– ऑगस्ट २०१९ मध्ये रशियन स्पेस टूर कंपनीसोबत करार करून अवकाश टुरिझम चा पाया रोवला. (www.360SpaceA.com)
– 360 एक्सप्लोरर मार्फत जगभरात साहसी मोहिमा
महाराष्ट्राच्या सर्वात जास्त अचिव्हमेंट असलेला एकमेव बिजनेस कोच, रेकॉर्ड होल्डर, सक्सेस ट्रेनर, लेखक, एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी महाराष्ट्रातच नाही तर जगातील अनेकांना स्वतच्या ट्रेनिंग सेशन्सद्वारे त्यांच्या आयुष्यातील स्वप्न गाठून दिले आहे. २०१५ मध्ये मणक्याच्या विकाराने अंथरुणाला खेळलेल्या आनंदने गेल्या ३ वर्षात बिजनेसमध्ये जी प्रगती केली आहे त्याला तोड नाही.. बिजनेस कोचिंग, आंतरराष्ट्रीय साहसी टूर कंपनी, रशियन स्पेस टूर कंपनी सोबत केलाला करार, सोशल मिडिया branding कंपनी अश्या अनेक कंपन्या यशस्वीपणे चालवणाऱ्या आनंद बनसोडे यांच्याबद्दल हा लेख –
आनंद एक लाजरा मुलगा. स्वतःचे नाव सांगतानाही त्याला जणू ते प्रक्टिस करावे लागत असे, अशी परिस्थिती. बोलण्यातही दोष आणि अभ्यासात तर तो जणू भोपळाच होता. नववीपर्यंत हीच त्याची ओळख. नववीत नापास झाल्यानंतर भविष्यातील अंधार डोळ्यासमोर होता. आईच्या मायेमुळे, प्रेमामुळे शिक्षण पूर्ण करण्याची दुसरी संधी वडिलांनी उपलब्ध करून दिली अन् आयुष्याचा कायापालट झाला. एकेक यशाच्या पायर्या मग कधी पायाखाली येऊन जात त्यालाही कळले नाही. दहावी, बारावी, पदवी, PhD असे शिक्षण घेताना डोळ्यात स्वप्नांचा भांडार होता. जगातील सर्वांत मोठे शिखर एव्हरेस्ट त्याला खुणावत होते. ही उंची गाठायची तर पैशाची शिडी तयार करावी लागणार होती. घरात रोजची पोट भरावीत इतकीच काय ती लक्ष्मी येत होती. त्यात असा अवाढव्य खर्चाचा डोंगर उभे करणे सोपे नव्हते. पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग. तसेच झाले. सर्वस्व पणाला लावून एव्हरेस्ट मोहीम यशस्वी केली. अन् कालपर्यंत विनोदाचा विषय झालेला आनंद अनेकांची प्रेरणास्त्रोत बनला. जे हिणवत होते, मग तेच गुणगाण गाऊ लागले. अन् येथूनच एका संघर्षयात्रीचा उंचच उंच भरारीचा प्रवास सुरू झाला. पुढे कधीकाळी नववी नावास झालेल्या तरूणाचा नववीच्या हिंदी पुस्तकातच आता धडा आला. ज्यांना आयुष्यात अपयशाला सामोरे जावे लागते, नापास व्हावे लागते, त्यांच्यासाठी आनंद पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रेरणा ठरतो आहे.
*बहुरंगी यश*
एखाद्या व्यक्तीने एखादा भीमपराक्रम केला की, आयुष्याचे सार्थक झाले असे समजून आयुष्यभर त्याच पराक्रमाची स्तुतीसुमने तो उधळत बसतो. आनंद याला अपवाद होता. “एखादे यश मिळवले की लगेच त्याची ओळख पुसून टाकायची.ज्या फांदीवर विसावू वाटेल त्या फांद्याच तोडा म्हणजे तुम्ही पुनःपुन्हा भरारी घेऊ शकाल” असे आनंद म्हणतो. एव्हरेस्ट सर केल्याची नशा आनंदच्या डोक्यात जास्त दिवस राहिली नाही. त्याने लगेच पुढच्या मोहिमांची घोषणा केली. जी सोलापुरकरांच्या ऐकीवात देखील नव्हती. ती म्हणजे ‘सेवन समीट’ अर्थात जगातील सात खंडातील सर्वोच्च सात शिखरांची चढाई करणे. याचा खर्च देखील सातपट होताच. पण खर्चाला घाबरणारा, संकटापुढे झुकणारा तो आनंद कसला. एकामागोमाग एक चार जगातील सर्वोच्च शिखरावर त्यांने भारताचा तिरंगा फडकावला देखील. एकीकडे ट्रेकींगमधील शिखरे पादाक्रांत करताना आनंदने साहित्य क्षेत्रातही पाऊल टाकले. स्वप्नातून सत्याकडे या आपल्या जीवनप्रवासाच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. पुढे तेच “ध्यास उत्तुंग हिमशिखरांचा” या नावाने बेस्टसेलर ठरले. आनंदचा प्रेरणादायी प्रवास अनेकांना भावला. त्याचे विचार वाचायला ऐकायला लोकांना आवडायला लागले. पुस्तकांची मागणी लक्षात घेऊन त्याने एकापाठोपाठ एक अशी 6 पुस्तके प्रकाशीत केली. जी आज मोटीवेशनल प्रांतात अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. एकीकडे पायाचा वापर करत शिखरे सर करणारा आनंद हाताच्या लेखणीने अनेकांना ऊर्जा देऊ लागला. गळ्यातील वक्तृत्व केलेने नसानसात आत्मविश्वास जागृत करू लागला. शाळा, महविद्यालय, गाव, शहर येथील विचारपीठावरून आनंद तरूणांमध्ये आत्मविश्वासाचा झंझावात निर्माण करू लागला. अत्यंत मानाचा टेड टॉक असो की अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात विचार मांडणे असो अशा जागतिक कीर्तीच्या मंचाला आनंदची दखल घ्यावी लागली. तेथील मंचावरून आनंदने जिद्दीची, संघर्षाची कहाणी जगावला ऐकवली. हे सारेच एखादा चित्रपटाच्या कथेला शोभेल असेच होते.
