*निरोपाचा क्षण नाही; शुभेच्छांचा सण आहे !*
*पाऊल बाहेर पडताना* *रेंगाळणारे मन आहे!!*
*निरोपाच्या क्षणी नयनात एका असे आसू !*
*तर नयनी दुसऱ्या असती अश्रूमय हासू !!*
हो अगदी अशीच अवस्था झाली दिनांक ३०-६-२०२० रोजी.कारणही तसेच होते.आमच्या सर्वांच्याच लाडक्या मुख्याध्यापिका सौ.तेरेसा डेव्हिड मॅडम यांचा सेवानिवृत्तीचा हा दिवस.
पुण्यनगरीत,म्हणजेच विद्येच्या माहेरघरात *विद्या महामंडळ संस्था* गेली ६० वर्षे शैक्षणिक क्षेत्रात अविरतपणे विद्यादानाचे कार्य करीत आहे.जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ आदरणीय पु.ग वैद्य सर आणि सन्माननीय आपटे कुटुंबिय यांच्या उत्तुंग ध्येयाच्या आणि असीम त्यागाच्या भक्कम अशा पायाभरणीवर आजचा हा *लक्ष्मणराव आपटे प्रशाला आणि ज्यु.काॕलेज* या शैक्षणिक संकुलाचा डोलारा समर्थपणे उभा आहे.आदरणीय मुख्याध्यापक
*१) श्री पु.ग.वैद्य*
*२) सौ.मं.नी जोशी*
*३) श्री. ए.ल.चव्हाण*
*४) कै.दा.भि.उबाळे*
*५) श्री. वि.रा.जगताप*
*६) श्री.स,गो.पानसे*
*७) श्री. मु.ज.मेटे*
या *दिग्गज व्यक्तिमत्वांनी* प्रशालेची कीर्ती मुख्याध्यापक पदावरून दिगंतात उंचावली.
या यादीतील पुढचे नाव म्हणजे
*सौ.तेरेसा ऊ.डेव्हिड*
*ऑक्टोबर २०११* या वर्षी मॅडमनी *मुख्याध्यापकपद* ग्रहण केले…
योगायोगाची गोष्ट म्हणजे याच महिन्यात याच वर्षी मी शाळेत सहा.शिक्षक म्हणून रूजू झाले.मला आजही संस्थेच्या पदाधिकारी, तज्ज्ञ शिक्षकवृंद आणि मॅडम यांनी घेतलेली माझी मुलाखत आठवते.मुलाखत ,लेसन डेमो,पुन्हा मुलाखत यातून तावून सुलाखून माझी निवड झाली.रूजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी खरंतर मॅडमची खूप भीती वाटली.पण हळूहळू त्यांचा स्वभाव,कार्यपद्धती, तत्वनिष्ठा समजत आणि उमजत गेली आणि मग मनातल्या भितीची जागा आदरयुक्त जिव्हाळ्याने घेतली.
सौ.डेव्हिड मॅडम यांचा जन्म *१९ जून १९६२* साली झाला.त्यांचे शिक्षण *M.A.(English); B.Ed, D.S.M.* असे आहे.
त्यांची लक्ष्मणराव आपटे प्रशालेत एकूण ३४ वर्षे त्यातील ९ वर्षे मुख्याध्यापिका अशी प्रदीर्घ सेवा झाली आहे आणि त्या ३०-०६-२०२० रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
*”अध्यापन”* हेच एकमेव ध्येय ऊराशी बाळगून जीवनाची वाटचाल करताना त्यांनी अनेक खाचखगळ्यांचा सामना करीत, तत्वनिष्ठतेने आपला सेवाकाल पूर्ण केला.
