काही महिला, मुली शिक्षणाची कास सोडत नाहीत. त्यांची जिद्द हेच त्यांचे भांडवल असते, अनेक अडचणींना तोंड देत त्या शीकतातच. अशा अक्षर किंवा ज्ञान लालसेने झपाटलेल्या पैकी एक ताई म्हणजे प्रा. अनिता पवार. प्रत्येक क्षेत्रात प्राविण्य, शिक्षणाची प्रचंड आवड, शाळेचा हिरा असणाऱ्या या ताईच लहान वयातच लग्न झाले आणि शिक्षण खंडित झाले. सतरा अठरा वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा जिद्दीने शिकण्यास सुरुवात केली ते आजही त्या थांबल्या नाहीत. दहावीनंतर बीए, बीएड, एमए मराठी, एमए सोसिओलॉजी आणि आता पीएचडी चे स्वप्न आहे.
ह्या शैक्षणिक प्रवासाची चर्चा mahaedunews च्या फेसबुक पेज वर्ती Live होणार आहे
Date: 19-10-2020 Time: 5 PM
सहभागी होण्यासाठी: https://youtu.be/zh8Y5-LMQV8
प्रा.सौ. अनिता पवार यांच्याबद्दल थोडक्यात……….
मुक्तांगण इंग्लीश माध्यम स्कूल: शिक्षिका
पुणे म.न.पा. सर्व शिक्षण अभियाना अंतर्गत मराठी विषयाचा subject एक्स्पर्ट
Spicer B.E.D College मध्ये प्राध्यापक
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण सौंस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात मेट्रन म्हणून काम पाहिलं
सध्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण सौंस्थे मध्ये अध्यापकाचार्य म्हणून कार्यरत
Comment here