Student Views

कमी वयात कीर्तनाची नांदी: माउली इंगोले

नमस्कार !

मी माऊली इंगोले

जन्म झाला तो एका वारकरी घराण्यात ! नाव काय ठेवायचं तर बाबा माऊली माऊली म्हणाले अन् माझ नाव झालं माऊली! घरी पिढ्यान् पिढ्या चालत आलेली वारीची परंपरा होती! घरात  कीर्तन , भजनाचे वातावरण असायचे!

वयाच्या ६ व्या वर्षी बाबांनी तबल्यावर बसवलं! हळू हळू काही तोडके मोडके बोल शिकवले! संगीत कला आवडू लागली! तबला थोडा थोडा जमत होता, तेव्हा बाबांनी मला गायनाचा क्लास लावला! वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी मी पेटीवर यमन हा राग शिकलो! आणि त्यानंतर थोड्याच दिवसात मी आळंदी ला मोठ्या स्टेज वर हजारो लोकांसमोर अभंग गायला!

काही दिवसातच मी लोकांच्या समोर आत्मविश्वासाने गाऊ लागलो! भजनामध्ये  , साथीला मोठे नामवंत  वादक होते तरीही  न घाबरता गाऊ लागलो ! मोठ्या मोठ्या गायकां सोबत गात होतो!

त्यानंतर अकरा वर्षाचा असताना मृदुंग वाजवू लागलो! नामवंत कीर्तनकार यांना साथ केली! भजना मध्ये आधी पेटी वाजवून गात होतो ! आता मृदुंग देखील वाजवू लागलो! आणि वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी मी कीर्तन करायला उभा राहिलो. मला आठवतय मी माझ्या पाहिलं कीर्तन जवळपास दोन तास केलं होत..समोर एवढी लोक असताना न घाबरता २ तास तेव्हा बोललो!

माझे बाबा अभिमानाने लोकांना सांगतात की त्यांनी आयुष्यात २४ व्या वर्षी पाहिलं कीर्तन केलं होत! पण मी माझ पाहिलं कीर्तन हे १२ व्या वर्षी केलं!

काही दिवसांपूर्वी बाबांचं पेडगाव ( अहमदनगर ) इथे कीर्तन होत! परंतु बाबांना काही कामा निमित्त हैदराबाद येथे जाव लागल्याने तिथे मी कीर्तन केले..तिथे खूप लोक म्हणले की तुझे बाबा इथ नाहीयेत अस वाटलच नाही रे! खूप छान कीर्तन केले.. अश्या शब्दात लोकांनी कौतुक केलं!

काही वर्षांपूर्वी आळंदी येथे मी जे काय शिकलो त्याच चीज झाले. सुप्रसिद्ध गायक -महेश काळे यांना मी मृदुंगावर साथ केली! त्यानंतर त्यांच्या एका कार्यक्रमाला मी त्यांना गायक म्हणून साथ देखील केली! त्यानंतर महेश काळे यांनी माझे खूप कौतुक केले होते..

एवढ्या मोठ्या गायकाने आपले कौतुक केले तेव्हा लय बर वाटलं होत..

जवळपास १० वर्ष झाले गायन, वादन शिकतोय. तेव्हा आपली कला लोकांपर्यंत पोहचली पाहिजे म्हणून मी माझं kalakar mauli या नावाने youtube channel उघडलं आहे !

तुम्ही नक्की बघा!!

आयुष्यात अजून पुढं खूप काही करायचं आहे ! माझ्या वडिलांची मिराशी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा या तुकाराम महाराजांच्या अभंगा नुसार बाबांची कीर्तन सेवा पुढे चालू ठेवायची आहे.., कलियुगात भरकटलेल्या या समाजाला प्रबोधनाची गरज आहे. ती जमेल तेवढी आपल्या परीनं करण्याचा प्रयत्न करणार आहे !

आपल्या संतांचे अभंग , आपलं मराठी संगीत, शास्त्रीय संगीत हे लोकांपर्यंत पोहचले पाहिजे म्हणून उराशी एक चांगला youtuber होण्याचं स्वप्न बाळगून आहे !

तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असूद्या!!

The author Mauli Ingole is student of 12th standard and is involved in various social activities. www.mahaedunews salutes his efforts of raising the spiritual consiciousness of todays youth and  wishes him to be successful in all the endevours henceforth.

visit www.mahaedunews.com for more such artilces. write and share your artilces to mahaedunews@gmail.com

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here