त्यांना त्यांच्या उज्वल कारकिर्दीत अनेक सन्मान आणि पुरस्करांनी सन्मानित करण्यात आले ते पुढीलाप्रमाणे:-
*1) पुणे जिल्हा परिषदेकडून सलग तीन वर्षे (1995-96,1997-98,1998-99) आंतरशालेय इंग्रजी नाट्यस्पर्धा दिग्दर्शक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला.*
*2) पुणे महानगरपालिके तर्फे आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार.*
*3) शिवाजीनगर विधान परिषदे तर्फे कतृत्व प्रेरणा पुरस्कार.*
*4) जागतिक महिला दिनी रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या तर्फे सामाजिक कार्यासाठी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार.*
*5) उत्तर भारतीय संघ यांच्यातर्फे अध्यापन व सामाजिक क्षेत्रातील योगादानाबद्दल पुरस्कार*
*6) लायन्स क्लब ऑफ पुणे वेस्ट यांच्या तर्फे शिक्षक गौरव पुरस्कार*
*7) पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाला समिती यांच्यातर्फे गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार*
*8) लायन्स क्लब ऑफ आर्ट लव्हर्स यांच्या तर्फे शिक्षक गौरव पुरस्कार*
*9) English Marathon साठीचे 2014 ते 2019 पर्यत सन्मानचिन्हे पुरस्कार*
*10) 11 वी च्या ऍडमिशनच्या Central commission committee मधे कार्यासाठी पुरस्कार*
*11) The International Associatiin of Lion Clubs यांच्या तर्फे गुणवंत* *मुख्याध्यापक गौरव पुरस्कार*
वरील पुरस्कार मिळविणार्या आमच्या डमच्या कारकीर्दीचा आम्हांला सर्वांनाच सार्थ असा अभिमान वाटतो.
खरं तर नोकरीत रूजू होण्याच्या दिवशीच निवृत्तीची तारीखही ठरलेली असते.ती आपल्याला माहित देखील असते.आपल्या कामाच्या ठिकाणी कर्तव्यनिष्ठेतेचे आणि एकनिष्ठतेचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सौ.डेव्हिड मॅडम.
कामाच्या बाबतीत त्या अतिशय परखड आणि कडक शिस्तयुक्त आहेत.कोणत्याही प्रकारची दिरंगाई त्यांना खपत नाही.
*”अचूकता”* हा त्यांच्या कार्यशैलीचा गुणच म्हणावा लागेल.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांचा *”आधाराचा आणि पाठिंब्याचा हात”* प्रशालेत माझ्यासकट सर्वच शिक्षकांच्या मनातील आत्मविश्वास जागृत करत प्रत्येकाच्या मागे त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या म्हणूनच अगदी निडरपणे आम्हा सर्वांना काम करता आले.
असे म्हटले जाते की “A good Principal must be highly Visible ,,,he or she must be seen.” आणि खरंचच मॅडम आमच्या शैक्षणिक संकुलात कधीही विनाकारण अनुपस्थित राहिल्या नाहीत. शिक्षक,पालक, विद्यार्थी, पालकवर्ग,शिक्षकेतर कर्मचारी तसेच कार्यालयीन कर्मचारी असो सर्वांशीच त्या सतत आंतरक्रिया करीत असायच्या. क्रिडामहोत्सव असो स्नेहसंमेलन किंवा एखादी रॅली असो मॅडम सैदव सर्वच कार्यक्रमांस उपस्थित असायच्या.आणि म्हणूनच त्यांच्या केवळ उपस्थितीमुळेच आम्ही सर्वच जण “comfort zone” मध्ये असायचो.
मॅडमचा सर्वात महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे त्या *”उत्तम श्रोता”* आहेत.
And again effective listening is one of the best qualities of a good Principal.
कोणतीही, कसलीही, कोणाचीही समस्या असो
सर्वात आधी ती गोष्ट त्या शांतपणे ऐकतात आणि मगच त्या समेस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.त्या कोणत्याच समस्यांना कधीच घाबरल्या नाहीत ;सर्वच समस्यांचा त्यांनी थंड डोक्यानी आणि सद् वृत्तीने आणि प्रभूवर अटळ निष्ठा ठेऊन विचार केला आणि मार्ग काढला.
*”गुणग्राहकता”* हे वैशिष्ट्यही त्यांच्या ठायी आहे.आपल्या शिक्षकांजवळ असणारे गुण अचूकपणे हेरून त्यांच्यातला आत्मविश्वास जागवत ती ती शैक्षणिक जबाबदारी शिक्षकांकडे सुपूर्त केली.त्यामुळे कामाचे योग्य पद्धतीने विकेंद्रीकरण होऊन कार्यसफलतेत रूपांतर झाले.त्यांनी सर्वच शिक्षक ,पालक, विद्यार्थी सर्वांच्याच सूचनांचा आदर केला.शिक्षकांना त्यांच्या कामात कार्यवाहीचे स्वातंत्र्य दिले त्यामुळेच अगदी मोकळेपणाचे वातावरण आम्ही अनुभवू शकलो.
