Life Explained

सदा समाधिस्त: रणजीत माने

माझे आजोबा  हे शिक्षण संस्था चालक आहेत 1960 सालीच  त्यांनी स्वतः शिवाजी शिक्षण संस्था म्हणून वडूजमध्ये सुरू केली भरपूर मोठा पसारा आहे राजकारणात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते दहा वर्ष जिल्हा बँकेचे 40 वर्ष संचालक व उपाध्यक्ष होते

त्यांच्याबद्दल हा छोटासा लेख

अरे दुकानाच्या बाहेर चॉकलेट काय वाटत बसलायस लहान मुलांना,,,,, माझे  ला कॉलेजचे जुने शिक्षक मला  आवाज देत होते,,,, मी म्हणालो तुम्हाला नाही  कळणार  पार्लेजी चॉकलेट  आहेत आणि खूप  ती गोड लागतात,,,,,

मी असाच एकदा कोल्हापूर वरून पुण्याला जात असताना  सातारा मध्ये जुन्या शिक्षकांनी  भेटून जा!असं प्रेमाने सांगितलं होतं म्हणून थांबलो होतो  शिक्षकांच्या घरून जाताना बाहेर  काही गरीब मुलं एका दुकानाच्या बाहेर खेळताना दिसली  मी सहज दुकानांमध्ये गेलो  काही पार्लेजी ची किस मी चॉकलेट विकत घेतील व त्या मुलांमध्ये  वाटली स्वतः आनंदित झालो  आणि मीही काही खाल्ली,,,,,  क्षणार्धात मी माझ्या बालपणा मध्ये  गेलो,,,,

आंघोळ झाल्यानंतर रोज सकाळी  नित्यनियमाने आजोबांच्या पुढे जाऊन उभे राहायचं  मग ते प्रत्येकाला एक पार्लेजी चॉकलेट द्यायचे ,,, ते कायम  देत  गेले  ही आम्ही नातवंड  घेत गेलो  आता मोठा झाल्यानंतर मी कधीही पार्लेजी खाल्लं  आपोआप  ती मला माझ्या आजोबांनी दिला असं वाटतं  इतक्या खोलवर रक्तामध्ये चॉकलेटच्या स्वरूपात आजोबा  रुजले आहेत,,,,  आज त्यांच्या बद्दल काहीतरी लिहावं असं वाटत होतं  म्हणून सुरुवात  त्यांच्या गोड आठवणीने केले,

तसेच पुढे एकदा  मी एका कंपनीचा  राज्यस्तरीय कायदा विभागाचा प्रमुख असताना  मी  आणि आजोबा (अण्णा) दोघे गाडीतून चाललो होतो  अर्थात चर्चा आनंददायी होत्या  आजोबांना मी आधुनिक टेक्नॉलॉजी नुसार  मोबाईल  फोन व त्याचे विविध वापर  याची थोडीफार माहिती देत होतो  सदर चर्चा चालू असताना  आजोबांनी मला सहज विचारलं  जर का  ध्वनिलहरी  अवकाशातून प्रवास करत असतील  तर कधी काळी  छत्रपती शिवाजी महाराजांनी बोललेले शब्दही अवकाशात सापडतील का,,,,, लहान मुलांना लाजवेल अशा  बालसुलभ त्यांच्या  कुतुहलाचे मला कौतुक वाटत होते  एका मोठ्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा  वैज्ञानिक दृष्टिकोण शिकवण्याची तळमळ दाखवून देत होते त्यांच्या इतक्या सहज प्रश्नांमध्ये संपूर्ण फिजिक्स शाखेची भविष्यातील चाललेली वाटचाल दिसून येत होती,,,,

अजून एक आठवण मी सैनिक स्कूल मध्ये शिकत असताना सर्वसाधारण  बारा-तेरा वर्षाचा असेल सातवी  आठवीमध्ये अण्णा त्यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष होते त्यामुळे दर शनिवारी ते सातार्यात यायचे कधी तरी मला भेटायला ही यायचे येताना नक्कीच आजीने दिलेला काहीतरी खाऊ बरोबर असायचा तो किती असावा याला काही प्रमाण?,,, नव्हतच !

