Student Views

पुन्हा एकदा अवतार घे !: कृष्णा पाटील

ray of hope

आज खूप प्रश्न विचारणार आहे तुला . लहानपणापासून खूप काही एकत आले आहे तुझ्याबद्दल आणि तुझ वर्णन काहीस अस केल जात कि तू ,जळी स्थळी काष्टी पाषाणी असतोस म्हणे ! आणि तुझी अनेक रूप आहेत असही म्हटलं जात. जेव्हा तू प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने कुठे आहे तुझा देव ? असा प्रश्न विचारला तेव्हा चक्क तू स्तंभातून “नृसिहाच्या” रुपात प्रकट झालास. “कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन “तुझी ही गीतेतली वचन तर आता जवळ-जवळ आम्हाला तोंडपाठच झाली आहेत. आता पुन्हा ऐकण्याची ताकद संपली रे ! मान्य आहे आज आम्ही जे भोगत आहोत. ते सर्व ऐकेकाळी तु ही भोगाल होतसंच की. पण जरी तू त्याकाळी मनुष्यरुपात होतास, तरी शेवटी तू देवच म्हणावा !

                         आमच्या सारख्या सामन्य माणसांकडे नाही रे एवढी सहनशक्ती, नाही सोसवत आता हे सगळ. आमच्या डोळ्यादेखत अन्याय होतात रे, आणि आमचे हात मात्र अजूनही दगडाखालीच आहेत. आता हे होणारे अन्याय आम्ही केवळ अगतिकतेन बघत बसतो. या पलीकडे दुसरा पर्याय नाही रे आमच्याकडे. आणि जरी आम्ही काही करण्याचा प्रयत्न केलाच तर आमची तोंड बंद केली जातात. या जगाचा खेळ फक्त राजकारण असणार का ? तुला माहितीये, या राजकारणात असे कित्तेक धृतराष्ट्र आहेत, फक्त सत्तेसाठी जगतायेत. एकदा का सत्ता बळकावली की फक्त आणि फक्त उपदेश बास ! नकोयेत रे ती खोटी आश्वासन, खोटी स्वप्न . त्यांना फक्त एवढच सांग कि नका लपंडाव खेळू म्हणाव आमच्या  बळीराज्यासोबत. तुझ्यानंतर आमची पोट भरणारा तोच एक आहे ना ! आणि त्यालाच सुळावर चढवू पाहतात रे ही लोक. इकडे कर्ज माफी करू म्हणता आणि तिकडे मात्र कुटुंब उध्वस्त होतात. स्वराज्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. पण जनतेवर अन्याय नाही झाला कधी. राजकारण तर त्यांनीही केल होतच की. त्या काळात नाही कधी कोणत्या शेतकर्यांने आत्महत्या केल्याच ऐकू आल. आणि मेक -इन -इंडियाच स्वप्न पाहणारे आम्ही, ज्याच्यामुळे आमची पोट भरतायेत त्याचाच बळी द्यायला निघालोय. तुला नाही का रे दया येत का या पोशिन्द्यावर. का त्याच्या आत्महत्तेच पाप स्वत:च्या माथी गोंदून घेतोयेस.

                      देवा जेव्हा तू मानव अवतारात होतास तेव्हा तुझ्या द्वापारयुगात स्त्रियांवर अन्याय तर होत नसत ना! कबुल आहे ; ज्या वेळी दुर्योधन आणि दुष्यासनाने द्रौपदीच वस्रहरण केल होत , त्यावेळी तू तिच्या सोबत होतास . फक्त सोबतच नही , तर तिला वस्त्र देखील पुरवलीत . आणि काय रे ! एका द्रौपदीला वस्त्रे पुरवून तू स्वत:ला देव समजतोस ! या कलीयुगात दुर्योधन आणि दुष्यासानासारखी माणस तीन वर्षाच्या मुलीपासून ते सत्तर वर्षाच्या म्हतारीपर्यंत स्त्रियांवर अत्त्याचार करतात , त्यांच्यावर क्रूर बलात्कार होतो , त्यावेळी तू कुठे असतोस ? हे कलियुगातील अत्याचारि दुर्योधन आणि दुष्यासन ताठ मानेन वावरतात, आणि अन्याय झालेल्या स्त्रीला मात्र सामाजिक घाव झेलावे लागतात. एखादी स्त्री जर भ्रष्टाचाराच्या आड आली तर तीची नांगी ठेचायची ,तिचा विध्वुंस करायचा .तुझा मामा ही असाच अन्याय , अत्याचार करायचा ना रे , त्या कंसाचा तर वध केलास पण ह्या सगळ्यांना कधी शासन करणार? अत्याचार करणाऱ्या या नराधमाना कधी ताळ्यावर आणणार ?

                     तुला हे सगळ कळत असून सुद्धा का गप्प आहेस तू ? का होणारे अन्याय खपवून  घेतोस  तू? महायुद्धाच्या वेळी प्रत्यक्ष तू अर्जुनाला गीता सांगितली होतीस . अर्जुनाला कायम सोबत दिलीस . आणि आजकालच्या अर्जुनानां मार्ग दाखवण्यासाठी फक्त भगवतगीताठेऊन गेलास . मला एक सांग तुझी गीता वाचायला पुरेसा वेळ आहे का कोणाकडे? आणि तू समजावणार नाहीस तोवर मतीत अर्थ कळणार नाही . बरोबर ना !

                      आता तुला एकाच मागण , तू ही जी गांधारीसारखी अंधपट्टी बांधलीयेस न तुझ्या डोळ्यावर ती जरा वेळ बाजूला सार. तुझ्या डोळ्यावरची झापड उघड आणि तुझ्या भक्तांच्या भेटीला ये आता. आता हे तुझ मुर्तीरूप पुरे झाल . त्या मुर्तीरुपातून बाहेर पड आणि पुन्हा एकदा फिरव तुझ सुदर्शन चक्र , कर घाव तुझ्या गदेने आणि निघुदे तुझ्या धनुष्यातून न्यायाचा बाण. “माणुसकी संपत चालीये कृष्णा आता  तरी परत ये”! पुन्हा एकदा कलियुगाचा उद्धार कर आणि पुन्हा एकदा अवतार घे !!!

 तुझीच, एक भक्त

 लेखिका : पाटील क्रिष्णा

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comments (1)

  1. You have beautifully expressed the plight of common man. Keep it up, Krushna! Best wishes for a bright future in your choice of field 🙂

Comment here