*”मुख्याध्यापक हा शालेयरूपी जहाजाचा कप्तान असतो”* असे म्हणले जाते. Principal is the leader of the School ; ultimately their attitude and vision need to be sound and clear. आणि म्हणूनच मला हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो की मॅडमचा “शैक्षणिक आणि प्रशासकीय दृष्टिकोन” हा अत्यंत सकारात्मक ,आत्मविश्वासपूर्ण आणि पारदर्शक असाच आहे.
*”निःपक्षपातीपणा”* हेही त्यांचे एक वैशिष्ट्य.
त्यांनी कधीच कोणामधे भेदभाव मानला नाही किंवा कोणाच्याही बाबतीत पूर्वग्रह (bias) मनात ठेवले नाहीत.अत्यंत आपुलकीने आणि दयाळूपणे सर्वांच्या समस्या सोडवल्या.समोरचा माणूस अडचणीत येणार नाही किंवा पेचात पडणार नाही याची काळजी घेऊनच त्या नेहमी बोलतात त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या कोणत्याच शैक्षणिक कामाचा कोणालाच भार वाटला नाही.
*”उत्साह” (enthusiasm ) हेच त्यांच्या चिरतारूण्याचे रहस्य आहे.*
Last but not least *”Dedication”* is the virtue of her enthusiastic personality.
मॅडमची शाळा,विद्यार्थी ,शिक्षक आणि सर्वच शालेय घटकांप्रति आणि शैक्षणिक कार्याप्रति असणारी “समर्पण- वृत्ती” हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे.शाळेसाठी त्या रात्रीचा दिवस करून झटल्या आणि प्रशालेस अनेक पातळ्यांवर सदैव आघाडीवरच ठेवले.
शाळेचा त्यांच्या पूर्वीच्या मुख्याध्यापकांनी उंचावलेला आलेख त्यांनी सदैव अबाधित राखला.
आज मॅडमचा सेवानिवृत्तीच्या दिवशी असे वाटते की,”Now she is retired but not tired”….
मॅडम तुम्हांला या सेंकड इनिंगच्या खूप शुभेच्छा.निवृत्तीनंतरचे तुमचे आयुष्य अधिक सुखा-समाधानाचे आणि आरोग्यसंपन्नतेचे जावो ही सदिच्छा.
तुमच्यासाठी माझी कविता सादर करते…
*नविन आवृत्ती*
*आयुष्याचा हा नवा प्रवास*
*असला जरी सेवा-निवृत्ती*
*निवृत्ती असे केवळ आभास*
*ही तर जगण्याची नवी आवृत्ती*
*आणील तुमच्या जीवनी क्रांती….*
*घर कुटुंब शाळेसाठी*
*कष्ट केले तुम्ही अपार*
*आता ही वेळ म्हणते…*
*थांबा थोडे घ्या थोडा आराम.*
*प्रश्न सगळे सुटले झटपट*
*निर्णय घेतले तुम्ही पटपट*
*पण आता नको ते घड्याळ*
*नको कामाचा सासूरवास*
*सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य*
*जगावे तुम्ही अगदी झकास*
*मनातील इच्छा आकांक्षांची यादी*
*पूर्ण होवो हीच सदिच्छा सर्वात आधी*
*आता जरी नसणार तुम्ही शाळेत*
*तुमचे आमच्या मनातील स्थान राहिल सदैव अबाधित.*
शेवटी
“तुम चले जाओगे
तो सोचेँगे….
तुम चले जाओगे
तो सोचेंगे….
हमने क्या खोया…?
हमने क्या पाया….?
जिंदगी धूप…
तुम घना साया….
अशा *कतृत्ववान,उदार,धैर्यशील,मुक्त मनाच्या,ज्ञानी,इंगजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या सौ.डेव्हिड मॅडमना नमन.*
धन्यवाद….
*लेखिका*
*सौ.माधवी द.कुलकर्णी*
*सहा.शिक्षिका*
*लक्ष्मणराव आपटे प्रशाला,पुणे*
*(फोन नं.७७२००७८१२८)