प्रिय मुलांनो,
आय मिस यू..….ओळखलंत ना..? मी, तुमची शाळा बोलतेय.
तुम्ही म्हणाल तीच का… ऑनलाईनची शाळा!!
अरे ती ऑनलाईनची नाही बर का ! मी तुमची खरीखुरी शाळा बोलतेय. तीच मी शाळा, जिथे तुमच्या असण्याने जिवंतपणा आहे. तिचं अस्तित्व व नावलौकिक तुमच्या असण्यानेच आहे . विद्यार्थी मित्रहो. जिला महत्व तुमच्यामुळेच आहे….. ती मीच, तुमची शाळा.
आठवते ना..? ती शाळा जी एक इमारत आहे. ती शाळा जीला अतिशय सुंदर असे खेळाचे मैदान आहे. आठवते का तुम्हाला वेगवेगळ्या झाडांनी वेढलेले असे शाळेचे आवार. अरे आठवत नाही का? ज्या वर्गामध्ये बसून तुम्ही रोज नवनवीन गोष्टी शिकलात. आणि खूप धमाल ही केली. खूप miss करतेय हे सगळं मी. मी एकाकी पडली आहे, तुमच्याविना.
कुठून हा कोरोना रूपी राक्षस आला आणि माझं वैभव हिरावून नेलं . माझी मुलं, त्यांचे असणे, त्यांचं ते भांडण, त्यांचे रुसणं, त्यांचे हसणे, बागडणे , बेधुंद होऊन खेळणे. मैदानावरती खेळ चालू असतानाचा तुमचा जल्लोष आणि रंगपंचमी सारखी मातीची धुरवळ, आजही माझ्या डोळ्यात जपून ठेवली आहे. शाळेत वर्ग चालू असतानाच्या खोड्या, तर कधी उत्तर सांगण्यासाठी केलेली शिरजोरी….. शाळेत येण्यासाठी उशीर झाल्यावर सांगितलेली ती खोटी कारणं… आणि मग ती शिक्षा..miss मिस करते रे मुलांनो.परीक्षा चालू असताना ते pin drop silence.. आणि शेवटच्या पेपरच्या दिवशीचा तो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद…..
काय सुंदर असायची माझ्या दिवसाची सुरुवात…….. बेल वाजायची आणि सगळं वातावरण अगदी प्रफुल्लित व्हायचं.. कारण बेलच्या आधी तर तुम्ही हजर असायचे.. अशी ही मुलं म्हणजे काय फुलांपेक्षा कमी आहेत का? जशी की बाग बहरते तशी तुमच्या असण्याने, तुमच्या येण्याने मी बहरून जायचे, आज तुमचा आवाज नाही, ना तो तुमच्या चालण्याचा आवाज…… त्यातही एक धून असायची.. असेच खूप काही.. आनंद देणारे क्षण …… पण आता चित्रच वेगळं आहे.. भयान शांतता आहे आता इथं… हा एक आहे..पक्षांचा किलबिलाट ऐकायला येतो अधून-मधून , थोड्या वेळासाठी का होईना पण पण आनंदाची झुळूक घेऊन येतो… आणि एक नवी आशा देऊन जातो.. कि, हां..परत एकदा सगळं सुरळीत होईल. माझी मुलं परत एकदा माझ्याकडे येऊन हसतील, बागडतील ,नाचतील गातील, खेळतील आणि शिकतील.
राष्ट्रगीत, प्रार्थना, भाषणे, कविता, या सगळ्यांनी माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची आणि मग सर्व वर्ग कसे खचाखच भरायचे. मग सुरू व्हायचं ते सुंदर सुंदर धड़े, कविता, कथा, प्रश्नोत्तरे, खेळ, संगीत असे एकामागुन एक तास, व दर तासाला नवीन शिक्षक. वह्या, पुस्तके बदलायची, विविध उपक्रम असायचे. पण आता तसं काहीच नाहीये रे मुलांनो….miss करतेय.. हे सगळं.. खूप भयाण अशी शांतता आहे आता… मग यायची दुपारची मधली सुट्टी जेवणाची… एखाद्या रेस्टॉरंटलाही मागे पडेल अशी मेजवानी.. आणि त्यानंतर तास सुरू होण्यापूर्वी काही वेळ दंगा करण्यासाठी मिळावा म्हणून पटापट डबे संपवून तुमचे ते कला प्रदर्शन… मी होते ना प्रेक्षक …….! miss करते हे सगळं………..
