुणी उभा दिसेल त्याला बदडून काढायचो. कशाची प्रॅक्टीस अन कशाच काय. पण सर्वांना खूप आवड़ायचं. शेवटी फायनलचा दिवस उजाडला. समोर नेहरू हाउसचा राहुल सावंत. माझ्यापेक्षा फुटाने उंच. जिगरीने लढ़लो. हुक, अपरकट, जॅब सर्व अस्त्र वापरली. पण सांडयाही काही कमी नव्हता. लई बदड़लं भावानं. शेवटी दोघही लालबुंद. तोंडं रक्तबंबाळ. सांडया जिंकला, मी हारलो. पण दोघांनी बघ्यांची मनं जिंकली. फेमस झालो.
पुढच्या वर्षीपासून नियमितपणे बॉक्सिंगमधे भाग घेऊ लागलो. तंत्रशुद्ध फ़ाईट शिकण्याचा ध्यास घेतला. अनेक महान खेळाडुंकडून शिकलो व अनेक अविस्मरणिय बाउट पाहिले. प्रवीण सरदारची technically sound फ़ाईट बघायला मुलं जेवण विसरायची…जयंत थोरात चा ‘कूल ऍंड कंपोज्ड’ प्रतिहल्ला दर हाऊस मधे शिकवला जायचा…हा सचिन लेंगरे काय खाऊन खेळतो, थकत कसा नाही? मुलांचा वर्षानुवर्षे प्रश्न…विजय जाधव आपल्या शिकारीला पळवून पळवून थकवायचा, अन मग फोड़ायचा. प्रवीण पाटीलला शाळेच्या दर बॉक्सरचा वीक पॉईंट ठाऊक होता..स्ट्रॅटेजी बनवायचा, ३ बॉक्स खायचा, एक द्यायचा अन त्यातच जिंकायचा. फक्त सुजीत भोसले विरुद्ध ११वीत त्याचं गणित चुकलं अन सुज्या जायंट किलर बनला. प्रकाश भांगरे शारीरिकदृश्टया नैसर्गिक देणगी लाभलेला शैलीदार बॉक्सर…छोटा, तीक्ष्ण नज़र अन चपळ. पण बॉक्सर लोकांची एक श्रेणी अशी होती जिला मात्र सगळेच घाबरायचे. हेवीवेट. शिवाजी भोसले नि सचिन निकम याच कॅटेगरीमधले, बॅचचे धष्टपुष्, रॅंडम पोरं. हयांच्यासमोर कशाची टेक्नीक अन कशाचं काय. तिन्ही फेर्या टिक़लो अन कुणाच्या मदतीशिवाय स्वतःच्या पायावर रिंगमधून बाहेर आलो तर नशीब समजायचं. ११वीतली दोघांमधली हेवीवेट फायनल मुलं अजूनही विसरले नाहीत.
६वी ते १२वीच्या त्या ७ वर्षांत मुलांना रिंगमधून उडून बाहेर पडताना पाहिलं, समोरच्याच्या नाकातून उड़ालेल्या रक्ताच्या शिंपडयाने बॉक्सरचे कपड़े अक्षरशः रंगलेले पाहिले, नॉकआउट होऊन मुलांना बेशुद्ध होताना पाहिलं.
पण शिकत गेलो. अनेक मेड़ल्स जिंकले. भूषण बाबड़ेने अकरावीत बाउटमधे अंगठा तोड़ला तर एका हाताने लढून जिंकलो. मार खाल्ला, नाकाचं ऑपरेशन करून घेतलं, पण थांबलो नाही. कारण त्या त्रासात एक वेगळीच शान होती…
भप्प…अचानक चेहरयाच्या मधोमध नाकावर एक सॉलिड पंच खाल्ला अन चिअरिंग ऐकू यायला लागली.
.. “अप अप देवेंद्र, हिट हार्ड…”. ‘अव्या व्हॉट्स रॉंग वीथ यु? त्याला कॉर्नर कर आणी अपरकट दे. ही इज टायर्ड. जिंकल्याशिवाय बाहेर येऊ नको’. बाहेरून डावा डोळा सुजलेल्या गोल्ड मेडलिस्ट सुमितची उजव्या डोळयाने वॉर्निंग. मी भानावर आलो. लक्ष केंद्रित केलं, समोरचा कॅडेट चीवट होता. भन्नाट बाउट झाली पण शेवटी प्रतिस्पर्ध्याला तंत्रशुद्ध पद्धतीनं खेळून हरवलं. रिझल्टच्या वेळेस दोघांचे चेहरे लालबुंद, तोंडं रक्तबंबाळ. पंचाने विजयी म्हणून माझा हात वर केला, तेव्हा सुम्या नियम मोडून रिंगमधे घुसला नि मला उचलून बाहेर गेला. गोल्ड मेडल ही जिंकलं अन स्क्वॉड्रननी ट्रॉफीही. गगनभेदी जल्लोषात सर्व कॅडेट्सच्या खांदयांवर नाचताना मनात एकच विचार सतत येत होता….
‘पॅशन है तो पॉसिबल है बॉस, SIZE DOES NOT MATTER’
publish your experiences in life explained at www.mahaedunews.com
9 Comments
अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी , आमचा देवेंद्र हा कायम फायटर राहिलेला आहे, आता त्याचे अनुभव लिहून तू वाचकाच्या पुढे शब्दशहा प्रसंग उभा करतोय , व आमच्यासारखे ज्यांनी ते प्रसंग अनुभवले आहेत त्यांच्यापुढे जुन्या आठवणी ताज्या करतो आहे, शब्बास देवेंद्र , तुझ्या पुस्तकाची वाट बघतोय
Wooow Deva!!! you just stepped in to a scene and allowed it to drip from your fingertips…
Passion is priceless….anything that gets your blood racing is probably worth doing.
And about cuteness…..people are prettiest when they talk about something they really love with passion in their eyes.
The best part about you is….. you have the passion to begin and the commitment to finish…….
Thank you Sushant
Well, obviously I didn’t know about this bout in question. But frankly I am not surprised that you own it. Passion has always been your main stay mate. Very well described 👍🏻
Really Great Passion, I’m very senior to you, so missed your Boxing bout LIVE during school days, but what you penned down, made it run Live in front of my eyes and ofcourse School times in every ERA of our school we had Great fighters in Boxing Ring, I too still remember many of all time Hit Bouts, Best Boxers, Best Loosers, Knockouts and mostly Tough fights….
Just mesmerized by the article ,our school times
‘पॅशन है तो पॉसिबल है बॉस, SIZE DOES NOT MATTER’- Absolutely right Sir.
Size does not matter, the matter is our work, passion, dedication, honesty, and duty.
Very happy to read this story.
Excellently penned.
Love to read your write-ups.
Keep on fighting 💪 👊 (boxing)
and keep on writing.
Deva.. Thank you for the refresher. It was like standing next to the ring and watching all those bouts you mentioned. Not only PT instructors of SSS but junior house metrons very well knew how to convert cute boys in to passionate men. Kudos to All our boys. When we were in same dorm (KH) next to each other I remember your passion stories and your “bombla” scenes. You were passionate about flying and mate you are living your dream… nothing more to say!! Your write ups are essential for us and for upcoming Students.. write more and keep sharing. Stay well brother.
Unbelievable devendra … u are Absurdly right … u proof that if u have a passion or if u have craz to win then nothing is impossible … Winners don’t wait for chances, or don’t think about size also … he is just thinking about goal… 👏👏 keep it up