Student Views

माझी रंगभूमी ….क्रिष्णा पाटील

writer

आज valentine day या दिवशी कोणाला आठवण होणार आमची, जिला व्हायची ती अर्धयाावर साथ सोडून गेली ,पण अजून एक प्रेयसी माझ्या आयुष्यात आहे की जिला आज न चुकता माझी आठवण झाली,,,,,,,,,,ती म्हणजे माझी रंगभूमी …. 

theatre
माझा प्रिय,
HAPPY VALENTINE DAY!

माझ्याकडून तुला प्रेमाच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! माझ्या प्रेमात पडलेला तू आणि तुझ्या प्रेमात भाग पडायला लावणार तुझ लिखाण . काय जोडी आहे न आपली. वा ! अगदी रोमियो ज्युलीयेट च्या प्रेमासारख ., सागरासारख अथांग., काचेसारख लख्ख आणि पारदर्शी अस आपल प्रेम. अस वाटत जणू तूझ्या लेखणी शिवाय माझ्या जगण्याला काही अर्थच नाही. तुझ्या लेखणी शिवाय माझ्या असण्याला काही एक अर्थ नाही.

तुझ कौतुक कराव तेवढ थोड आहे. निराळीच जादू आहे रे तुझ्या लेखणीत. आणि ती जादू नकळत आमच्यावर असर करून जाते . मान्य आहे लोक सर्वात आधी पडद्यावरील हीरोलाच प्राधान्य देतात . पण त्याचे खरे हकदार तर तू आणि तुझी लेखणी आहे. तुझ्या लेखणीतील शब्दांचा धारधार पण कसा निखळपणे नायकाच्या मुखातून अलगद बाहेर येतो आणि आम्हाला त्याचा अभिनय त्याच्या मोहात पाडतो. म्हणजे बघ ना तु लिहलेली भाषा ही फक्त तुलाच कळत असावी पण तुझी लेखणी ती भाषा आमच्यापयंत प्रखर पणे पोहोचवते. खरच मनातल्या भावना अचूक ओळखते ती ही लेखणीच. मग त्या भावना कुठल्याही असूदेत अगदी पत्राद्वारे सुद्धा आपल्या भावना दुसऱ्याला  सहज कळतात. जर कोणाच्या मनातल्या भावनांचा पत्ता मिळत नसेल तर तुझी लेखणीच मदतीला धावणार.

आज या मोबाईल ज्या जगात तरुणाईकडे पाहिलं कि अस वाटत खूप चांगला होता तो आपला जुना काळ . एकमेकांची ओढ लावणारा ,एकमेकांची वाट पाहायला लावणारा ,भेटीसाठी आतुर झालेला आणि दिवसेंदिवस त्या एका पत्रासाठी आसुसलेला. काय वेगळीच गम्मत होती नाही या सगळ्यात. असो या तर सवा एक आठवणीच राहून गेल्यात. मनाच्या एका कोपयाात जाऊन लपल्या आहेत . जे मनाला ओढ लावत ते खर प्रेम ,जे वाट पाहायला लावत ते खर प्रेम ,ज्यात एक शब्द न शब्द बोलण्यासाठी आसुसलेला असतो ते खर प्रेम. जे आपल्याला आपली नव्याने ओळख करून देत ते खर प्रेम . आणि हो हे असच प्रेम मी तुझ्या लेखणीवर केल ,  अगदी  जीवापाड प्रेम! कधीच न समपणार प्रेम. कि जी मला आज नव्यान जगायला शिकवून गेली. माझ्यात हरवलेला मी मला पुन्हा नव्यान शोधायला भाग पाडून गेली. अस म्हणतात जगात प्रेम खरच खूप मोठी गोष्ट आहे. हो आहेच ! जे प्रेम माणसाला हरवलेलं सगळ परत देऊ शकत ते प्रेम खरच खूप मोठ असत . आणि हो तसच माझही आहे. खरच प्रेम म्हणजे खूप मोठी गोस्ट आहे कि जी असंख्य आव्हान पेलण्याच बळ देते, जस मला माझ्या प्रेमाने दिल, सार काही . हो! माझ पहिलं प्रेम तुझी लेखणी. नव्यान जगायला शिकवणारी .
आणि म्हणून आज या दिवशी तिची आठवण झाली, म्हणून तिला शुभेच्छा देण्यासाठी हे पत्र. म्हणून म्हणतो आयुश्यात एकदा तरी प्रेम कराव. कधीच न संपणार !

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here