*संकटासही सांगितले ठणकावून*
सामांन्य लोकांच्या जीवनात एखादे संकट आले की, माणूस पूर्ण कोसळून जातो. नियतीला शिव्याशाप देण्यात वेळ घालतो. पण आनंद सामांन्य कालही नव्हता आजही नाही. लहानपणी छोट्याशा घरात राहणारा देखील 20 लाख रूपये खर्चाच्या मोहिमेचे स्वप्न पाहू शकत होता. 20 लाखांवर किती शून्य याची कल्पना नसताना हे स्वप्न सत्यात उतरवून स्वप्नांपुढे संकटांची काहीच किंमत नसते हेच त्याने दाखवून दिले. आनंद आणि संकटे हा जणू साप मुंगूसाचा खेळ होता. संकट कितीही जीवावर आले तरी त्यातून मार्ग काढून बाहेर पडण्याची कला आनंदला गवसली आहे. 2015 मध्ये अमेरिकेतील अलास्का येथे मोहिमेवर असताना वडिलांच्या निधनाची वार्ता कानावर पडणे. मोहीम अर्धवट सोडून घरी परतणे, कौटुंबिक आधार कोसळल्याने चिंताक्रांत होणे, असे प्रसंग आनंदच्याही जीवनात आले. पण संकटांच्या पुढे एक पाऊल कसे टाकायचे याची आनंदला जणू सवयच झाली होती. त्यामुळेच वडिलांच्या निधनाचे दुःख तो पचवू शकला. त्यातून सावरतो न सावरतो इतक्यात नव्या संघर्षाने आव्हान दिले. तो म्हणजे पाठिच्या मणक्याचा आजार. हा आजार तर वयैक्तिक आनंदला आव्हान तर देणारा होताच शिवाय त्याच्या स्वप्नांची राखरांगोळी करणारा अवाढव्य होता. जगातील उंचच उंच शिखरे सर करणारा अवलिया आता अंथरूणात खीळून पडला होता. डॉक्टर म्हणाले, हा आता अधू -अपंग झाल्यासारखा आहे. तो गाडी चालवू शकणार नाही. ट्रेकींग करू शकणार नाही. तो अवलंबिताचे जीवन जगेल. हे शब्द एखाद्या व्यक्तीला, त्याच्या आयुष्याला उदध्वस्त करू शकतात. कित्येक महिने तो अंथरुणावर खिळून होता. पण आनंदच्या महत्त्वाकांक्षा या पराकोटीच्या होत्या. तो थोडे थांबला..त्याने पाहिले..अन् एखाद्या फिनिक्स पक्षाला लाजवेल अशी झेप घेत पुन्हा उभारला. डॉक्टर, नातेवाईक सारेच अवाक्. चालू न शकणारा आनंद पुन्हा ट्रेकिंगच्या मैदानात सिक्स अन् फोर मारू लागला. छोटी छोटी पाऊले टाकत चालण्यापासून सुरवात करत 2018 मध्ये पुन्हा एव्हरेस्ट बेसकॅम्प व सह्याद्री मधील अनेक मोहिमा त्याने केल्या आहेत. आता राहिलेल्या जागतिक मोहीमा करण्यासाठी तयारी आनंद करतो आहे.
*उद्योजक ते लाईफ आणि बिजनेस कोच*
आनंदाचा प्रवास एक झोपडतून सुरू झाला आहे. पण आता 360 एक्सप्लोरर ही जागतिक दर्जाची टूर कंपनी व ‘द लिमिटलेस यु’ ही जगभरातील अनेकांना आयुष्यात यशस्वी बनण्यासाठी बिजनेस व लाइफ कोचिंग ट्रेनिंग देणारी कंपनी आनंदने सुरू केली आहे. खूप कमी कालावधीत आनंद एक तरुण उद्योजक म्हणून सर्वांच्या समोर येतो आहे. 360 एक्सप्लोरर चे ऑफिस फक्त सोलापूर, पुणे, मुंबई येथेच नसून ऑस्ट्रेलिया येथील सिडनी येथेही नुकतेच सुरू करण्यात आले आहे. नुकतेच ऑगस्एट २०१९ मध्ये एका रशियन कंपनी सोबत करार करून आनंद बनसोडे यांनी अवकाश पर्यटन हा एक नवीन टूर कन्सेप्ट सुरु केला. याशिवाय सोशल मिडिया मार्केटिंग कंपनीही ते यशस्वीपणे चालवत आहेत.
सध्या अनेक मोठ्या व्यावसायिकांना आनंद प्रशिक्षण देतो आहे. त्याचे स्टुडंट हे त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च उंचीवर विराजमान असून हीच आनंदची खरी मिळकत आहे. आनंद वेगवेगळ्या उद्योजकांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी विशेष अशी ट्रेनिंग देत असतो. महाराष्ट्रातील अनेक उद्योजक आनंद बनसोडे यांच्याकडून अगदी १ दिवसापासून ते १ वर्षापर्यंत पर्सनल ट्रेनिंग घेत असतात.
आनंद बनसोडे यांची वेबसाईट- www.anandbansode.com 9067045500 / 9067035500
for more such articles visit www.mahaedunews.com
share your story to mahaedunews@gmail.com
Comment here