जेवणानंतरच्या तासांमध्ये मी पाहिलेलं………..हां! तुम्ही डुलक्या घेत असताना … आणि शिक्षिकेने आवाज दिल्यावर खडबडून जागी होऊन न झोपलेल्याच ते नाटक करणं, खोटी कारण, त्यावर विनोद करणारा मित्र परिवार……….मिस करते रे हे सगळं…………… शाळा सुटल्यावर बेल पेक्षाही मोठ-मोठ्या आवाजात तुमचा तो आनंद उत्सव व जल्लोष कानात घूमतोय रे मुलांनो……. नाचत बागडत तुमचं ते शाळेतून बाहेर पडणं.. जणू काही मला आनंदाने खुनावत होते तुम्ही, जनु………… उद्या परत येताय माझ्या भेटीला….पन आज तीन महीने उलटले तरी तुमचा काही निरोप येईना, .. येताय ना रे?
कोरोणाची महामारी आली आहे असे लोक बोलताना ऐकले लोकांच्या बोलन्यातून. तुमच्या सुरक्षेसाठी शासन खूप काही ही योजना करत आहे. खूप काही नियम आहेत. नियमांचे पालन करताय ना? कारण तुम्हाला कोरोना ला हरवून परत माझ्याकडे यायचंय बरं का? पुन्हा सर्व काही आपल्याला नव्याने चालू करायचय ना? जरी प्रत्यक्षात तुम्ही माझ्याजवळ नसलात , तरी तुम्ही शिकत शिकत आहात ना. आपले शिक्षक आणि शासन यासाठी प्रयत्नशील आहेत. शाळा नाही पण शिक्षण चालू आहे. माहीत आहे मला … तुम्ही कंटाळून गेला असाल.. मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीन समोर बसून , तुम्हालाही नकोस झालं असणार. मान्य आहे मला शाळेत असल्यावर तुम्ही शिक्षक आणि मित्र-मैत्रिणी यांच्या बरोबर असल्यामुळे सगळ्या गोष्टी पटकन समजून जायच्या. नेटवर्क त्रासामुळे तुम्ही कंटाळून गेला असाल. पण आपल्याला थांबून नाही चालणार ना? जिंकायचं आपल्याला, मग थांबून कसं चालेल. बहुतेक अजून काही दिवस नाही भेटता येणार आपल्याला.
Miss you मुलांनो……….अगणित असे अविस्मरणीय क्षण आहेत तुमचे माझ्याकडे, नर्सरी पासून ते आज पर्यन्त नेहमी भेटलो आपन दरवर्षी एका नवीन रुपात.आजही मी वाट पाहते नित्य नियमाने. लवकरच आपन भेटूयात….
तुम्ही मोठे झालात तसे मी पन बदलले, पन आता फार बदल झाला….
जीव झुरला वाट पाहून…………..
दिवसामागून दिवस चाललेत, ऋतू मागूनी ऋतू,
“जिवलगा, कधी रे येशील तू धरेस भिजवून गेल्या धारा फुलून जाईचा सुके फुलोरा नभ धरणीशी जोडून गेले सप्तरंग सेतू शारद शोभा आली, गेली रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढून विरले, अंतरीचे हेतू” नकळत अश्रु नयनी आले या सुंदर गीताने.
किती वाट पहायची तुमची कंटाळा आलाय.. या एकांताचा . कंटाळा आलाय ते खुले खेळाचे मैदान पाहून. कंटाळा आलाय ते खुले वर्ग आणि रिकामे बाकडे पाहून. कंटाळा आलाय तो कोरा फळा पाहून. कंटाळा आलाय ते धुळीने माखलेले डस्टर आणि खडू पाहून. कंटाळा आलाय ते शाळेचे बंद गेट पाहून. येताय ना मुलांनो…..?मी तुमची शाळा बोलतेय..
“तुला पाहते रे, तुला पाहते, तुझी मूर्त माझ्या उरी राहते
जरी आंधळी मी तुला पाहते….” माझ्या प्रिय मुलांनो आय मिस यू…..
लेखिका, अनुजा हनुमंत कैले (जवंडरे) चिंचवड़, पुणे (महाराष्ट्र)
for more such articles visit www.mahaeduews.com, send your articles to mahaedunews@gmail.com
2 Comments
खुप सुंदर लेख आहे Madam 👌😘
Thank you sir