News

लढा –कोरोनाशी आणि भीतीशी: सुनिता वाडकर

आज सर्वत्र ‘ कोरोना’ हा शब्द जरी ऐकला तरी अंगावर एक भीतीरूपी काटा उभा राहतो. पण याविषयी सखोल आणि खरी माहिती आपल्याला प्रत्येकालाच असायलाच पाहिजे. आणि याचीच एक उत्सुकता मनात असतानाच एक व्याखान माझ्या ऐकण्यात आले आणि खरच इतक्या काही गोष्टी अगदी स्पष्टपणे समोर आल्या आणि त्याविषयी इतरांनाही थोडीशी माहिती असायला पाहिजे असं वाटलं.हा कोरोना आहे तरी काय ? तर तो एक परदेशातून आलेला अजातशत्रू आहे. जो नक्की माहित नाही कसा तयार झाला, काहींच्या मते तो एक लॅबोरेटरी मधे तयार करून पसरवला तर काहींच्या मते तो वटवाघूळाकडून माणसांकडे प्रसारित झाला. अजातशत्रूशी लढायला तर सर्वजण तयार असतात , तसेच आपणही तयार झालो आहोत. पण खरं तर आपला लढा केवळ कोरोनापुरताच मर्यादित नाहिये तर तो लढा आहे भीतीशी .कोरोनाच्या भीतीने लोक दार-खिडक्या लावून घरातच बसून राहिल्याचे चित्र दिसून आले .त्याचबरोबर आपला लढा आहे बदलत्या जीवनशैलीशी कारण यामुळे अनेक जण कुठल्या ना कुठल्या व्याधीने ग्रासलेले आहेत आणि असे अनेक लोक आपल्या समाजात आहेत. एका सर्वेक्षणानुसार असे नमूद करण्यात आले की, कुठलाही आजार नसलेले केवळ 40% लोक कोरोनाने ग्रस्त होऊन  मृत्यू पावले बाकी लोक त्यांना असणा-या कुठल्या ना कुठल्या व्याधींमुळे कोरोनाग्रस्त होऊन मृत्यू पावले. त्यामुळे आता आपण ठामपणे म्हणू शकतो की, आपला हा लढा कोरोनासोबतच येणा-या भीतीशी आणि आपल्या जीवनशैलीशी देखील आहे.

कोरोनाविषयी जाणून घेताना त्याचा इतिहास जाणून घेणे ही त्याची पहिली पायरी आहे. चीनच्या वुहान शहरामध्ये तो सर्वप्रथम आढळून आला. पण त्याबाबतीतील माहिती काहीशी अस्पष्टपणे समोर आणली गेली. त्यानंतर मात्र तो सर्वत्र जगभर मोठ्या प्रमाणात पसरत गेला . आणि त्याचवेळी चीनने मात्र आपण लॉकडाऊन करून त्यावर कंट्रोल मिळवल्याचा खोटा दावा करत जगासमोर वेगळच चित्र सादर केल. त्याप्रमाणे इतर देशांनीही लॉकडाऊन करून त्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी प्रयत्न केले. चीनने सोशल मिडियावर विवीध व्हिडियो , दृश्य सादर करत जो  देखावा जगासमोर आणला त्यामुळेच सर्वांची फसगत झाली. इटलीसारख्या  देशात तर तो  इतक्या भयानक स्वरूपात पसरला की वेळेवर वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने मृत्यू पावलेल्या लोकांचे अक्षरश: ढीगच्या ढीग साठले. अमेरिका , इंग्लंडमधे देखील तो प्रचंड प्रमाणात पसरू लागल्यावर भारताने देखील 24 मार्चला लॉकडाऊन घोषित केला . वेळेत लॉकडाऊन टाकल्यावर परिस्थिती कंट्रोल मधे येइल अस वाटत होत पण वादळ जसं आपल स्वरूप बदलत तसंच त्यानेही आपल स्वरूप बदलत जगभरात सुमारे 77 लाख लोकांना कोरोनाने ग्रासले.

तर कोरोना आहे तरी काय? तो एक सुक्ष्म विषाणू ( व्हायरस ) आहे.जो की मायक्रोस्कोप ने सुद्धा दिसू शकत नाही इतका तो नॅनोमममीटर असतो. आणि आपल्या समाजातील  लोकांना जी गोष्ट डोळ्यांना दिसू शकत नाही ,बॅक्टेरिया ओळखता येत नाही त्यामुळे त्याचा प्रसार रोखण्याविषयी माहिती असणे त्याबद्दल त्यांना जागरूक करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने विषाणूचा प्रसार होतो याविषयी कित्येक वेळा माहिती देऊनही त्याचा लोकांवर काही परिणाम होत नाही .त्यासाठी त्यांची मानसिकता बदलण्याबरोबरच कोरोनाशी लढा देण्याचा कानमंत्र ही द्यावा लागेल. प्रथम त्या जंतूविषयी माहिती असायला पाहिजे. कोरोना हा काही जिवंत प्राणी नाही तर तो एक मृतक पध्दतीचा कण आहे पण तो एका  रेप्लीकेटर चे काम करतो. म्हणजेच एकाकडून अनेकाना संक्रमित करतो  तो त्याचा ‘डबलिंगटाइम ‘ म्हटला जातो. त्याला’ एज ऑफ लाइफ ‘ म्हणजेच जीवसृष्टी व निर्जिवसृष्टी च्या मधे हे रेप्लीकेटर्र्स बसलेले असतात . त्याला असणारे बाहेरील कवच साबणाने आणे पाण्याने नष्ट होते मग तो पुन्हा इफेक्टीव्ह होऊ शकत नाही म्हणून वारंवार हात धुणे उपयुक्त ठरते.