मी आजही माझ्या सैनिक स्कूलच्या मित्रांमध्ये ओळखला जातोय  की जो पाटी भरून द्राक्ष  खाऊ म्हणून घेऊन यायचा  तर एकदा असेच आजोबा आले होते सोबत काही लोकही होते आणि माझं त्यावेळेस तिथे असणार बेड अस्ताव्यस्त होते  ते मी लगेचच व्यवस्थित करून घेतल आजोबा माझ्याबरोबर बसले बोलले  परंतु जाताना सगळे लोक गेल्यानंतर मला जवळ घेऊन म्हणाली ” आपलं  बेड ते नेहमी सुस्थितीत असावं कारण तिच्या  वरती आपण आपलं अर्ध आयुष्य घालवणार ते नीटनेटकं आणि स्वच्छ असावा”  किती अर्थपूर्ण  सांगणं ?! आणि ते ही किती व्यवहारीक स्वरूपात.   आणि  अण्णा फक्त सांगतच नव्हते तर ते स्वतः आचरणात ही तसच आणत होते मला आजही आठवतं शेतकरी, एक मोठे समाजकारणी व राजकारणी  असूनही  अण्णांच्या कपाटामध्ये सगळ्या गोष्टी सुस्थितीत व्यवस्थित  असतात, अशा बऱ्याच हळूच नाजुक सुलभाच्या आठवणी व त्या आठवणींबरोबर येणार ज्ञान हे कायम माझी शिदोरी म्हणून बरोबर असतं. मी माझ्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये कधीही कुठलीही अडचण आली तर ती अण्णांच्या बरोबर चर्चा करायला कधीच माझे मागेपुढे बघत नाही कारण माझ्या अडचणी संदर्भातले टेक्निकल नॉलेज त्यांना नसेल परंतु व्यवहारिक ज्ञानाच्या आधारावर ते संपूर्ण “ज्ञानेश्वरी” आहेत  याचा मला वेळोवेळी प्रत्यय  आला आहे.

महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रत्येकजणच  नवीन शिकण्याचा व वाटा  शोधण्याच्या मार्गावर असतो  “आयडेंटिटी क्रायसिस”  मी कोण ?  मी जन्माला का आलो?    या आयुष्याला ध्येय असतं का?  आणि असतं तर ते माझं काय आहे?  थोडक्यात “स्व ची “ओळख  ही प्रक्रिया चालू असते,,,  माझाही माझ्यापरीने  असा “स्व” चा शोध  चालू असताना  ची एक घटना आहे.  एका गावाच्या वार्षिक यात्रेनिमित्त त्या  गावी माझं मित्राच्या घरी जाणं झालं होतं  सायंकाळी जेवणापूर्वी बसलो असताना, दुसऱ्याही गावचे काही पाहुणे आले होते चर्चेच्या ओघात माझ्या मित्राने सांगितलं की हा दादासाहेब गोडसे चा नातू आहे,, आलेल्या पाहुण्यांना पैकी दोन सत्तरी पेक्षा वयाने मोठे असणारे म्हातारे जे एकमेकाचे भाऊ होते  उठून आले आणि माझ्या  जवळ येऊन बसले  व माझ्या पाठीवर हात फिरवून म्हणाले  दादासाहेब गोडसे म्हणजे वाघ ..  मला अचानकच अंगामध्ये स्फुरण  संचारल्या सारखे झाले  नक्कीच तो क्षण मला माझ्या स्वतःच्या ओळखीमध्ये एक दिशादर्शक  झाला.

तर हे असे सर्व नातवंडांना पार्ले जी देणारे  व त्या चॉकलेट च्या निमित्ताने आठवण येणारे अण्णा,, किंवा  आजही रोज सकाळी बेड वरून खाली उतरल्यानंतर लगेच आपलं  बेड नीट करण्याची आठवण देणारे एक शिस्तप्रिय व्यक्ती, किंवा  सत्तर वर्षाच्या कोण कुठल्या म्हातारयांनी मला सांगितले   वाघा समान निडर व्यक्तिमत्व,   की आज विज्ञानाला पडलेल्या  ब्रह्मांड  या  विषयी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधणारे बालसुलभ  कुतूहल असणारे  कायम विद्यार्थी  असणारे संस्थाचालक,,,,,,

या सगळ्यांमध्ये अण्णा नक्की कुठले?  का  हे सगळेच म्हणजे अण्णा  का यातले काहीच नाही म्हणजे अण्णा,,,,,  ज्ञानेश्वरीमध्ये  “देही असोनी विदेही सदा समाधिस्थ पायी”  असं एक वचन  आहे  हे मला वाटतं अण्णांसाठी योग्य लागू पडतं  हे सगळेच आहेत  किंवा यातलं काहीच नाही  नातू म्हणून माझा शोध चालू आहे,,,,, परंतु ते सगळे आहेत किंवा नाहीत  परंतु आईवडिलांच्या समाधीला  रोज पाणी घालण्याची  त्यांची सवय  मला नक्कीच  जमिनीशी बांधून ठेवण्यास  पुरेशी आहे,,,,

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comments (1)

  1. Simplicity at it’s Best, individual is judged by who’s company was he , it’s great to you that your grandfather is with such beautiful and clear vision in very simple way , Really Hat’s off .

Comment here