School

कोविड -19 मध्ये सर्वसमावेशक शिक्षणाचा विचार करायला हवा: श्रीमती ज्ञानेश्वरी परदेशी

गेल्या काही महिन्यांपासून सगळ्या जगासमोर एक मोठं संकट उभं राहिलय – ते म्हणजे कोविड -19 ! कोविड – 19 च्या महाभयंकर साथीने सर्व जगाला व्यापलयं. सर्वच देश यात भरडले गेलेत आणि असे एकही क्षेत्र नाही जे या परिस्थितीमुळे प्रभावित झाले नाही. शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नाही. मार्च 2020 पासून विद्यार्थी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन देशातील सर्वच शाळा,  महाविद्यालये बंद आहेत. आणि कोविड 19 संसर्गाचा वेग बघता शाळा महाविद्यालये बंद करणे खूप आवश्यक होते,  हेही मान्य करावेच लागेल.

अचानक आलेल्या या आरोग्य आणीबाणीमुळे; शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या काळात खूप बदल घडणार; असे सर्वच जण म्हणतात. अनेक तज्ज्ञांनी याबाबत वेगवेगळी मते देखील मांडली आहेत. सध्या सगळीकडे; शाळा बंद शिक्षण सुरू;  अशा आशयाचे वातावरण बघावयास मिळते. शाळा जरी बंद असली तरी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून  काही मुलांच अध्ययन अध्यापन सुरू आहे.

आता  काही या अर्थाने की – एक प्राथमिक शिक्षिका म्हणून जेव्हा या परिस्थितीत मी माझ्या पहिली ते चौथीच्या मुलांच्या अभ्यासाबाबत विचार करते, कृती करते तेव्हा माझी पहिली नोंद ही आहे की – माझ्या वर्गात / शाळेत येणारी सर्व मुले सारख्याच सामाजिक, आर्थिक वातावरणातून येत नाही. प्रत्येक मुल वेगवेगळ्या परिस्थितीत वाढत असते,  त्यात या अशा आरोग्य आणीबाणीच्या काळात प्रत्येक मुल त्याच्या कुटुंबासोबत वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत असेल, उदा. काही पालकांची कामे गेलीत, काहींना रहायला घर नाही , पालकांचे काम बंद असल्यामुळे पगार झाले नाहीत, कोणाच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल इ. अशा एक ना अनेक अडचणी असू शकतात. मग या स्थितीत माझ्या वर्गातील सर्वच मुलांना online अभ्यासाचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल का?  सर्वच पालकांकडे smart phone, smart tv , radio ही साधने उपलब्ध होऊ शकतात का ? मी माझ्या वर्गाचा / शाळेचा whatsapp group  बनवला तर जे ग्रुप मधे नाहीत त्यांचा अभ्यास कसा घेणार?  असे प्रश्न माझ्या समोर उभे राहतात. अशावेळी माझ्या शाळेच्या whatsapp group वर असलेल्या मुलांपेक्षा यात सहभागी नसलेल्या मुलांच्या शिक्षणाच्या विचाराने मी जास्त अस्वस्थ होते, कारण शिक्षणाचा हक्क त्यांचाही आहे ना!?

पण केवळ आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने ते या online शिक्षणाच्या प्रवाहात सामील होऊ शकत नाहीत. अभ्यासापासून वंचित राहतायेत हा विचार मन बेचैन करतो. हा प्रश्न माझ्या एकटीचा नाही , किंवा फक्त ग्रामीण भागातील आहे असे नाही तर आर्थिकदृष्ट्या मागास समाज जिथे जिथे आहे तिथे तिथे हा प्रश्न नक्कीच आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे घरात टिव्ही नाही, स्मार्ट फोन नाही, असला तर नेटरिचार्ज करायला पैसे नाहीत, अशा समस्या व अशा मुलांना नजरेआड करून चालणार नाही. या साथीच्या काळात प्रत्यक्ष शाळा भरवणे शक्यच नाही परंतु online शिक्षणाच्या पर्यायाचा करताना यासारख्या विद्यार्थ्यांचा विचार सर्वात आधी व्हायला हवा, असे वाटते.

कारण आधीच कोविड 19 च्या साथीमुळे माणूस माणसापासून दूर गेलाय पण मुलं मात्र शिक्षणापासून दूर जायला नकोत, शिक्षणाची ओढ,  आवड सर्व मुलांमधे तशीच टिकून रहायला हवी, यासाठी सर्वसमावेशक शिक्षणाचा सर्वांनीच विचार करायला हवा.

श्रीमती ज्ञानेश्वरी प्रभाकर परदेशी

मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवस्ती, केंद्र लोहगाव, ता. हवेली,

जिल्हा पुणे.

(9960364810)

for more news visit www.mahaedunews.com

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comments (2)

  1. Madam खूपच सुंदर,मार्मिक आणि वास्तववादी लेख…
    30 टक्के विद्यार्थ्यांकडे सगळ्या सोयी सुविधा असल्या तरी त्यांच्यासाठी 70 टक्के मुलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही….
    आजही ग्रामीण भागात दिवसभर मिळेल ती मजूरी केल्यानंतरच त्या घरची चूल पेटणार असते आणि आपल्या जि.प.शाळांमध्ये शिकणारी हि मुले याच घरांमधली असतात. online शिक्षणासारख्या गोष्टी तर यांच्या गावीही नसतात कारण या क्षणी त्यांना जीव जगवणं फार महत्त्वाचं आहे..
    थोडक्यात काय तर निम्मं जग उपाशी झोपत असतांना मूठभर लोकांना पंचपक्वान्नांचं जेवू घालू नका…त्यापेक्षा कुणीही उपाशी झोपणार नाही हे पाहिलं पाहिजे..समाजाच्या मूलभूत गरजा भागवतांना सर्वच समस्यांवर मध्यममार्ग शोधला पाहिजे… आणि त्यात सरकार आणि जनता या दोहोंचा सहभाग हवा…
    जिएगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया..🙏🙏🙏

  2. खूपच सुंदर,मार्मिक आणि वास्तव दर्शविणारा लेख👌👌👌

    खरं तर सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या कुटुंबियांना या क्षणी जीव जगवण्यासाठी धडपड करावी लागत आहे..
    दिवसभर राबून जे 200 रूपडे मिळतात त्यावर संध्याकाळची चूल पेटते….
    मग online शिक्षणाचा विचार तर त्यांच्या गावीही नसणार ….

    Online शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर 70 टक्के गरजू मुलांना उपाशी ठेवून 30 टक्के मुलांना पंचपक्वान्नाचं ताट वाढण्यासारखं होईल.त्यापेक्षा हि विषमता दूर करून किमान उपाशी कोणी राहणार नाही अशी उपाययोजना केली पाहिजे..
    या समस्येवर काहीतरी मध्यममार्ग निघणं गरजेचं आहे…

Comment here