कोरोनाचा प्रसार मुख्यत: 2 प्रकारे होतो. एक म्हणजे हवेचा झोत जो फारच घातक असतो. ह्या हवेच्या झोतामुळे कोरोना आपल्या शरीरात येऊ नये म्हणून नाक आणि तोंड यांचे संरक्षण करण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. जवळपास 85-90% लोकांना कोरोनाचा संसर्ग नाकाद्वारे झालेला आहे. तसेच मास्कमुळे आपल्याद्वारे इतरांना संसर्ग होणार नाही आणि इतरांमुळे आपल्याला संसर्ग होणार नाही.दुसरे कारण म्हणजे कोरोनाग्रस्त व्यक्तिच्या संपर्कातील वस्तुंना स्पर्श केल्याने देखील संसर्ग होऊ शकतो. निर्जीव वस्तुंवर कोरोना विषाणू 6 तास ते 2 दिवसांपर्यंत टिकतो. त्यानंतर तो मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर 14 दिवसांपर्यंत टिकतो. म्हणून काळजी आणि दक्षता घ्यावी .

आपल्याला कोरोना होऊच  नये हे शक्य नसले तरी तो कमी धोकादायक होण्यासाठीचे काही प्रतिबंधात्मक उपाय आपण नक्कीच करू शकतो. जसे की प्रत्यक्ष सुर्यप्रकाश आणि  चांगली, स्वच्छ व मोकळी हवा कोरोनाला प्रतिबंध करू शकते. त्याचप्रमाणे सुर्यप्रकाशात ‘ड’  जीवनसत्व असल्याने ते आपली प्रतिकारशक्ति वाढवण्यास मदत करते. त्याबरोबरच आणखी एक उपाय म्हणजे नियमित व्यायाम आणि सकस व संतुलित आहार जो प्रतिकारशक्ति वाढवून कोरोनाला प्रतिबंध करू शकतो.सर्वात मह्त्वाचा एक उपाय  म्हणजे वारंवार हात धुण्याबरोबरच सकाळी – संध्याकाळी आपले नाक देखील कोमट पाण्याने धुणे फायद्याचे ठरेल. कोरोनाचा एंट्रीपॉइंट असलेल्या नाकाची जर व्यवस्थित स्वच्छता आणि काळजी घेतली तर कोरोनाला प्रतिबंध करू शकतो. या उपायांचा अवलंब केल्याने जरी कोरोना संपला नाही तरी निदान एक सकारात्मकता तरी सर्वामध्ये निर्माण होईल की कोरोना आपल्याला मारणार नाही तर आपण  ही कोरोनाला मारू शकतो म्हणून गर्दी करून मारण्यापेक्षा आपण ही प्रयत्न करून त्याला मारूयात. लक्षणे  दिसल्यानंतर घरी वेळ न काढता ताबड्तोब हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावे. योग्य ते उपचार आणि पथ्य पूर्ण करून स्वता:ची काळजी घेणे.लगेच कामावर रुजू न होता स्वत:ला आयसोलेट करावे. मास्क वापरण्याबरोबरच  सुरक्षित अंतर ठेवणे देखील महत्वाचे आहे. मास्क असेल तर किमान 3 फूट आणि मास्क नसेल तर 20 फूट अंतर ठेवावे. अशी प्रत्येकाने काळजी घ्यावी.

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शिक्षणसंस्थानी काय काय केले पाहिजे तर 1) जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा एका वेळेस सर्व विद्यार्थ्याना शाळेत हजर न करता ½ किंवा 1/3  विद्यार्थ्याना दिवसाआड याप्रमाणे शाळेत बोलवावे. गर्दी करून न बसता सुरक्षित अंतर ठेवायची सवय  लावावी .2) मास्क वापरणे, हात धुणे , स्वच्छता राखणे याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे व प्रशिक्षण ही द्यावे. 3) कोरोनाविषयीची भीती बाळगणा-या कोणाचीही थट्टा करू नये. 4) कोरोनापासुन बचाव करण्यासाठी क्लास रूम  कशी असावी , कसे बसले पाहिजे, डबे कधी , कसे खाल्ले पाहिजेत, स्वच्छता कशी ठेवावी  याचा ट्रेनिंग प्रोग्राम तयार करून सर्वांना प्रशिक्षित करावे. 5) सर्वांसाठी एकसारखाच मास्क म्हणजे सर्व शिक्षक , कर्मचारी यानां सारखाच मास्क वापरायला सांगायचे. 6) हॅन्डशेक करू नये, गर्दी करू नये, कोणालाही मिठी मारू नये या सर्व गोष्टींचे पालन करावे. 7) शिस्त आणि प्रोटोकॉल यांचे पालन करावे. 8) कोरोनाच्या या भयानक संकटात पालकांची व विद्यार्थ्यांची जी मानसीकता बदललेली आहे ती हळूवारपणे समजून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. अशा प्रकारे आपण सर्वांनी काळजी घ्यावी. “ सुरक्षित रहा …. निरोगी रहा “

लेखिका ,

सुनिता वाडकर( शिक्षिका) पुणे.

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here